कराडात उज्जीवन स्मॉल फायनान्स बँकेकडून स्वच्छता मोहीम...
कराडात उज्जीवन स्मॉल फायनान्स बँकेकडून स्वच्छता मोहीम...
कराड दि.15-भारत सरकारच्या स्वच्छ भारत अभियानाच्या निमित्ताने कराड नगरपालिकेच्या स्वच्छ कराड, सुंदर कराड आणि उज्जीवन बँकेच्या स्वच्छ नेबरहुड या उपक्रमात अंतर्गत येथील नगरपरिषद शाळा क्रमांक 7 व 12 येथे उज्जीवन स्मॉल फायनान्स बँक कराड शाखेच्या वतीने स्वच्छता मोहीम राबवण्यात आली.
यावेळी उज्जीवन स्मॉल फायनान्स बँकेच्या कराड शाखेतील अधिकारी कर्मचारी यांनी कराड नगरपरिषद शाळा क्रमांक 7 व 12 व परिसराची स्वच्छता करून सामाजिक बांधिलकी जोपासली आहे. यावेळी नगरपरिषद शाळेचे मुख्याध्यापक संकपाळ सर, स्टाफ व विद्यार्थी तसेच उज्जीवन बँकेचे सर्व अधिकारी व कर्मचारी वर्ग उपस्थित होता.



Comments
Post a Comment