बाजार समितीचा 'तो' रस्ता सुरू केल्याने मार्केट यार्ड आतील व्यापाऱ्यांनी घेतला दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय...
बाजार समितीचा 'तो' रस्ता सुरू केल्याने मार्केट यार्ड आतील व्यापाऱ्यांनी घेतला दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय...
कराड दि. 7 (प्रतिनिधी) गेली काही दिवस बाजार समितीच्या संरक्षण भिंतीवरून सुरू असलेल्या प्रकाराबाबत न्यायालयीन आलेल्या आदेशानंतर नगरपालिकेने केलेल्या कारवाईवर झालेल्या गोंधळानंतर हा विषय जिल्हाधिकारी यांच्या कोर्टात गेला असला तरी आता कराड मार्केट यार्ड मर्चंट असोशियन तर्फे शेती उत्पन्न बाजार समितीला हा रस्ता खुला केल्याने होणाऱ्या नुकसानीबाबत निवेदन देण्यात आले असून खुला केलेला रस्ता बंद करण्यात यावा यासाठी असोशियन तर्फे मार्केट यार्ड मधील सर्व दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे या निवेदनात म्हटले आहे.
शेती उत्पन्न बाजार समितीचे सभापती यांना दिलेले निवेदनात म्हटले आहे की, आम्ही सदरच्या निवेदनाने आपणास विनंतीपुर्वक कळवितो की उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयांची आम्हास कल्पना मिळालेली असून सदरच्या निर्णयाचे कोणतेही उलंघन करावे अशी आमची इच्छा नाही. परंतु सदरच्या निर्णयाने खुल्या होणान्या रस्त्यामुळे आम्हा सर्व व्यापार करणान्या व्यापारी लोकांना जो त्रास होणार आहे. त्याबद्दल सदरच्या निवेदनाने -आपणांस कळवत आहोत.
सदरचा रस्ता सुरु झालेस आम्ही शेतकऱ्याचा येणारा शेतमाल व येथुन बाहेरगावी जाणारा शेतमाल याची वाहतुक करणेकामी मोठमोठी वहाने सतत ये जा करत असतात. तो सर्व वाहने शेतमाल भरतेवेळी व उतरते वेळी वाहने रस्त्यावरतीच लावावी लागत असल्यामुळे वहातुकीची कोंडी होत असते. आणि जर सदरचा रस्ता खुला झालेस वाहतुक प्रचंड वाढणार असून त्यामुळे आम्हास आमचा व्यापार करताच येणार नाही व आमचे व शेतकन्यांची मालाच्या सुरक्षेचा मोठा प्रश्नच निर्माण होणार आहे व मार्केट यार्डची पुर्ण सुरक्षा संपुष्टात येणार आहे. याचा निषेध म्हणून आम्ही सर्व मार्केट यार्डातील दलाल, व्यापारी हमाल, किराणा व्यापारी आम्ही सर्व विनंती करतो की सदरचा सुरु केलेला रस्ता जो पर्यंत बंद होत नाही तोपर्यंत आम्ही आमची दुकाने बंद ठेवणेचा निर्णय घेतलेला आहे. याची नोंद घ्यावी तरी आमच्या निवेदनाचा आपण सहानभुतीकपूर्वक विचार करावा अशी विनंती ही निवेदनात करण्यात आली आहे.

Comments
Post a Comment