कराडात उद्यापासून चार दिवस एकवेळचा पाणीपुरवठा होणार नाही...
कराडात उद्यापासून चार दिवस एकवेळचा पाणीपुरवठा होणार नाही...
कराड दि.11-कराड शहरातील सायंकाळचा पाणीपुरवठा उद्यापासून चार दिवस होणार नसल्याची जाहीर निवेदन कराड नगर परिषदेच्या वतीने करण्यात आले आहे.
कराड शहरातील सर्व नागरीकांना कळविणेत येते की, गुरुवार दि. १२/१०/२०२३ ते दिनांक १५/१०/२०२३ या कालावधीत जलशुध्दीकरण केंद्राकडील मौजे वांरुजी यथील अशुध्द पाणी उपसा पंपगृह (जॅकवेल) मधील गाळ काढणेचे काम हाती घेणेत येणार आहे. त्यामुळे दिनांक १२/१०/२०२३ ते दिनांक १५/१०/२०२३ यादिवशी सांयकाळी होणारा पाणी पुरवठा होणार नाही. याची सर्व नागरीकांनी कृपया नोंद घ्यावी. तसेच, पाण्याचा वापर काटकसरीने करावा. व नगरपरिषदेस सहकार्य करावे असे आव्हान मुख्याधिकारी कराड नगरपरिषद यांनी केले आहे.

Comments
Post a Comment