मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनःरीक्षण कार्यक्रम....
मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनःरीक्षण कार्यक्रम....
सातारा दि. 25–भारत निवडणूक आयोग व मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र यांनी दि. 1 जानेवारी 2024 या अर्हता दिनांकावर अधारित छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनःरीक्षण कार्यक्रम जाहीर केला आहे.
या कार्यक्रमांतर्गत 1 जानेवारी 2024 या अर्हता दिनांकावर अधारित मतदार याद्यांचे मतदान केंद्र सुसूत्रीकरण कार्यक्रमामुसार जिल्ह्यातील 255 फलटण, 256 वाई, 257 माण, 259 कराड उत्तर, 260 कराड दक्षिण, 261 पाटण, 262 सातारा या 8 विधानसभा मतदार संघांच्या प्रस्तावित प्रारुप मतदान केंद्रांची यादी जिल्हा निवडणूक शाळा, जिल्हाधिकारी कार्यालय, सातारा मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी सातारा, कराड, वाई, फलटण, माण, कोरेगाव, पाटण तसेच सहा मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसिलदार सातारा, जावळी, कोरेगाव, कराड, पाटण, वाई, महाबळेश्वर, खंडाळा, फलटण, माण (दहिवडी), खटाव यांच्या कार्यालयात नागरिकांना पाहण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे.
या यादीवर काही सूचना असल्यास त्या 3 ऑक्टोबर 2023 पूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयास किंवा मतदार नोंदणी अधिकारी, सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी यांच्या कार्यालयास सादर करावी. तसेच सदरची यादी जिल्हाधिकारी सातारा यांचे संकेतस्थळ satara.nic.in यावरही अवलोकनार्थ प्रसिद्ध करण्यात आली आहे. तरी सर्व नागरिकांनी या विशेष संक्षिप्त पुनःरीक्षण मोहिमेचा लाभ घ्यावा असे आवाहन जितेंद्र डूडी, जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी केले आहे.

Comments
Post a Comment