सोशल मीडियावर आक्षेपार्ह वादग्रस्त वक्तव्य केल्यास वैयक्तिकरित्या जबाबदार धरून कारवाई करण्याचा कराड पोलिसांचा इशारा...

 

सोशल मीडियावर आक्षेपार्ह वादग्रस्त वक्तव्य केल्यास वैयक्तिकरित्या जबाबदार धरून कारवाई करण्याचा कराड पोलिसांचा इशारा...

कराड दि. 14 (प्रतिनिधी)  इन्स्टाग्राम, फेसबुक, व्हॉटसअॅप, ट्विटर, हॅलो, टेलीग्राम किंवा इतर कोणत्याही डिजीटल माध्यमाव्दारे दोन समाजामध्ये जातीय, धार्मिक श्रध्दांचा अपमान करणारे व दोन जाती व धर्मामध्ये तेढ निर्माण करणारे आक्षेपार्ह संदेश तयार करून फॉरवर्ड केल्यास वैयक्तिकरित्या जबाबदार धरून कारवाई करण्याचा इशारा कराड शहर पोलीस निरीक्षक प्रदीप सूर्यवंशी यांनी आज आदेशाद्वारे दिला आहे.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप सूर्यवंशी यांनी काढलेले आदेशात म्हटले आहे की, ज्या अर्थी मौजे पुसेसावळी ता. खटाव जिल्हा सातारा या ठिकाणी सोशन मिडीयावर आक्षेपार्ह संदेश प्रसारीत झालेवरून जातीय तणाव निर्माण झालेला आहे. या अनुषंगाने मा. जिल्हादंडाधिकारी सातारा यांनी क्र. डिसी / एमएजी / २ / एसआर / २८/२०२३ दिनांक. १२/९/२०२३ अन्वये दिनांक. १३/९/२०२३ रोजीचे ००.०० वा पासुन ते दिनांक १५/९/२०२३ रोजीचे २४.०० वा पर्यंत फौजदार प्रक्रिया संहिता कलम १४४ अन्वये प्रतिबंधात्मक आदेश जारी केलेले आहेत. व या अदेशाचा भंग होवून कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होणेची शक्यता आहे.

त्या अर्थी मी पी.बी.सुर्यवंशी वरिष्ठ पोलीस निरीक्षक तथा प्रभारी अधिकारी कराड शहर पोलीस ठाणे मला प्राप्त झालेल्या अधिकाराचा वापर करून फौजदारी प्रक्रिया संहिता कलम १४९ प्रमाणे कळवितो की, आपणाकडून अगर आपले सहकारी यांचेकडून सोशल मिडीयावर उदा. इन्स्टाग्राम, फेसबुक, व्हॉटसअॅप, ट्विटर, हॅलो, टेलीग्राम किंवा इतर कोणत्याही डिजीटल माध्यमाव्दारे दोन समाजामध्ये जातीय, धार्मिक श्रध्दांचा अपमान करणारे व दोन जाती व धर्मामध्ये तेढ निर्माण करणारे आक्षेपार्ह संदेश तयार करून फॉरवर्ड करणे, सामाजिक स्वास्थ बिघडेल अशी कृती करणे, मोर्चा काढणे, गर्दी जमविणे, प्रक्षोभक वक्तव्य करणं, प्रतिकात्मक प्रतिमा/ पुतळे यांचे प्रदर्शन व दहन करणे, सार्वजनिक वाहतुकीस अडथळा निर्माण करणे, कोणताही दाहक पदार्थ जवळ बाळगणे किवा शारिरीक इजा करण्यासाठी वापरता येईल अशी कोणतीही वस्तु जवळ बाळगणे, सार्वजनिकरितीने घोषणाबाजी करणे, वादय वाजविणे, तोडफोड करणे, शासकिय तसेच खाजगी मालमत्तेचे नुकसान करणे असे गैरकृत्य झाल्यास आपणास वैयक्तिकरित्या जबाबदार धरण्यात येवून आपणा विरुध्द प्रचलित कायदयान्वये कारवाई करणेत येईल व सदरची नोटीस मा. न्यायालयात आपणा विरुद्ध कायदेशीर पुरावा म्हणून सादर करणेत येईल याची आपण नोंद घ्यावी. सदरची नोटीस ही माझ्या सहीशिक्यानिशी दिनांक १४/९/२०२३ रोजी देण्यात आलेली आहे.

Comments

Karad Today News

कराड शहरातील दोन गुन्हेगाराकडून चोरीच्या 9 मोटरसायकली जप्त

स्व. यशवंतराव चव्हाण कृषि प्रदर्शनाच्या मंडप उभारणीस प्रारंभ

वारुंजी जिल्हा परिषद गटावर काँग्रेसचा झेंडा फडकवा – पृथ्वीराज चव्हाण

मलकापूर नगरपरिषद निवडणुकीत भाजपाचे नगराध्यक्ष पदासह 18 नगरसेवक विजयी

सुपने जिल्हा परिषद गट काँग्रेसने ताकदीने लढावा –कार्यकर्त्यांचा पृथ्वीराज चव्हाण यांच्यासमोर आग्रह

कराडमध्ये रविवारी रंगणार ‘कृष्णा मॅरेथॉन’चा थरार

मल्हारपेठ - पंढरपूर रस्त्याच्या कामविरोधात बाधित शेतकरी आक्रमक