भारतरत्न सर एम. विश्वेश्वरैय्या पुरस्कार आबासाहेब शिंदे यांना जाहीर...

 

भारतरत्न सर एम. विश्वेश्वरैय्या पुरस्कार आबासाहेब शिंदे यांना जाहीर...

राजू सनदी कराड

कराड दि. 11 (प्रतिनिधी) दि कराड आर्किटेक्टस अॅन्ड इंजिनिअर्स असोसिएशन तर्फे भारतरत्न सर एम. विश्वेश्वरैय्या यांच्या स्मरणार्थ ५६ वा अभियंता दिनानिमित्त यावर्षीचा सर विश्वेश्वरैय्या पुरस्कार केसे ता.कराड येथील निवृत्त अभियंता आबासाहेब पांडुरंग शिंदे यांना देण्यात येणार असल्याची घोषणा असोसिएशनचे अध्यक्ष महेश कुलकर्णी यांनी आज पत्रकार परिषदेत केली. यावेळी असोसिएशनचे उपाध्यक्ष दिग्विजय जानुगडे, खजिनदार चंद्रकांत पोळ, सेक्रेटरी अमित उंब्रजकर, संचालक किशोर साळुंखे, मिलींद पाटील, मकरंद जाखलेकर, राजेंद्र जाधव, प्रतिक जाधव, धैर्यशिल यादव, रोहित शर्मा, क्षितीज बेलापुरे, अजिंक्य पाटील उपस्थित होते.

दि कराड आर्किटेक्टस अॅन्ड इंजिनिअर्स असोसिएशन आयोजित हा पुरस्कार वितरण समारंभ 13 ऑक्टोंबर रोजी स्व. वेणूताई चव्हाण स्मारक येथे सायंकाळी पाच वाजता आयोजित केला असल्याची माहिती देऊन कुलकर्णी म्हणाले की, या पुरस्कार समारंभात समृद्धी महामार्गाचे सादरीकरण करण्यात येणार आहे. याबाबत मुख्य अभियंता एस के सुरवसे व अधीक्षक अभियंता विश्वनाथ सातपुते हे मार्गदर्शन करणार आहेत. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून बनवलेला ७०१ कि. मी. लांबीचा समृद्धी महामार्ग असुन तो मुंबई ते नागपूर अशा दोन महत्वाच्या शहरांन जोडणारा आहे. असा हा वैशिष्य पूर्ण योजनांनी चर्चेत असलेला महामार्ग महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ यांनी बनवलेला असुन हा महाराष्ट्राच्या विकासाला नक्कीच चालना देणारा आहे.

या कार्यक्रमासाठी सिक्कीमचे माजी राज्यपाल खा. श्रीनिवास पाटील, राज्याचे कामगार मंत्री सुरेश खाडे, सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री मंत्री शंभुराज देसाई,  कृष्णा अभिमत विद्यापीठाचे कुलगुरु सुरेश भोसले, सातारा जिल्हा भाजपा अध्यक्ष धैर्यशील कदम उपस्थित राहणार आहेत.

आबासाहेब शिंदे यांचा थोडक्यात परिचय...

पूर्ण नांव-आबासाहेब पांडुरंग शिंदे रा. केसे, ता. कराड, सध्या कराड, जन्मदिनांक-०१/०६/१९६३,  प्राथमिक शिक्षण -जीवन शिक्षण विद्यामंदीर, केसे, ता. कराड, माध्यमिक शिक्षण-टिळक हायस्कूल, कराड- १९७६-१९७८, उच्च माध्यमिक शिक्षण-यशवंतराव चव्हाण कॉलेज ऑफ सायन्स (१९७८-१९८०), अभियांत्रिकी  शिक्षण -गर्व्हनमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरींग कराड, स्थापत्य अभियांत्रिकी पदवीधर (जून १९८४) (बी.ई. सिव्हील) १९८०-८४.

नोकरी (०९/८४ ते ५/८५) :- कॉलेज मधून बाहेर पडल्यानंतर, महाराष्ट्र पाणी • पुरवठा व जलनिसारण मंडळ अंतर्गत सातारा येथे पाणी पुरवठा विभागात नोकरीची सुरुवात. (५/८५ ते ६/८८) मे. १९८५ मध्ये वरील ठिकाणचा राजीनामा देवून पाटबंधारे विभागात अन्वेषण व सर्व्हेक्षण विभागात सेवा सुरु झाली. या विभागामध्ये वांग मध्यम प्रकल्प, नागेवाडी म. प्रकल्प, मोरणा गुरेघर प्रकल्पाचे सर्व्हेक्षण व अन्वेषनांची कामे पूर्ण करुन प्रकल्प अहवालास शासनाची मान्यता प्राप्त झाली.

(७/८८ ते ६/९८) कृष्णा कोयना उपसासिंचन प्रकल्पाच्या म्हैसाळ भागाच्या,' 'शिर्षस्थ कामाच्या ठिकाणी बदलीने रुजु होवून पंपगृह टप्पा- १ म्हैसाळ या कामाची अगदी सुरुवातीपासून सर्व्हेक्षण, अंदाजपत्रके तयार करणे व निवीदा प्रक्रिया पूर्ण होवून प्रत्यक्ष ११/९१ ला पंपगृह टप्पा -१ हे काम सुरु झाले. सदरचे काम हे आशिया खंडातील मोठ्या उपसासिंचन योजनेतील कृष्णा नदीच्या डाव्या तीरावरील काम, CDO नाशिक, मेरी नाशिक, CWPRS पुणे या यंत्रणेशी समन्वय साधणे एक फार मोठे जिकीरीचे व कौशल्याचे काम होते. तसेच यात्रिकी संघटना, विद्युत विभाग या उपसासिंचनाशी संबंधीत पंप मोटार, विद्युतीकरण या यंत्रणाशी योग्य समन्वय साधून पंपगृहाचे काम टप्या टप्प्याने पूर्ण करणे हे स्थापत्य विभाग (Main Co-oridinator) म्हणून जबाबदारीने पूर्ण करणे महत्वाचे होते. जवळपास ९५% स्थापत्य कामे पूर्ण झाल्यानंतर बदली झाली.

७/९८ ते ८/२०००- कोकण प्रदेशामध्ये महाराष्ट्र व गोवा राज्याच्या आंतर- राज्यीय तिलारी प्रकल्पावर काम करण्याची संधी मिळाली. ९/२००० ते १०/२०१४ :- बांधकाम विभागाकडून सिंचन व्यवस्थापन विभागाकडे बदली झाल्यानंतर सिंचन व्यवस्थापन या कार्यप्रकारा मध्ये जवळपास १४ वर्षे सेवा बजावताना शेती, शेतकरी व पाणी याबाबत सविस्तर व सखोलपणे अभ्यासकरुन चांगल्या प्रकारची सेवा देता आली. या कालावधीमध्ये कराड व पाटण तालुक्यात चांगले काम झाले. कृष्णा कालव्याच्या नुतनीकरण कामाकरीता WORLD BANK चा निधी प्राप्त असल्याने त्यांच्या नियमावली नुसार व मानका प्रमाणे काम पूर्ण केले. 

११/२०१४ ते ०८/२०१६ :-सहाय्यक अभियंता या पदावरुन, पदोन्नतीने उपविभागीय अभियंता या पदावर पदस्थापना होवून उस्मानाबाद येथे रुजू झालो. ०८/२०१६ ते ४/२०२१- उस्मानाबाद येतून टेंभू प्रकल्पावर ४.५ वर्षे काम करण्याची संधी मिळाली. योजना ही प्राथमिक अवस्थेत सुरु झाली असल्याने असंख्य अडचणीवर मात करत योजना सुरु ठेवून सांगली, सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळी (अवर्षण प्रवण भागांना सिंचनासाठी पाणी देणेत आले आहे. शासकीय सेवेच्या शेवटच्या टप्प्यात, कार्यकारी अभियंता या पदावर जलसंपदा विभाग. मंत्रालय, मुंबई येथून ' अव्वर सचिव या पदावरुन दिनांक ३१/०५/२०२१ रोजी सेवानिवृत्त झालो.

अतिउत्कृष्ठ कामा बद्दल शासनाकडून २ वेळा २-२ आगाऊ वेतनवाढी (Advance Increments) मंजूर झाल्या आहेत.

नांव :-आबासाहेब पांडुरंग शिंदे - बी.ई. सिव्हील गर्व्हमेंट कॉलेज ऑफ इंजि. कराड.

पदनाम १) सहाय्यक अभियंता, श्रेणी-२, ०५/१९८५ ते १०/२०१४ (२) उपविभागीय अभियंता -१०/२०१४ ते ०४/२०२१. (३) कार्यकारी अभियंता तथा अवर सचीव -०४/२०२१ ते ०५/२०२१ जलसंपदा विभाग, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२ येथून दि. ३१/०५/२०२१ रोजी नियतवयोमानानुसार सेवानिवृत झालो.

आबासाहेब पांडुरंग शिंदे 

कार्यकारी अभियंता (सेवानिवृत)


Comments

Karad Today News

कराड शहरातील दोन गुन्हेगाराकडून चोरीच्या 9 मोटरसायकली जप्त

स्व. यशवंतराव चव्हाण कृषि प्रदर्शनाच्या मंडप उभारणीस प्रारंभ

वारुंजी जिल्हा परिषद गटावर काँग्रेसचा झेंडा फडकवा – पृथ्वीराज चव्हाण

मलकापूर नगरपरिषद निवडणुकीत भाजपाचे नगराध्यक्ष पदासह 18 नगरसेवक विजयी

सुपने जिल्हा परिषद गट काँग्रेसने ताकदीने लढावा –कार्यकर्त्यांचा पृथ्वीराज चव्हाण यांच्यासमोर आग्रह

कराडमध्ये रविवारी रंगणार ‘कृष्णा मॅरेथॉन’चा थरार

मल्हारपेठ - पंढरपूर रस्त्याच्या कामविरोधात बाधित शेतकरी आक्रमक