पाच राज्यातील निवडणुका जाहीर...
पाच राज्यातील निवडणुका जाहीर...
दिल्ली.दि.9-मध्यप्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, मिझोरम आणि तेलंगणा या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम आज केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहीर केला. आज दिल्लीत पत्रकार परिषद घेत निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या आहेत. मध्यप्रदेशमध्ये 17 नोव्हेंबर, छत्तीसगडमध्ये 7 आणि17, नोव्हेंबर, राजस्थानमध्ये 23 नोव्हेंबर, मिझोरममध्ये 7 नोव्हेंबर आणि तेलंगणामध्ये 30 नोव्हेंबरला मतदान होणार आहे. पाचही राज्यांची मतमोजणी 3 डिसेंबरला रोजी होणार आहे.
मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार, निवडणूक आयुक्त अनूप चंद्र पांडेय, अरुण गोयल यांनी हा कार्यक्रम जाहीर केला. आम्ही 40 दिवस पाच राज्यांचा दौरा केला. राजकीय पक्ष, केंद्र आणि राज्य सरकारांशी चर्चा केली, असं निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी सांगितलं. या पाच राज्यात विधानसभेच्या 679 जागा आहेत. या पाचही राज्यात 16.14 कोटी मतदार आहेत. यात 8.2 कोटी पुरुष, 7.8 कोटी महिला आणि 60.2 लाख नवोदित मतदार आहेत, असं राजीव कुमार यांनी स्पष्ट केलं. पाच राज्यात महिला मतदारांची संख्या वाढली आहे. तसेच अपंग मतदार, ज्येष्ठ नागरिक आदींना घरून मतदान करण्याची सुविधा देण्यात आल्याचंही आयोगानं स्पष्ट केलं आहे.
कोणत्या राज्यात किती जागा...
मध्य प्रदेशात विधानसभेच्या 230 जागा
राजस्थानमध्ये एकूण 200 जागा आहेत
छत्तीसगडमध्ये 90 जागा आहेत
तेलंगनात 199 जागा आहेत.
मिझोरामध्ये 40 जागा आहेत.
मतदान कधी आणि निकाल कधी....
मध्यप्रदेश-मतदान- 17 नोव्हेंबर
मतमोजणी- 3 डिसेंबर
राजस्थान-मतदान- 23 नोव्हेंबर
मतमोजणी- 3 डिसेंबर
छत्तीसगड-मतदान- 7 आणि 17 नोव्हेंबर
मतमोजणी- 3 डिसेंबर
तेलंगाना-मतदान- 30 नोव्हेंबर
मतमोजणी – 3 डिसेंबर
मिझोराम-मतदान- 7 नोव्हेंबर
मतमोजणी- 3 डिसेंबर


Comments
Post a Comment