कोयना धरण परिसर भूकंपाच्या धक्क्यानं हादरला...
कोयना धरण परिसर भूकंपाच्या धक्क्यानं हादरला...
कराड दि.28- कोयना धरण परिसरात गेल्या १२ दिवसात तिसऱ्यांदा भूकंपाचा धकका जाणवला असुन आज रात्री ९ वाजून ५ मिनिटांनी २.९ रिश्टर स्केलच्या भूकंपाच्या धक्क्याने कोयना धरण परिसर हादरला आहे. या भूकंपाच्या धक्क्याचा केंद्रबिंदू धरणापासून साडेनऊ किलोमीटर अंतरावर होता.
दरम्यान या भूकंपाच्या धक्क्याने कोणतीही जीवित अथवा वित्तहानी झाली नसल्याची माहिती प्रशासनाने दिली असून आज रात्री झालेल्या या भूकंपाच्या धक्क्याचा केंद्रबिंदू धरणापासून साडेनऊ कि मि अंतरावर गोषटवाडी गावच्या हद्दीत साडेसात किलोमीटर खोलीवर होता. अशी माहिती संबंधित भूकंप मापन केंद्रातून देण्यात आली.

Comments
Post a Comment