कराडात अनंत चतुर्थीला ईद-ए- मिलादची मिरवणूक नाही...


कराडात अनंत चतुर्थीला ईद-ए- मिलादची मिरवणूक नाही...

कराड दि. 20 (प्रतिनिधी) यावर्षी अनंत चतुर्थी व ईद-ए-मिलाद (पैगंबर जयंती) सण एकाच दिवशी आल्याने कराड शहरातील मुस्लिम बांधवांनी पैगंबर जयंतीची शाही दरबार मिरवणूक गुरवार दि.28 सप्टेंबर रोजी न काढता रविवार दि. 1 ऑक्टोबर रोजी काढण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी पैगंबर जयंती उत्सव कमिटीची बैठक होऊन हा निर्णय घेण्यात आला असून पोलीस प्रशासनाला याबाबतची माहिती देण्यात आली आहे. यामुळे पोलीस प्रशासनाला एकाच दिवशी विसर्जन मिरवणुका व शाही दरबार मिरवणुकीचा ताण येणार होता तो मुस्लिम बांधवांच्या निर्णयामुळे आता कमी झाला आहे.

कालपासून गणेशोत्सवाची मोठ्या उत्साहात सुरुवात झाली. कराड शहरातील प्रत्येक समारंभात, उत्सवात सर्व जाती धर्माचे लोक मोठ्या उत्साहाने एकत्र येऊन सहभाग घेत असतात. यावर्षी 28 सप्टेंबर रोजी आनंत चतुर्थी आहे. शिवाय याच दिवशी ईद-ए-मिलाद (पैगंबर जयंती) आहे. या पार्श्वभूमीवर दोन वेळा झालेल्या शांतता कमिटी बैठकीत एकाच दिवशी आलेल्या या दोन सणाबाबत चर्चा करण्यात आली होती.

दरम्यान पैगंबर जयंती उत्सव कमिटीची बैठक घेण्यात आली असून त्यानुसार गुरुवार दि. 28 सप्टेंबर ऐवजी रविवार दि 1 ऑक्टोंबर रोजी ईद-ए-मिलाद (पैगंबर जयंती) ची शाही दरबार मिरवणूक काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही मिरवणूक रविवारी सकाळी साडेआठ वाजता जामा मस्जिद येथून सुरू होईल तसेच प्रतिवर्षेप्रमाणे नेहमीच्या मिरवणूक मार्गावरून ही मिरवणूक शहरातून काढण्यात येणार असून या मिरवणुकीत मुस्लिम बांधवांनी मोठ्या प्रमाणात सहभागी होण्याच्या आव्हान उत्सव कमिठीने केले आहे.

Comments

Karad Today News

कराड शहरातील दोन गुन्हेगाराकडून चोरीच्या 9 मोटरसायकली जप्त

स्व. यशवंतराव चव्हाण कृषि प्रदर्शनाच्या मंडप उभारणीस प्रारंभ

वारुंजी जिल्हा परिषद गटावर काँग्रेसचा झेंडा फडकवा – पृथ्वीराज चव्हाण

मलकापूर नगरपरिषद निवडणुकीत भाजपाचे नगराध्यक्ष पदासह 18 नगरसेवक विजयी

सुपने जिल्हा परिषद गट काँग्रेसने ताकदीने लढावा –कार्यकर्त्यांचा पृथ्वीराज चव्हाण यांच्यासमोर आग्रह

कराडमध्ये रविवारी रंगणार ‘कृष्णा मॅरेथॉन’चा थरार

मल्हारपेठ - पंढरपूर रस्त्याच्या कामविरोधात बाधित शेतकरी आक्रमक