कराडात घरगुती गॅसचा रिक्षात भरणा; प्रशासनाची संबंधित अड्यावर धाड....
कराडात घरगुती गॅसचा रिक्षात भरणा; प्रशासनाची संबंधित अड्यावर धाड....
राजू सनदी कराड
कराड दि.10 (प्रतिनिधी) येथील कासमभाई बोर्डिंग मधील एका खोलीत घरगुती गॅस बेकायदेशीरपणे रिक्षात भरण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. आज सकाळी प्रांत अधिकारी, तहसिलदार व पुरवठा अधिकारी यांनी पोलिसांच्या मदतीने या बेकायदेशीरपणे सुरू असलेल्या धंद्यावर धाड टाकली आहे. यावेळी तीन रिक्षासह गॅस वाहतुक करणारी गाडी घटनास्थळावर आढळून आली आहे.
गेली काही दिवस शहरातील मध्यवस्तीत बिन बोभाट घरगुती गॅस रिक्षामध्ये भरण्याचे काम येथे गेले काही महिन्यापासून सुरू होते. रोज अनेक रिक्षामध्ये बेकायदेशीर रित्या घरगुती गॅस भरला जात होता. याबाबत संबंधित विभागाकडे वेळोवेळी तक्रारी करण्यात आल्या होत्या. मात्र संबंधित प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले होते. मंगळवारी सकाळी प्रांत अधिकारी अतुल म्हेत्रे, तहसीलदार विजय पवार व पुरवठा विभागाचे अधिकारी महादेव अष्टेकर यांनी या अड्ड्यावर धाड टाकून कारवाई केली आहे. यावेळी काही रिक्षाही त्या ठिकाणी आढळून आल्या असून एक गॅस वाहतूक करणारे वाहन ही घटनास्थळावर गॅसच्या टाक्यांसह आढळून आले आहे. घटनास्थळावर सध्या संबंधित विभागाकडून पंचनामा करण्याचे काम सुरू आहे.
प्रशासनाने ज्यावेळेला या अड्ड्यावर धाड टाकली त्यावेळेला या ठिकाणी असणाऱ्या एका खोलीत 15 सिलेंडरच्या टाक्या तसेच बाहेरच्या बाजूस गॅसच्या टाकीमधून मशीनच्या माध्यमातून रिक्षात गॅस भरण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या दोन मशीन तसेच पाच रिक्षा व एक गॅस टाक्यांची गाडी या ठिकाणी संबंधित अधिकाऱ्यांना आढळून आली आहे.



Comments
Post a Comment