कराड नगरपालिका नगरवाचनायातर्फे नवरात्र उत्सवात ९१ व्या शारदीय व्याख्यानमालचे आयोजन...

 

कराड नगरपालिका नगरवाचनायातर्फे नवरात्र उत्सवात ९१ व्या शारदीय व्याख्यानमालचे आयोजन...

राजू सनदी कराड 

कराड दि.12-कराड नगरपरिषदेच्या नगरवाचनालयाच्या वतीने प्रतिवर्षी शारदीय व्याख्यानमालेचा उपक्रम राबविला जातो. सन १९३२ पासुन ही व्याख्यानमाला अविरतपणे सुरु असुन यंदा ही शारदीय व्याख्यानमाला ९१ व्या वर्षात पदार्पण करीत आहे. दिनांक १५ ऑक्टोंबर २०२३ पासुन या शारदीय व्याख्यानमालेस प्रारंभ होत आहे. कराडचे सांस्कृतिक, वैचारिक वैभव, शैक्षणिक संस्कारक्षम व्यासपीठ म्हणुन या व्याख्यानमाले ने नावलौकीक मिळविला आहे.

१६६ वर्षाची परंपरा जपणारे हे नगरवाचनालय आज कराड शहराची शान भरली आहे. बुध्दीवंतांची गरज तर वाचनवेडया पुस्तकप्रेमी वाचकप्रेमी वाचकांची तहान भागविण्याचा झरा बनली आहे. अखंड भारताच्या दृष्टीने ऐतिहासिक आणि संस्मरणीय वर्ष ठरलेल्या १८५७ या वर्षामध्ये स्थापन झालेले हे नगरवाचनालय आजही आपल्या अखंड सेवेने तत्परतेने, विविधतेने, वाचकांची जिज्ञासूंची, अभ्यासूंची व्याख्यानमाला रसिकांची भूक भागविते आहे.

या व्याख्यानमालेत साहित्य, संगीत, कला, क्रीडा, लोककला राजकारण काव्य, कथाकथन, धार्मीक, अध्यात्मिक, इत्यादी विविध विषयावरील व्यासंगपूर्ण अभ्यासू व नामवंत वक्त्यानी गेल्या ९० वर्षात ७०० हून अधिक व्याख्यात्यांनी आपली व्याख्याने सादर केलेली आहेत. या थोर विचारवंताचे विचार कराडकरांच्या चिरंतर स्मृतीत कायमचे राहिले आहेत

आजपर्यंत या शारदीय व्याख्यानमालेत राज्यातील मान्यवर विचारवंतानी व वक्त्यांनी आपले विचार मांडून या व्यासपीठास ज्ञानपीठाचा दर्जा प्राप्त करून दिला आहे.या व्याख्यानमाले बरोबरच कराड नगरपरिषदेचे सार्वजनिक ग्रंथालय एक आदर्श ग्रंथालय म्हणून नावलौकिक मिळविला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ठ ग्रंथालय पुरस्काराने सन्मानित झालेले हे ग्रंथालय या शारदीय व्याख्यानमालेच्यारूपाने एक सांस्कृतिक वारसा जोपासत आहे.

व्याख्यानमालेस श्रोत्यांची गर्दी असते. कराडला येवुन शारदीय व्याख्यानमालेत आपली हजेरी लावण्यातही वक्त्यांना आपला गौरवच वाटतो, म्हणुन नामवंत वक्तेही या शारदीय व्याख्यानमालेत सहभागी होण्यास उत्सुक असतात.

रविवार दि. १५ ऑक्टोंबर २०२३ रोजी व्याख्यानमालेचा शुभारंभ श्री संत सेवा संघ, महाराष्ट्रचे संस्थापक प्रमोद महाराज जगताप यांच्या 'सुखाचा शोध' या व्याख्यानाने होणार आहे. सोमवार दि. १६ ऑक्टोंबर २०२३ रोजी डॉ. सुनिता बोर्डे-खडसे, प्राध्यापिका श्रीमती सी. बी. शाह महिला महाविदयालय, सांगली यांचे 'साहित्यातील श्री जाणीवा' मंगळवार दि. १७ ऑक्टोंबर २०२३ रोजी सिने पटकथा लेखक व गीतकार अरविंद जगताप, मुंबई यांचे 'पत्रास कारण की' बुधवार दि. १८ ऑक्टोंबर २०२३ रोजी शिक्षिका व सामाजिक कार्यकर्त्या डॉ. स्वाती शिंदे-पवार, विटा यांचे 'घरातल घरपण, गावातलं गावपण, माणसातलं माणुसपण संपत चाललंय' गुरुवार दि. १९ आक्टोंबर २०२३ रोजी प्रसिध्द सिने अभिनेते समृध्दी जाधव यांचे 'दोन शब्द आईसाठी दोन शब्द बाबांसाठी' शुक्रवार दि. २० आक्टोंबर २०२३ रोजी सुप्रसिध्द व्याख्याते अविनाश भारती यांचे 'तरुणाईशी संवाद ' शनिवार दि. २१ आक्टोंबर २०२३ रोजी माजी केंद्रिय कायदा मंत्री मा. अॅड. रमाकांत खलप, गोवा यांचे 'पोर्तुगीज साम्राज्याच्या अस्तकाळातील गोवेकर, रविवार दि. २२ आक्टोंबर २०२३ रोजी सुप्रसिद्ध व्याख्याते चंद्रकांत निंबाळकर, पुणे यांचे 'कौटुंबिक सौख्य' सोमवार दिनांक २३ आक्टोंबर २०२३ रोजी सुप्रसिध्द कवी प्रा. नारायण पुरी, छत्रपती संभाजीनगर यांचे 'कविता जनामनाची' अशाप्रकारे एकूण ९ व्याख्याने आयोजित करण्यात आलेली आहेत.

या सर्व व्याख्यानास कराडच्या रसिक श्रोतृवृंदानी, विद्यार्थीवर्गानी बहुसंख्येने उपस्थित राहून व्याख्यांनाचा लाभ घ्यावा, अशी विनंती प्रशासक तथा मुख्याधिकारी, शंकर खंदारे यांनी केली आहे. वरील सर्व व्याख्याने यशवंतराव चव्हाण स्मृतिसदन (टाऊन हॉल) येथे दररोज सायं. ६.३० वाजता होणार आहेत.


Comments

Karad Today News

कराड शहरातील दोन गुन्हेगाराकडून चोरीच्या 9 मोटरसायकली जप्त

स्व. यशवंतराव चव्हाण कृषि प्रदर्शनाच्या मंडप उभारणीस प्रारंभ

वारुंजी जिल्हा परिषद गटावर काँग्रेसचा झेंडा फडकवा – पृथ्वीराज चव्हाण

मलकापूर नगरपरिषद निवडणुकीत भाजपाचे नगराध्यक्ष पदासह 18 नगरसेवक विजयी

सुपने जिल्हा परिषद गट काँग्रेसने ताकदीने लढावा –कार्यकर्त्यांचा पृथ्वीराज चव्हाण यांच्यासमोर आग्रह

कराडमध्ये रविवारी रंगणार ‘कृष्णा मॅरेथॉन’चा थरार

मल्हारपेठ - पंढरपूर रस्त्याच्या कामविरोधात बाधित शेतकरी आक्रमक