Posts

Showing posts from September, 2023

चला उद्या करूया स्वच्छतेसाठी श्रमदान, शहरातील 'या' 14 वार्डात आयोजन; नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे; कराड नगरपरिषद...

Image
  माझी माती माझा देश या अभियानांतर्गत आज कराड नगर परिषदेच्या वतीने अमृत कलश यात्रा काढण्यात आली यावेळी आरोग्य अभियंता आरडी भालदार आरोग्य निरीक्षक मिलिंद शिंदे सर्व विभागाचे मुकादम आरोग्य कर्मचारी मोठ्या संख्येने यामध्ये सहभागी झाले होते. चला उद्या करूया स्वच्छतेसाठी श्रमदान, शहरातील 'या' 14 वार्डात आयोजन; नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे; कराड नगरपरिषद... राजू सनदी कराड दि.30- इंडियन स्वच्छ लीग.2.0, स्वच्छतेचा पंधरावडा आणि स्वच्छता ही सेवा’ अभियान अंतर्गत महात्मा गांधी यांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर  देशातील सर्व नागरिक एकत्रितपणे त्यांना 'स्वच्छांजली' अर्पण करण्यासाठी 1 ऑक्टोबर रोजी म्हणजेच रविवारी सकाळी 10 वाजता नागरिकांच्या नेतृत्वाने स्वच्छतेबाबत एक मोठा कार्यक्रम आयोजित केले आहे. तरी 1 ऑक्टोबर  सकाळी 10 वाजता शहरातील नागरिकांनी आपल्या वॉर्डमध्ये स्वच्छतेसाठी 1 तास श्रमदान करावे असे आवाहन कराड नगरपरिषद तर्फे शहरातील नागरिकांना करण्यात आले आहे. खालील ठिकाणी अभियान राबवण्यात येणार आहे. 1. वॉर्ड 1 - महादेव मंदिर वाखान 2. वॉर्ड 2 - छत्रपती शिवाजी उद्यान परिसर ...

ईद-ए-मिलादची शुक्रवारी सुट्टी जाहीर... उद्यापासून सलग चार दिवस सुट्ट्या...

Image
ईद-ए-मिलादची शुक्रवारी सुट्टी जाहीर... उद्यापासून सलग चार दिवस सुट्ट्या... राजू सनदी कराड  कराड दि. 27 (प्रतिनिधी) यावर्षी अनंत चतुर्थी व ईद-ए-मिलाद गुरुवार दि. 28 सप्टेंबर रोजी एकाच दिवशी आल्याने महाराष्ट्र राज्य सरकारने ईद-ए-मिलादची 28 सप्टेंबर रोजी असणारी सुट्टी शुक्रवारी 29 सप्टेंबर रोजी जाहीर केल्याची आदी सूचना राज्यपालांच्या आदेशाने काढण्यात आली आहे. त्यामुळे ईद-ए-मिलादची शुक्रवारी सुट्टी असणार आहे. यामुळे उद्यापासून सलग चार दिवस हे सुट्ट्यांचे असणार आहेत. राज्यपालांच्या आदेशाने काढण्यात आलेल्या अधिसूचनेत म्हटले आहे की, राज्य शासनाने अधिसूचित केलेल्या २४ सार्वजनिक सुट्ट्यांमध्ये ईद-ए-मिलाद या सणाची सुट्टी गुरुवार, दि. २८ सप्टेंबर, २०२३ रोजी दर्शविण्यात आलेली आहे. ईद-ए-मिलाद हा मुस्लिम धर्मियांचा सण मुस्लिम बांधव मोठ्या प्रमाणात साजरा करत असतात. यावेळी जुलूस कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. तथापि यावर्षी गुरुवार, दि. २८ सप्टेंबर, २०२३ रोजी हिंदु धर्मियांचा अनंत चतुर्दशी हा सण आहे. अनंत चतुर्दशीच्या दिवशी राज्यात सर्वत्र सार्वजनिक गणेश मुर्तीची मोठी मिरवणूक काढण्यात येते व नंतर...

कराड शहरात अनंत चतुर्थी दिवशी वाहतुकीत बदल...

Image
कराडात अनंत चतुर्थी दिवशी वाहतुकीत बदल... राजू सनदी कराड कराड दि. 26 (प्रतिनिधी) अनंत चतुर्थी दिवशी गणेश विसर्जन मिरवणुक अनुषंगाने कराड शहरातील वाहतुक मार्गातील तात्पुरता बदल करण्यात आला असून शहरातील नागरिकांना त्यादिवशी वाहतुकीच्या बदललेल्या मार्गाचा वापर करावा असे आवाहन कराड वाहतूक नियंत्रण शाखेच्या वतीने सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन मछले यांनी केले आहे. दिनांक २८ सप्टेंबर रोजी अनंत चर्तुदशी असल्याने कराड शहरातील तसेच कराड तालुक्यातील सार्वजनिक गणेश मंडळांच्या तसेच घरगुती गणेश मुर्तीचे मोठया प्रमाणात विसर्जन होणार आहे. सार्वजनिक गणेश मंडळाच्या गणेश मुर्ती या दत्त चौक येथून मिरवणुकीने कृष्णा घाट येथे जात असतात, त्यामुळे दत चौक ते कृष्णा घाट व कमानी मारुती-चावडी चौक कृष्णा घाट या मेन रोडला येणारी सर्व वाहतुक मार्गात विसर्जन दिवसांकरीता अंशतः तात्पुरता बदल करण्यात आला आहे याची सर्वानी नोंद घ्यावी. सातारा पोलीस अधिक्षक समीर शेख यांनी मुंबई पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३४ अन्वये असलेल्या अधिकारान्वये दिनांक २८/०९/२०२३ चे ०६.०० वा. पासुन ते दिनांक २९/०९/२०२३ रोजीचे सकाळी ०७.०० वा. पर्यतचे काला...

सफाई मित्र सुरक्षा अभियान व स्वच्छता ही सेवा अभियान अंतर्गत खा.श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते सफाई कर्मचाऱ्यांना सुरक्षा साधने प्रदान...

Image
  सफाई मित्र सुरक्षा अभियान व स्वच्छता ही सेवा अभियान अंतर्गत खा.श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते सफाई कर्मचाऱ्यांना सुरक्षा साधने प्रदान... कराड दि. 25 -स्वच्छ भारत अभियान २.० (नागरी) अंतर्गत केंद्रीय गृहनिर्माण तथा शहरी कार्य मंत्रालय (MoHUA), भारत सरकार यांनी आयोजित  केलेल्या इंडियन स्वच्छता  लीग 2.0 अंतर्गत "स्वच्छ पंधरवडा" व स्वच्छता ही सेवा अभियान अंतर्गत मोहिम संपूर्ण भारत देशामध्ये राबविण्यात येत आहे. त्या अनुषंगाने आज खा. श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते नगरपरिषदेच्या सफाई कर्मचाऱ्यांना "सफाई मित्र सुरक्षा अभियान" व "स्वच्छता ही सेवा" अभियान अंतर्गत सुरक्षा साधने प्रदान करण्यात आली.  कराड नगर परिषदेचे सफाई कर्मचारी हे कोणतीही काळ वेळ न पाळता कोणत्याही आपत्तीची पर्वा न करता 24x7 शहर स्वच्छतेचे काम करत असतात. त्यांच्या सुरक्षेसाठी प्रयत्न करणे आवश्यक असते. त्याचाच एक भाग म्हणून सफाई कर्मचाऱ्यांना सुरक्षा बूट, सुरक्षा हेल्मेट, रिफ्लेकटिंग जॅकेट व सुरक्षा हातमोजे यावेळी देण्यात आली. यावेळी उपमुख्याधिकारी विशाखा पवार, आरोग्य अभियंता आर. डी. भालदार, नगर अभियं...

कृष्णा बँकेकडून सभासदांना १२ टक्के लाभांश.... बँकेची ५२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात; ११५० कोटी व्यवसायाचे उद्दिष्ट....

Image
कृष्णा बँकेकडून सभासदांना १२ टक्के लाभांश.... बँकेची ५२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात; ११५० कोटी व्यवसायाचे उद्दिष्ट.... कराड, दि.25-: कृष्णा सहकारी बँकेने सभासदांच्या सहकार्यातून उत्तम आर्थिक वाटचाल केली आहे. बँकेच्या स्वनिधीत सातत्याने वाढ होत असून, बँकेची नफा क्षमताही दिवसेंदिवस वाढत आहे. या बाबी विचारात घेऊन, कृष्णा बँकेने सभासदांना १२ टक्के लाभांश देण्याचा निर्णय चेअरमन डॉ. अतुल भोसले यांनी बँकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत जाहीर केला. विशेष म्हणजे सभा सुरू असतानाच अत्याधुनिक प्रणालीचा अवलंब करत, एका क्लिकवर बँकेच्या सभासदांच्या खात्यावर तात्काळ लाभांश रक्कम जमा करण्यात आली.   य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि बँकेचे चेअरमन डॉ. अतुल भोसले यांच्या अध्यक्षतेखाली विराज मल्टिपर्पज हॉल येथे बँकेची ५२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात पार पडली. यावेळी व्यासपीठावर उपाध्यक्ष दामाजी मोरे, व्यवस्थापन मंडळाचे अध्यक्ष सचिन तोडकर, मुख्य कार्यकारी अधिकारी भगवान जाधव, कृष्णा कारखान्याचे संचालक शिवाजी पाटील यांची प्रमुख उपस्थित...

मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनःरीक्षण कार्यक्रम....

Image
  मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनःरीक्षण कार्यक्रम.... सातारा दि. 25–भारत निवडणूक आयोग व मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र यांनी दि. 1 जानेवारी 2024 या अर्हता दिनांकावर अधारित छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनःरीक्षण कार्यक्रम जाहीर केला आहे.  या कार्यक्रमांतर्गत 1 जानेवारी 2024 या अर्हता दिनांकावर अधारित मतदार याद्यांचे मतदान केंद्र सुसूत्रीकरण कार्यक्रमामुसार जिल्ह्यातील 255 फलटण, 256 वाई, 257 माण, 259 कराड उत्तर, 260 कराड दक्षिण, 261 पाटण, 262 सातारा या 8 विधानसभा मतदार संघांच्या प्रस्तावित प्रारुप मतदान केंद्रांची यादी जिल्हा निवडणूक शाळा, जिल्हाधिकारी कार्यालय, सातारा मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी सातारा, कराड, वाई, फलटण, माण, कोरेगाव, पाटण तसेच सहा मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसिलदार सातारा, जावळी, कोरेगाव, कराड, पाटण, वाई, महाबळेश्वर, खंडाळा, फलटण, माण (दहिवडी), खटाव यांच्या कार्यालयात नागरिकांना पाहण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे.  या  यादीवर काही सूचना असल्यास त्या 3 ऑक्टोबर 2023 पूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयास किंवा मतदार नोंदणी ...

कराडात हजारो गणेश मूर्तींचे पालिकेच्या जलकुंडात विसर्जन...

Image
कराडात हजारो गणेश मूर्तींचे पालिकेच्या जलकुंडात विसर्जन... राजू सनदी, कराड कराड दि.24-(प्रतिनिधी) गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषात शनिवारी घरगुती गणेशमूर्ती व गौरीचे विसर्जन कोयना कृष्णा नदी पात्रात भक्तीभावाने करण्यात आले. शहरात कराड नगरपरिषदेने ठिकठिकाणी ठेवलेल्या 19 जलकुंडात 1 हजार 800 गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यात आले तर सुमारे 15 ट्रॉली निर्मल्य संकलित करण्यात आले. काल विसर्जन झाल्यानंतर आज सकाळी नगर परिषदेच्या आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी नदीपात्राची स्वच्छता ही केली. कराड पालिकेने कृष्णा कोयना नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी पर्यावरणपूरक गणेशमूर्ती विसर्जनाची जनजागृती करत मूर्ती दान करण्याचे आवाहन केले आहे. या आवाहनास शहरवासीयांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत शहरातील 19 जलकुंडात गणेशमूर्तीचे विसर्जन केले. तसेच गणेश भक्तांनी निर्मल्य कलशात व अन्य ठिकाणी नदीपात्रात टाकलेले 15 ट्रॉली निर्माल्य संकलित करून कृष्णा घाट, कृष्णा कोयना नदी पात्राची स्वच्छता केली. काल पाच दिवसांच्या गणेशोत्सवाची व गौरी पूजन नंतर एकत्रित विसर्जन करण्यात आले. कृष्णा घाटावर दुपारनंतर विसर्जनासाठी मोठी गर्दी गणेश भक्त...

कराडात अनंत चतुर्थीला ईद-ए- मिलादची मिरवणूक नाही...

Image
कराडात अनंत चतुर्थीला ईद-ए- मिलादची मिरवणूक नाही... कराड दि. 20 (प्रतिनिधी) यावर्षी अनंत चतुर्थी व ईद-ए-मिलाद (पैगंबर जयंती) सण एकाच दिवशी आल्याने कराड शहरातील मुस्लिम बांधवांनी पैगंबर जयंतीची शाही दरबार मिरवणूक गुरवार दि.28 सप्टेंबर रोजी न काढता रविवार दि. 1 ऑक्टोबर रोजी काढण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी पैगंबर जयंती उत्सव कमिटीची बैठक होऊन हा निर्णय घेण्यात आला असून पोलीस प्रशासनाला याबाबतची माहिती देण्यात आली आहे. यामुळे पोलीस प्रशासनाला एकाच दिवशी विसर्जन मिरवणुका व शाही दरबार मिरवणुकीचा ताण येणार होता तो मुस्लिम बांधवांच्या निर्णयामुळे आता कमी झाला आहे. कालपासून गणेशोत्सवाची मोठ्या उत्साहात सुरुवात झाली. कराड शहरातील प्रत्येक समारंभात, उत्सवात सर्व जाती धर्माचे लोक मोठ्या उत्साहाने एकत्र येऊन सहभाग घेत असतात. यावर्षी 28 सप्टेंबर रोजी आनंत चतुर्थी आहे. शिवाय याच दिवशी ईद-ए-मिलाद (पैगंबर जयंती) आहे. या पार्श्वभूमीवर दोन वेळा झालेल्या शांतता कमिटी बैठकीत एकाच दिवशी आलेल्या या दोन सणाबाबत चर्चा करण्यात आली होती. दरम्यान पैगंबर जयंती उत्सव कमिटीची बैठक घेण्यात आली असून त्यानुसार गुरुव...

स्वच्छता महाअभियानात उपमुख्याधिकाऱ्यांसह संवर्गातील विभाग प्रमुखांची दांडी...

Image
  कराडच्या स्वच्छता महाअभियानात उपमुख्याधिकाऱ्यांसह संवर्गातील विभाग प्रमुखांची दांडी... कराड दि. 17 (प्रतिनिधी) देशभरात स्वच्छता पंधरवडा अभियान राबविण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर कराड नगरपरिषदेच्या वतीने इंडियन स्वच्छता लीग 2.0 व सफाई मित्र सुरक्षा शिबिर अंतर्गत आज कृष्णा नदीपात्रात स्वच्छता महाअभियान राबवण्यात आले. या अभियानात शहरातील सामाजिक संस्था, शाळा महाविद्यालयाचे विद्यार्थी मोठ्या प्रमाणात सहभागी झाले असताना नगरपरिषदेच्या उपमुख्याधिकारी विशाखा पवार यांच्यासह नगर परिषदेतील संवर्गातील विभाग प्रमुखांनी दांडी मारून उदासीनता दाखवल्याने अभियानात सर्वांनी नाराजी व्यक्त केली. स्वच्छता पंधरवडा अभियान राबवण्यात सध्या कराड नगरपरिषद व्यस्त आहे. त्यामुळे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्या अंतर्गत स्वच्छता पंधरवडा जनजागृती रॅलीसह आज कृष्णा नदी पात्रात व कृष्णा घाट परिसरात स्वच्छता महाअभियान राबवण्यात आले. या महाअभियानात कराड नगरपरिषद आरोग्य विभाग कर्मचाऱ्यांसह जलनिसारण अभियंता ए आर पवार, आरोग्य अभियंता आर डी भालदार, आरोग्य निरीक्षक मिलिंद शिंदे, स्वच्छता अभियान समन्वयक आशि...

कराड दक्षिण' मध्ये काँग्रेसची निघणार गावागावात जनसंवाद पदयात्रा; उद्या चचेगावातून प्रारंभ...

Image
  कराड दक्षिण' मध्ये काँग्रेसची निघणार गावागावात जनसंवाद पदयात्रा; उद्या चचेगावातून प्रारंभ... कराड दि 15-: काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या 'भारत जोडो' यात्रेला देशभरातून उदंड प्रतिसाद मिळाला. केरळ ते जम्मू काश्मीरपर्यंत देश पादाक्रांत करत राहुल गांधी यांनी काँग्रेसचा हात बळकट केला. आता गाव-तालुका स्तरावर काँग्रेसची वज्रमूठ साकारण्यासाठी महाराष्ट्र काँग्रेसच्या वतीने जनसंवाद पदयात्रा निघाली आहे. उद्यापासून कराड दक्षिण विधानसभा मतदार संघात जनसंवाद पदयात्रेला सुरुवात होत आहे. "यात्रा संवादाची, बांधिलकी लोक भावनेची" असा गजर करत काँग्रेसचे कार्यकर्ते गावोगावी जाणार आहेत. राज्याचे माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली ही यात्रा पश्चिम महाराष्ट्रात संपन्न होत आहे. त्यानुसार आ. पृथ्वीराज चव्हाण कराड दक्षिण मध्ये १६ सप्टेंबर रोजी सुरु होणाऱ्या पदयात्रेत सहभागी होणार आहेत. यावेळी कराड दक्षिणच्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन कराड दक्षिण काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मनोहर शिंदे यांनी केले. १६ सप्टेंबर रोजी सुरु ...

कराड व पाटण तालुक्यातील १६ कामांसाठी सुमारे ५ कोटी ८१ लाखाचा निधी मंजूर...

Image
कराड व पाटण तालुक्यातील १६ कामांसाठी सुमारे ५ कोटी ८१ लाखाचा निधी मंजूर... कराड दि.14-खा. श्रीनिवास पाटील यांनी सुचवलेल्या सातारा लोकसभा मतदारसंघाच्या कराड व पाटण तालुक्यातील जलसंधारणाच्या कामावरील स्थगिती राज्य शासनाकडून उठवण्यात आली आहे. त्यानुसार कराड व पाटण तालुक्यातील १६ कामांसाठी सुमारे ५ कोटी ८१ लाखाचा निधी मंजूर झाला आहे. त्यामुळे अनेक दिवसापासून प्रलंबित असणा-या सदर कामांचा प्रश्न मार्गी लागल्याने स्थानिकांना दिलासा मिळाला आहे. सातारा लोकसभा मतदारसंघातील विविध ठिकाणच्या जलसंधारणाच्या कामासाठी खा.श्रीनिवास पाटील यांच्या प्रयत्नातून यापूर्वी मोठ्या प्रमाणात निधी मंजूर झाला होता. मात्र संबंधित कामांवर स्थगिती आल्याने ही कामे प्रलंबित राहीली होती. आता राज्य शासनाने कामावरील स्थगिती उठवल्याने त्या कामांना गती प्राप्त झाली आहे.  यामध्ये कराड तालुक्यातील वहागाव व तळबीड येथे सिमेंट कॉंक्रिट बंधारा बांधणे ह्या दोन कामासाठी ५९ लक्ष ५० हजार ३६३ रूपये निधी मंजूर झाला आहे. अंतवडी (खिंड शिवार), अंतवडी (पोळ खडी शिवार), अंतवडी (रत्नकर शिवार), अंतवडी (टेक शिवार), अंतवडी (नाईकबा मंदीर शेजार...

कराडात कोणत्याही प्रकारचा मोर्चा काढणार नाही; हिंदू मुस्लिम समाजाकडून पोलीस प्रशासनाला आश्वासन...

Image
कराडात कोणत्याही प्रकारचा मोर्चा काढणार नाही; हिंदू मुस्लिम समाजाकडून पोलीस प्रशासनाला आश्वासन... कराड दि. 14 (प्रतिनिधी) पुसेसावळी येथे सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट व्हायरल झाल्यानंतर जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी सातारा जिल्हा पोलीस प्रशासनाच्या वतीने प्रयत्न सुरू आहेत. सध्या जिल्ह्यात या प्रकारानंतर विविध संघटनांकडून मोर्चे, प्रति मोर्चे काढण्याबाबत सुरू असलेल्या नियोजना नंतर पोलीस प्रशासनाने संबंधित समाज बांधवा समवेत बैठका घेऊन याबाबत चर्चा सुरू केली आहे. त्या अनुषंगाने आज कराड येथे अप्पर पोलीस अधीक्षक बापू बांगर तसेच डी वाय एस पी अमोल ठाकूर यांच्या उपस्थित बैठका घेण्यात आल्या. या बैठकीत दोन्ही समाज बांधवाकडून कोणत्याही प्रकारचे मोर्चे काढण्यात येणार नसल्याचे सांगून शांतता अबाधित राखण्याचे आश्वासन दिले. कराड उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयात अप्पर पोलीस अधीक्षक बापू बांगर यांच्या अध्यक्षतेखाली डी वाय एस पी अमोल ठाकूर यांच्या उपस्थित झालेल्या बैठकीमध्ये हिंदुत्ववादी संघटनांनी आम्ही शांतता प्रिय असून कराडच्या शांततेला तडा जाईल असे कोणतेही वर्तन करणार नाही किंवा मोर्चा क...

स्वच्छता पंधरवडा-कराडात शनिवारी नगरपरिषदेकडून जनजागृती रॅली तर रविवारी स्वच्छता महाअभियानाचे आयोजन...

Image
स्वच्छता पंधरवडा-कराडात शनिवारी नगरपरिषदेकडून जनजागृती रॅली तर रविवारी स्वच्छता महाअभियानाचे आयोजन... कराड दि. 14 (प्रतिनिधी) देशभरात 15 सप्टेंबर ते 2 ऑक्टोंबर 2023 या कालावधीत स्वच्छता पंधरवडा अभियान राबवण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर कराड नगर परिषदेच्या वतीने शनिवार दि. 16 सप्टेंबर रोजी दत्त चौकातून स्वच्छता पंधरवडा जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. तर रविवारी 17 सप्टेंबर रोजी कृष्णा घाटावर नदीपात्रात स्वच्छता महाअभियान राबवण्यात येणार असल्याची माहिती मुख्याधिकारी संजय गायकवाड यांनी दिली. स्वच्छ भारत अभियान 2.0 अंतर्गत केंद्र सरकारने याबाबत जारी केलेल्या आदेशानुसार 15 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीत स्वच्छता पंधरवडा आयोजित करावयाचे आदेश दिले आहेत. या अभियानाचा एक भाग म्हणून इंडियन स्वच्छता लीग 2.0 चा दुसरा हंगाम व सफाई मित्र यांच्याकरिता सेवा व सुरक्षा शिबिर आयोजित करावयाचे आहे. इंडियन स्वच्छता लीग 2.0 च्या अनुषंगाने कराड नगरपरिषदेच्या आरोग्य विभागाच्या वतीने शनिवार दि. 16 सप्टेंबर रोजी दत्त चौकातून सकाळी 9 वाजता स्वच्छता पंधरवडा जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे या...

कराडला रविवारी "आदरणीय पी. डी. पाटील महाराष्ट्र भूषण पुरस्कार" प्रदान समारंभ...

Image
कराडला रविवारी "आदरणीय पी. डी. पाटील महाराष्ट्र भूषण पुरस्कार" प्रदान समारंभ... कराड -दि.14- येथील आदरणीय पी. डी. पाटील गौरव प्रतिष्ठान च्यावतीने दिला जाणारा  "आदरणीय पी. डी. पाटील महाराष्ट्र भूषण पुरस्कार" जागतिक ख्यातीचे संशोधक डॉ. चंद्रकांत लोखंडे(सर ),कोल्हापूर यांना  डॉ.श्रीपाल सबनीस, ज्येष्ठ साहित्यिक व विचारवंत आणि माजी अध्यक्ष अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन यांचे शुभहस्ते व आमदार बाळासाहेब पाटील, प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष, महाराष्ट्र राज्याचे माजी सहकार व पणन मंत्री यांचे अध्यक्षतेखाली, समारंभ पूर्वक प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष डॉ. अशोकराव गुजर यांनी पत्रकाद्वारे दिली आहे. सदरचा समारंभ रविवार, दि.17 सप्टेंबर 2023 रोजी,सायंकाळी 4.00 वाजता, यशवंतराव चव्हाण स्मृती सदन,  या ठिकाणी होणार असल्याचे म्हंटले आहे. नागरिकांनी या समारंभास उपस्थित राहण्याचे आवाहन  डॉ. गुजर व सर्व विश्वस्त यांचेवतीने करण्यात आले आहे.

सोशल मीडियावर आक्षेपार्ह वादग्रस्त वक्तव्य केल्यास वैयक्तिकरित्या जबाबदार धरून कारवाई करण्याचा कराड पोलिसांचा इशारा...

Image
  सोशल मीडियावर आक्षेपार्ह वादग्रस्त वक्तव्य केल्यास वैयक्तिकरित्या जबाबदार धरून कारवाई करण्याचा कराड पोलिसांचा इशारा... कराड दि. 14 (प्रतिनिधी)  इन्स्टाग्राम, फेसबुक, व्हॉटसअॅप, ट्विटर, हॅलो, टेलीग्राम किंवा इतर कोणत्याही डिजीटल माध्यमाव्दारे दोन समाजामध्ये जातीय, धार्मिक श्रध्दांचा अपमान करणारे व दोन जाती व धर्मामध्ये तेढ निर्माण करणारे आक्षेपार्ह संदेश तयार करून फॉरवर्ड केल्यास वैयक्तिकरित्या जबाबदार धरून कारवाई करण्याचा इशारा कराड शहर पोलीस निरीक्षक प्रदीप सूर्यवंशी यांनी आज आदेशाद्वारे दिला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप सूर्यवंशी यांनी काढलेले आदेशात म्हटले आहे की, ज्या अर्थी मौजे पुसेसावळी ता. खटाव जिल्हा सातारा या ठिकाणी सोशन मिडीयावर आक्षेपार्ह संदेश प्रसारीत झालेवरून जातीय तणाव निर्माण झालेला आहे. या अनुषंगाने मा. जिल्हादंडाधिकारी सातारा यांनी क्र. डिसी / एमएजी / २ / एसआर / २८/२०२३ दिनांक. १२/९/२०२३ अन्वये दिनांक. १३/९/२०२३ रोजीचे ००.०० वा पासुन ते दिनांक १५/९/२०२३ रोजीचे २४.०० वा पर्यंत फौजदार प्रक्रिया संहिता कलम १४४ अन्वये प्रतिबंधात्मक आदेश जारी केलेले आहेत. व...

भाजपा कार्यकर्त्यांकडून उपमुख्यमंत्री ना. अजित पवार यांचे कराडमध्ये स्वागत...

Image
  भाजपा कार्यकर्त्यांकडून उपमुख्यमंत्री ना. अजित पवार यांचे कराडमध्ये स्वागत... कराड दि.10-महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री ना. अजित पवार यांचे आज कराडमध्ये आगमन होताच भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी त्यांचे कोल्हापूर नाका येथील महात्मा गांधी पुतळ्याजवळ स्वागत केले. उपमुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच कराड दौऱ्यावर आलेल्या उपमुख्यमंत्री ना. अजित पवार यांच्या स्वागतासाठी कार्यकर्त्यांनी कोल्हापूर नाका येथील महात्मा गांधी पुतळ्याजवळ मोठी गर्दी केली होती. यावेळी उपमुख्यमंत्री ना. पवार यांनी महात्मा गांधींच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर भाजपा कार्यकर्त्यांनी ना. पवार यांना पुष्पगुच्छ प्रदान करत  त्यांचे कराडनगरीत जल्लोषात स्वागत केले.  याप्रसंगी माजी आमदार आनंदराव पाटील, य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे संचालक श्रीरंग देसाई, सयाजी यादव, कृष्णा कृषी विकास परिषदेचे अध्यक्ष गजेंद्र पाटील, आर. टी. स्वामी, राजाभाऊ उंडाळकर, मलकापूरचे माजी नगराध्यक्ष आबासाहेब गावडे, नांदगांवचे सरपंच पैलवान हंबीरराव पाटील, रमेश लवटे, भाजपचे माजी तालुकाध्यक्ष हर...

कराड अर्बन बँकेने आयोजित केलेल्या वॉकेथॉन (Walkathon) ला उस्फूर्त प्रतिसाद...

Image
कराड अर्बन बँकेने आयोजित केलेल्या वॉकेथॉन (Walkathon) ला उस्फूर्त प्रतिसाद... कराड दि.10-सातारा व कराड शहर आणि परिसरातील नागरिकांना उत्तम आरोग्याचा कानमंत्र देण्याचा मानस ठेवून "Walk For Obesity & Diabetes Free World" साठी बँकेने सातारा व कराड शहरामध्ये ५ किमी. चालण्याच्या वॉकॅथॉनचे आयोजन केले होते. या वॉकॅथॉनचा शुभारंभ बँकेच्या मुख्यकार्यालयापासून अर्बन कुटुंब प्रमुख व बँकेचे ज्येष्ठ संचालक सुभाषराव जोशी, अध्यक्ष डॉ. सुभाष एरम, उपाध्यक्ष समीर जोशी व मुख्य कार्यकारी अधिकारी सीए. दिलीप गुरव यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आज सकाळी करण्यात आला. यावेळी अर्बन बझारच्या अध्यक्षा सायली जोशी, उपाध्यक्षा जयश्री गुरव, बँकेचे संचालक, व्यवस्थापन मंडळ सदस्य, महाव्यवस्थापक, वरिष्ठ अधिकारी व अर्बन कुटुंबातील सर्व सदस्य उपस्थित होते. कराड अर्बन बँकेने अर्थकारणाबरोबरच सामाजिक बांधिलकीची जाण ठेवत अनेक समाजाभिमुख उपक्रम सातत्याने सुरू ठेवले आहेत. यामध्ये विद्याथ्यांसाठी उद्योजकता विकास शिबीर, दिव्यांगांसाठी अस्थिअपंग शिबीर, रोडरेस स्पर्धा, देशभक्तीपर समुहगीत गायन स्पर्धा, पर्यावरण दिनानिमित्त ...

कराडच्या लोक अदालती मध्ये 900 हून अधिक प्रकरणे निकाली; 5 कोटी 37 लाखाची वसुली...

Image
  कराडच्या लोक अदालती मध्ये 900 हून अधिक प्रकरणे निकाली; 5 कोटी 37 लाखाची वसुली... कराड दि.9 (प्रतिनिधी) राष्ट्रीय विधी सेवा समिती व महाराष्ट्र राज्य विधी सेवा समिती यांचे निदर्शनानुसार जिल्हा विधी सेवा समिती, सातारा यांचे मार्गदर्शनाखाली आज कराड तालुका विधी सेवा समिती व वकील बार संघ, कराड यांचे संयुक्त विद्यमानाने राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करणेत आले. सदरहू लोक अदालतीमध्ये दिवाणी, फौजदारी, मोटार अपघात, लॅन्ड रेफरन्स व वादपूर्व प्रकरणे ठेवणेत आलेली होती. यामध्ये सुमारे 900 हून अधिक प्रकरणे निघाली काढून 5 कोटी 37 लाख रुपयांची वसुली करण्यात आली आहे. राष्ट्रीय लोक अदालतीच्या यशस्वीतेसाठी वेळोवेळी सातारा जिल्हा न्यायाधीश प्रमुख एस एस अडकर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. सदरहू प्रकरणात सामजंस्यपणे आपआपसात तोडजोड होणेसाठी कराड जिल्हा न्यायालयाचे जिल्हा न्यायाधीश - १ श्रीमती उल्का जोशी, डी.बी. पतंगे साहेब तसेच दिवाणी न्यायाधीश खोत साहेब, देशमुख साहेब, श्रीमती देशमुख मॅडम, पुनावाला मॅडम कु-हेकर साहेब तसेच श्रीमती विराणी मॅडम, श्रीमती भोसले मॅडम, श्रीमती जाधव मॅडम, भागवत साहेब श्रीमती शेला...

उंडाळकर विद्यालयात शाडूच्या मातीपासून गणेश मूर्ती तयार करण्याच्या कार्यशाळेत विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद...

Image
उंडाळकर विद्यालयात शाडूच्या मातीपासून गणेश मूर्ती तयार करण्याच्या कार्यशाळेत विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद... उंडाळे दि.9-येथील स्वातंत्र्यवीर दादासाहेब उंडाळकर माध्यमिक विद्यालयातील राष्ट्रीय हरित सेना व एस आर दळवी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने प्रदूषण मुक्त गणेशोत्सव साजरा व्हावा यासाठी शाडूच्या मातीपासून गणेश मूर्ती तयार करण्याची कार्यशाळा उत्साहात संपन्न झाली. या कार्यशाळेत विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत 175 गणेश मूर्ती तयार केल्या येथील स्वातंत्र्यवीर दादासाहेब उंडाळकर विद्यालयात  समाज उपयोगी,, पर्यावरण पूरक विविध उपक्रम राबवले जातात त्याचाच एक भाग म्हणून विद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी गणेश मूर्ती बनवण्याची कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेचे उद्घाटन प्राचार्य बी आर पाटील, एस आर दळवी फाउंडेशन चे सल्लागार मोहनराव पाटील, पर्यवेक्षक जे एस माळी, यांच्या हस्ते करण्यात आले.या वेळी धनंजय पवार, शंकर आंबवडे अनिल सुतार आदी उपस्थिती होती.  गणेशमूर्ती कशा बनवाव्यात हे शिकवण्यासाठी दामोदर दीक्षित, विद्यालयातील कलाशिक्षक अनिल सुतार, सिद्धार्थ कुंभार, धनंजय पवार...

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार उद्या कराडात...

Image
 राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार उद्या कराडात... कराड दि.9 (प्रतिनिधी) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून अजित पवार यांनी बंडखोरी केल्यानंतर त्यांनी शिंदे फडणवीस सरकारमध्ये मंत्रिपदाची शपथ घेतली, त्यांच्याबरोबर इतर आठ जणांनी ही मंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्यांदाच अजित पवार सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. उद्या रविवारी दुपारी एक वाजता अजित पवार प्रीतीसंगमावरील समाधीचे दर्शन घेऊन उपस्थिताना मार्गदर्शन करणार असल्याची माहिती सातारा जिल्हा बँकेचे अध्यक्ष नितीन पाटील यांनी 'कराड टुडे'शी बोलताना दिली. माजी मंत्री रामराजे नाईक निंबाळकर तसेच आ. मकरंद पाटील यांनी अजित दादांच्या दौऱ्याची तयारी केली असून जिल्ह्यात त्यांचे मोठ्या उत्साहाने स्वागत करण्यात येणार असल्याचेही पाटील म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात बंडखोरी झाल्यानंतर पक्षाचे अध्यक्ष शरद पवार कराड दौऱ्यावर आले होते. त्यांनी स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीचे दर्शन केल्यानंतर उपस्थित हजारो समर्थकांना मार्गदर्शन केले होते. पवार समर्थक आ. बाळासाहेब पाटील यांनी ऐनवेळी पवार साहेबांच्या स्वागताची तयारी केली होती. शरद पवार ...

विद्यार्थ्यांनी नवनिर्मिती, सर्जनशीलतेचा ध्यास घ्यावा : डॉ. वेदप्रकाश मिश्रा...

Image
विद्यार्थ्यांनी नवनिर्मिती, सर्जनशीलतेचा ध्यास घ्यावा : डॉ. वेदप्रकाश मिश्रा... कृष्णा विश्व विद्यापीठात आयोजित ‘कृषी विज्ञान विधी’ राष्ट्रीय परिषदेचा समारोप... कराड दि.9: सर्जनशीलतेवर कुणाचाही एकाधिकार नाही. प्रत्येकाच्या मनामध्ये दडलेली जिज्ञासूवृत्तीच तुम्हाला नवनिर्मितीकडे घेऊन जात असते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी जीवनात यशस्वी होण्यासाठी नवनिर्मिती व सर्जनशीलतेचा ध्यास घ्यावा, असे आवाहन कृष्णा विश्व विद्यापीठाच्या कुलपतींचे प्रधान सल्लागार डॉ. वेदप्रकाश मिश्रा यांनी केले. कृष्णा विश्व विद्यापीठात आयोजित राष्ट्रीय परिषदेचा समारोपप्रसंगी अध्यक्षस्थानावरुन ते बोलत होते.  कृष्णा विश्व विद्यापीठ, जयवंतराव भोसले कृष्णा कृषी महाविद्यालय आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे रिसर्च पार्क फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने व पंजाब येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी रोपर यांच्या सहकार्यातून कृष्णा विद्यापीठात आयोजित दोनदिवसीय ‘कृषी विज्ञान विधी’ राष्ट्रीय परिषदेचा समारोप उत्साहात झाला.  व्यासपीठावर पुणे येथील जी. एच. रायसोनी इंजिनिअरिंग महाविद्यालयाचे संचालक डॉ. आर. डी. खराडकर,...

बीएसएनएल टॉवरमुळे स्थानिकांचे जीवनमान उंचावेल;सारंग पाटील...

Image
बीएसएनएल टॉवरमुळे स्थानिकांचे जीवनमान उंचावेल;सारंग पाटील... कराड दि.8-संभाषणाची साधने दुर्गम वाड्यावस्त्यांवर पोहोचावीत यासाठी खासदार श्रीनिवास पाटील प्रयत्नशील राहिले आहेत. त्यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेल्‍या बीएसएनएल टॉवरमुळे स्थानिकांचे जीवनमान उंचावेल असे मत राष्ट्रवादीच्या आयटी सेलचे प्रदेशाध्यक्ष सारंग पाटील यांनी व्यक्त केले. खा.श्रीनिवास पाटील यांच्या प्रयत्नातून पाटण तालुक्यातील वरपेवाडी, पाणेरी, तामिणे, कारळे याठिकाणी मंजूर झालेल्या बीएसएनएल टॉवरच्या भूमिपूजन निमित्ताने स्थानिक ग्रामस्थांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. सारंग पाटील म्हणाले, ग्रामीण भागाला बीएसएनएलच्या दूरध्वनी आणि मोबाईल सेवेवर अवलंबून रहावे लागते. मात्र टॉवरची संख्या कमी असल्यामुळे रेंज नसल्याचा अऩुभव बऱ्याचदा येतो. परिणामी ग्रामीण भागात अनेक ठिकाणी संपर्क होऊ शकत नाही. दुर्गम वाड्या-वस्त्यांची तर आणखीनच बिकट परिस्थिती आहे. मोबाईल ही काळाची गरज बनली आहे. त्यामुळे प्रत्येक गावोगावी मोबाईल नेटवर्क उपलब्ध होणे आवश्यक आहे. संभाषणाची साधने दुर्गम वाड्यावस्त्यांवर पोहोचावीत यासाठी खासदार श्रीनिवास प...

स्मार्ट शेतीसाठी कृषीक्षेत्रात प्रगत तंत्रज्ञानाचा वापर वाढविणे आवश्यक : डॉ. प्रशांतकुमार पाटील...

Image
  कराड : कृष्णा विश्व विद्यापीठात आयोजित कृषीविषयक राष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. प्रशांतकुमार पाटील. बाजूस कुलपती डॉ. सुरेश भोसले व अन्य मान्यवर... स्मार्ट शेतीसाठी कृषीक्षेत्रात प्रगत तंत्रज्ञानाचा वापर वाढविणे आवश्यक : डॉ. प्रशांतकुमार पाटील... कृष्णा विश्व विद्यापीठात ‘कृषी विज्ञान विधी’ राष्ट्रीय परिषदेला प्रारंभ.. कराड दि. 8: कृषीक्षेत्रात अलीकडच्या काळात रोबोटिक व ड्रोन यासारख्या तंत्रज्ञानाचा अवलंब वाढत आहे. अशा नाविण्यपूर्ण प्रगत तंत्रज्ञानाचा वापर वाढविल्यास स्मार्ट पद्धतीने कृषीक्षेत्राचा विकास करणे शक्य आहे, असे प्रतिपादन राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. प्रशांतकुमार पाटील यांनी केले. कृष्णा विश्व विद्यापीठात आयोजित कृषीविषयक राष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी कृष्णा विश्व विद्यापीठाचे कुलपती डॉ. सुरेश भोसले होते. कृष्णा विश्व विद्यापीठ, जयवंतराव भोसले कृष्णा कृषी महाविद्यालय आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे रिसर्च पार्क फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने व ...