कराड शहरात अनंत चतुर्थी दिवशी वाहतुकीत बदल...


कराडात अनंत चतुर्थी दिवशी वाहतुकीत बदल...

राजू सनदी कराड

कराड दि. 26 (प्रतिनिधी) अनंत चतुर्थी दिवशी गणेश विसर्जन मिरवणुक अनुषंगाने कराड शहरातील वाहतुक मार्गातील तात्पुरता बदल करण्यात आला असून शहरातील नागरिकांना त्यादिवशी वाहतुकीच्या बदललेल्या मार्गाचा वापर करावा असे आवाहन कराड वाहतूक नियंत्रण शाखेच्या वतीने सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन मछले यांनी केले आहे.

दिनांक २८ सप्टेंबर रोजी अनंत चर्तुदशी असल्याने कराड शहरातील तसेच कराड तालुक्यातील सार्वजनिक गणेश मंडळांच्या तसेच घरगुती गणेश मुर्तीचे मोठया प्रमाणात विसर्जन होणार आहे. सार्वजनिक गणेश मंडळाच्या गणेश मुर्ती या दत्त चौक येथून मिरवणुकीने कृष्णा घाट येथे जात असतात, त्यामुळे दत चौक ते कृष्णा घाट व कमानी मारुती-चावडी चौक कृष्णा घाट या मेन रोडला येणारी सर्व वाहतुक मार्गात विसर्जन दिवसांकरीता अंशतः तात्पुरता बदल करण्यात आला आहे याची सर्वानी नोंद घ्यावी.

सातारा पोलीस अधिक्षक समीर शेख यांनी मुंबई पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३४ अन्वये असलेल्या अधिकारान्वये दिनांक २८/०९/२०२३ चे ०६.०० वा. पासुन ते दिनांक २९/०९/२०२३ रोजीचे सकाळी ०७.०० वा. पर्यतचे कालावधीत गणेश विसर्जन करीता वाहतुक व्यवस्था सुरळीत राहणेकामी खालील प्रमाणे सर्व वाहनांचे वाहतुक मार्गात अंशतः व तात्पुरता बदल करणेत आलेला आहे याची सर्वानी नोंद घ्यावी.

१) कृष्णा नाका बाजुकडुन कराड शहरात सोमवार पेठ मार्गे कृष्णा घाटकडे जाणारी वाहतुक ही कृष्णा नाका जोतीबा मंदीर-कमानी मारुती मंदीर सोमवार पेठ-पाण्याची टाकी जनकल्याण बैंक या मार्गे जाईल तसेच सोमवार पेठ येथील नागरिक कराड शहरातुन बाहेर जाण्यासाठी याच मार्गाचा वापर करतील.

२) कोल्हापुर नाका बाजुकडुन कराड शहरात येणारी व कृष्णा घाटाकडे जाणारी वाहतुक ही दत्त चौक आझाद चौक- सात शहीद चौक शुक्रवार पेठ-बालाजी मंदीर या मार्गावरुन जाईल.

३) दत्त चौक- यशवंत हायस्कुल आझाद चौक नेहरु चौक चावडी चौक बालाजी मंदीर झेंडा चौक- कृष्णा घाट या गणेश विसर्जन मिरवणुक मार्गावर सर्व वाहनांना (दुचाकी, चारचाकी, अवजड वाहने) प्रवेश करण्यास अथवा पार्कीग करण्यास मनाई करणेत आलेली आहे.

४) दत्त चौकाकडे येणा-या सर्व अवजड वाहनांना प्रवेश बंद करणेत आलेला आहे.

५) आपतकालीन परस्थितीमध्ये नेहमीच मिरवणुक मार्गासाठी पर्यायी रस्ता कर्मवीर पतळा-पायल फुटवेअर- अंडी चौक ते पाण्याची टाकी, रविवार पेठ ते नेहरू चौक या मार्गावरील दुर्तफा दुचाकी व चारचाकी वाहने नो पार्किंग झोन करणेत आलेला आहे.

६) वरील सर्व मार्गावर रुग्णवाहीका, अग्निशामक वाहने, पोलीस दलाची वाहने वगळुन इतर सर्व वाहनांच्या मार्गात उपरोक्त प्रमाणे बदल करणेत आलेला आहे.


Comments

Karad Today News

कराड शहरातील दोन गुन्हेगाराकडून चोरीच्या 9 मोटरसायकली जप्त

स्व. यशवंतराव चव्हाण कृषि प्रदर्शनाच्या मंडप उभारणीस प्रारंभ

वारुंजी जिल्हा परिषद गटावर काँग्रेसचा झेंडा फडकवा – पृथ्वीराज चव्हाण

मलकापूर नगरपरिषद निवडणुकीत भाजपाचे नगराध्यक्ष पदासह 18 नगरसेवक विजयी

सुपने जिल्हा परिषद गट काँग्रेसने ताकदीने लढावा –कार्यकर्त्यांचा पृथ्वीराज चव्हाण यांच्यासमोर आग्रह

कराडमध्ये रविवारी रंगणार ‘कृष्णा मॅरेथॉन’चा थरार

मल्हारपेठ - पंढरपूर रस्त्याच्या कामविरोधात बाधित शेतकरी आक्रमक