कराड शहरातील रिक्षा चालकांच्या बेकायदेशीर वागण्यामुळे जनतेच्या जीवितास धोका; मीटर प्रमाणे भाडे आकारणी व्हावी...

 

कराड शहरातील रिक्षा चालकांच्या बेकायदेशीर वागण्यामुळे जनतेच्या जीवितास धोका; मीटर प्रमाणे भाडे आकारणी व्हावी...

राजू सनदी, कराड 

कराड दि.12-कराड शहर व परिसरातील रिक्षा चालकांच्या बेबंद बेकायदेशीर वागण्यामुळे जनतेच्या जिवितास धोका निर्माण झाला आहे. तसेच कराड शहर व परिसरात मिटर नुसार रिक्षा भाडे जाहिर होणेबाबत आणी मिटरचे दर जनतेला समजणेबाबत उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाने लक्ष घालून कार्यवाही करावी अशी मागणी आपले कराड ग्रुपच्या वतीने सामाजिक कार्यकर्ते संजय चव्हाण यांनी केली आहे. 

उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे संजय चव्हाण यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले की, कराड शहर व कराड शहरालगतच्या गावात हजारो रिक्षा आहेत. परंतु यांच्यावर कोणाचेही शासकीय नियंत्रण नसल्यामुळे जनतेमध्ये तीव्र असंतोष उसळत आहे. हे रिक्षाचालक बेदरकारपणे वाहतुकीच्या नियमांचे पुर्ण उल्लंघन करून रिक्षा चालवत असतात. तसेच सिग्नलच्या ठीकाणी सिग्नलच्या नियमांचे उल्लंघन करत असतात.तसेच रिक्षा थांब्यावर सुद्धा रिक्षा अस्ताव्यस्त उभ्या करत असतात. या रिक्षाचालकांना शासनानेच बेबंद बेकायदेशीर वागण्याची मुभा दिली आहे की काय अशी शंका येते.

तसेच काही रिक्षा चालक वेळेवर रिक्षाचे PUC सर्टीफीकेट काढत नाहीत. आणखी काही रिक्षांकडे अधिकृत रजिस्ट्रेशन आहे की नाही याची सुद्धा शंका येते. अशा परिस्थितीत या रिक्षांकडुन अपघात झालेस जनतेस नुकसान भरपाई सुद्धा मिळणार नाही. त्यामुळे रिक्षांना रोडवर धावणेबाबत आपल्या विभागाचे जे नियम आहेत त्याप्रमाणे काटेकोर तपासणी होणे गरजेचे आहे. विना लान्स रिक्षा ड्रायव्हर तसेच विना परमिट रिक्षा तसेच रिक्षाचे PUC सर्टिफिकेट नसणे तसेच रिक्षाचे आपल्या विभागाकडे रजिस्ट्रेशन नसणे अशा परीस्थीतीत संबधीत रिक्षा कडुन अपघात झालेस जनतेस नुकसान भरपाई मिळणार नाही.

अशा परीस्थीतीत या सर्वांवर नियंत्रण ठेवणेचे आपल्या विभागाचे कोणत्या अधिकाऱ्यांची जबाबदारी आहे हे जाहिर झाले तर त्या संबधीत अधिकाऱ्यांचे विरोधात कर्तव्यात कसूर करून जनतेचे जीवन धोक्यात आणले बाबत योग्य त्या ठीकाणी तक्रार व न्यायालयात दाद मागणे सोईचे होईल.

तसेच प्रत्येक रिक्षा चालकास गणवेश व बैच वापरणेची सक्ती करावी त्यामुळे एखादा रिक्षा चालक पॅसेंजर सोबत दुष्कृत्य करत असलेस आपल्या विभागास कळवणे सोईचे होईल. व जनतेने आपल्या विभागास या तक्रारीबाबत कोणत्या माध्यमातुन कळवावे हे सुद्धा जाहिर व्हावे. तसेच आम्हास असे समजले की कराड शहर व परिसरात धावणाऱ्या बऱ्याच रिक्षा बेकायदेशीर आहेत तरी कराड शहर व परीसरातील सर्व रिक्षांची तपासणी व्हावी. व बेकायदेशीर रिक्षांवर कारवाई होणे गरजेचे आहे. या बेकायदेशीर रिक्षांकडुन अपघात झालेस यास जबाबदार कोण. याचा जनतेला नाहक त्रासच होणार आहे.

सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे कराड शहर व परिसरात कोणीही रिक्षा चालक मिटर प्रमाणे भाडे आकारत नाहीत. जनतेची पुर्ण अडवणुक केली जाते. सर्वात महत्वाचे म्हणजे महाराष्ट्रात बऱ्याच शहरात मिटर प्रमाणे भाडे आकारणी केली जाते परंतु आश्चर्याची गोष्ट म्हणजे कराड शहर व परिसरात आपल्या विभागाने रिक्षांना मिटरप्रमाणे भाडे घेण्याची सक्ती केलेली नाही तसेच आपल्या विभागाने मिटरप्रमाणे भाड्याचे दर सुद्धा जाहिर केलेले नाहीत तरी कराड शहर व आजुबाजुच्या गावांत मिटर प्रमाणे रिक्षांची भाडी त्वरीत जाहिर व्हावीत व त्याचे दरपत्रक जनतेला समजावे हि नम्र विनंती आहे. 

Comments

Karad Today News

कराड शहरातील दोन गुन्हेगाराकडून चोरीच्या 9 मोटरसायकली जप्त

स्व. यशवंतराव चव्हाण कृषि प्रदर्शनाच्या मंडप उभारणीस प्रारंभ

वारुंजी जिल्हा परिषद गटावर काँग्रेसचा झेंडा फडकवा – पृथ्वीराज चव्हाण

मलकापूर नगरपरिषद निवडणुकीत भाजपाचे नगराध्यक्ष पदासह 18 नगरसेवक विजयी

सुपने जिल्हा परिषद गट काँग्रेसने ताकदीने लढावा –कार्यकर्त्यांचा पृथ्वीराज चव्हाण यांच्यासमोर आग्रह

कराडमध्ये रविवारी रंगणार ‘कृष्णा मॅरेथॉन’चा थरार

मल्हारपेठ - पंढरपूर रस्त्याच्या कामविरोधात बाधित शेतकरी आक्रमक