कराडला रविवारी "आदरणीय पी. डी. पाटील महाराष्ट्र भूषण पुरस्कार" प्रदान समारंभ...
कराडला रविवारी "आदरणीय पी. डी. पाटील महाराष्ट्र भूषण पुरस्कार" प्रदान समारंभ...
कराड -दि.14- येथील आदरणीय पी. डी. पाटील गौरव प्रतिष्ठान च्यावतीने दिला जाणारा "आदरणीय पी. डी. पाटील महाराष्ट्र भूषण पुरस्कार" जागतिक ख्यातीचे संशोधक डॉ. चंद्रकांत लोखंडे(सर ),कोल्हापूर यांना डॉ.श्रीपाल सबनीस, ज्येष्ठ
साहित्यिक व विचारवंत आणि माजी अध्यक्ष अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन यांचे शुभहस्ते व आमदार बाळासाहेब पाटील, प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष, महाराष्ट्र राज्याचे माजी सहकार व पणन मंत्री यांचे अध्यक्षतेखाली, समारंभ पूर्वक प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष डॉ. अशोकराव गुजर यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.
सदरचा समारंभ रविवार, दि.17 सप्टेंबर 2023 रोजी,सायंकाळी 4.00 वाजता, यशवंतराव चव्हाण स्मृती सदन, या ठिकाणी होणार असल्याचे म्हंटले आहे. नागरिकांनी या समारंभास उपस्थित राहण्याचे आवाहन डॉ. गुजर व सर्व विश्वस्त यांचेवतीने करण्यात आले आहे.

Comments
Post a Comment