कराडच्या लोक अदालती मध्ये 900 हून अधिक प्रकरणे निकाली; 5 कोटी 37 लाखाची वसुली...
कराडच्या लोक अदालती मध्ये 900 हून अधिक प्रकरणे निकाली; 5 कोटी 37 लाखाची वसुली...
कराड दि.9 (प्रतिनिधी) राष्ट्रीय विधी सेवा समिती व महाराष्ट्र राज्य विधी सेवा समिती यांचे निदर्शनानुसार जिल्हा विधी सेवा समिती, सातारा यांचे मार्गदर्शनाखाली आज कराड तालुका विधी सेवा समिती व वकील बार संघ, कराड यांचे संयुक्त विद्यमानाने राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करणेत आले. सदरहू लोक अदालतीमध्ये दिवाणी, फौजदारी, मोटार अपघात, लॅन्ड रेफरन्स व वादपूर्व प्रकरणे ठेवणेत आलेली होती. यामध्ये सुमारे 900 हून अधिक प्रकरणे निघाली काढून 5 कोटी 37 लाख रुपयांची वसुली करण्यात आली आहे.
राष्ट्रीय लोक अदालतीच्या यशस्वीतेसाठी वेळोवेळी सातारा जिल्हा न्यायाधीश प्रमुख एस एस अडकर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. सदरहू प्रकरणात सामजंस्यपणे आपआपसात तोडजोड होणेसाठी कराड जिल्हा न्यायालयाचे जिल्हा न्यायाधीश - १ श्रीमती उल्का जोशी, डी.बी. पतंगे साहेब तसेच दिवाणी न्यायाधीश खोत साहेब, देशमुख साहेब, श्रीमती देशमुख मॅडम, पुनावाला मॅडम कु-हेकर साहेब तसेच श्रीमती विराणी मॅडम, श्रीमती भोसले मॅडम, श्रीमती जाधव मॅडम, भागवत साहेब श्रीमती शेलार मॅडम तसेच कराड बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. शशिकांत मोहिते, उपाध्यक्ष अॅड. गरूड, सचिव अॅड. जाधव तसेच पॅनल सदस्य अॅड. साईप्रसाद पाटील, अॅड. मनिषा पाटील, अॅड. मुल्ला, अॅड. पवार मॅडम, अॅड. रोहिणी सावंत तसेच अधिक्षक एम.पी. माने, सहा. अधिक्षक शेलार, श्रीमती सोरटे, श्रीमती जगदाळे तसेच तालुका सेवा समितीचे सचिव भोपते सर्व न्यायालयीन कर्मचारी, शिपाई इत्यादींचे सहकार्य लाभले.
सदर लोक अदालतमध्ये एकूण ९०४ प्रकरणे निकाली काढणेत आली. त्यापैकी वादपूर्व प्रकरणे १८० व न्यायालयातील प्रलंबीत प्रकरणे ७२४ तडजोड निकाली करणेत आली. प्रलंबीत प्रकरणामध्ये रक्कम रू.५ कोटी ३७ लाख एवढी रक्कम वसूल करणेत आली तसेच वादपूर्व प्रकरणामध्ये रक्कम रू.०१ कोटी २६ लाख एवढी रक्कम वसूल करणेत आली. या लोकअदालतीमध्ये प्रणीता शिंदे वि. निखील शिंदे व खलीफा शेख वि. दस्तगीर शेख या दोन जोडप्यामधील वाद संपुष्टात येवून त्यांचे वैवाहीक जीवन पुर्नप्रस्थापीत झाले. तसेच या लोक अदालतीमध्ये शांतता व सुव्यवस्थेसाठी उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकूर यांचे सहकार्य लाभले तसेच ग्रामपंचायत, बँक, एम.ए.सी.बी. पतसंस्था यांनी या लोकअदालतीमध्ये उत्कृष्ठ प्रतिसाद देवून मोलाचे सहकार्य केले.



Comments
Post a Comment