कराड अर्बन बँकेने आयोजित केलेल्या वॉकेथॉन (Walkathon) ला उस्फूर्त प्रतिसाद...


कराड अर्बन बँकेने आयोजित केलेल्या वॉकेथॉन (Walkathon) ला उस्फूर्त प्रतिसाद...

कराड दि.10-सातारा व कराड शहर आणि परिसरातील नागरिकांना उत्तम आरोग्याचा कानमंत्र देण्याचा मानस ठेवून "Walk For Obesity & Diabetes Free World" साठी बँकेने सातारा व कराड शहरामध्ये ५ किमी. चालण्याच्या वॉकॅथॉनचे आयोजन केले होते. या वॉकॅथॉनचा शुभारंभ बँकेच्या मुख्यकार्यालयापासून अर्बन कुटुंब प्रमुख व बँकेचे ज्येष्ठ संचालक सुभाषराव जोशी, अध्यक्ष डॉ. सुभाष एरम, उपाध्यक्ष समीर जोशी व मुख्य कार्यकारी अधिकारी सीए. दिलीप गुरव यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आज सकाळी करण्यात आला. यावेळी अर्बन बझारच्या अध्यक्षा सायली जोशी, उपाध्यक्षा जयश्री गुरव, बँकेचे संचालक, व्यवस्थापन मंडळ सदस्य, महाव्यवस्थापक, वरिष्ठ अधिकारी व अर्बन कुटुंबातील सर्व सदस्य उपस्थित होते.

कराड अर्बन बँकेने अर्थकारणाबरोबरच सामाजिक बांधिलकीची जाण ठेवत अनेक समाजाभिमुख उपक्रम सातत्याने सुरू ठेवले आहेत. यामध्ये विद्याथ्यांसाठी उद्योजकता विकास शिबीर, दिव्यांगांसाठी अस्थिअपंग शिबीर, रोडरेस स्पर्धा, देशभक्तीपर समुहगीत गायन स्पर्धा, पर्यावरण दिनानिमित्त सायकल फेरी इ. सामाजिक उपक्रमांचे आयोजन केले जाते. याच सामाजिक बांधिलकीची जाण ठेवत 'ग्राहकांचा मित्र आणि सच्चा मार्गदर्शक' अशी भूमिका बँकेने कायम ठेवली आहे.

महाराष्ट्र शासनाच्या स्थूलता विरोधी अभियानाचे ब्रँड अॅम्बेसेडर राहिलेल्या डॉ. जगन्नाथ दिक्षीत यांनी कै. डॉ. श्रीकांत जीचकर यांच्या जयंतीनिमित्त दि. १० सप्टेंबर या एकाच दिवशी विविध शहरांमध्ये या वॉकॅथॉनचे आयोजन केले होते. कराड व सातारा शहरामध्ये सदरच्या वॉकॅथॉनचे आयोजन करण्याचा मानस डॉ. जगन्नाथ दिक्षीत यांनी बँकेकडे व्यक्त केला होता. त्यास बँकेने सकारात्मक प्रतिसाद देत कराड व सातारा येथे या वैशिष्ट्यपूर्ण वॉकॅथॉनचे आयोजन करून या उपक्रमात आपण सहभाग नोंदविला असल्याचे अध्यक्ष डॉ. सुभाष एरम व ज्येष्ठ संचालक सुभाषराव जोशी यांनी सांगितले.

सदरच्या Walkathon साठी कराड शहर व परिसरातील विविध संघटना, महाविद्यालये यांच्यामाध्यमातून सुमारे १५०० लोक व सातारा शहरातील सुमारे ७५० लोकांनी उस्फूर्त सहभाग नोंदविला असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी सीए. दिलीप गुरव यांनी दिली.

Comments

Karad Today News

कराड शहरातील दोन गुन्हेगाराकडून चोरीच्या 9 मोटरसायकली जप्त

स्व. यशवंतराव चव्हाण कृषि प्रदर्शनाच्या मंडप उभारणीस प्रारंभ

वारुंजी जिल्हा परिषद गटावर काँग्रेसचा झेंडा फडकवा – पृथ्वीराज चव्हाण

मलकापूर नगरपरिषद निवडणुकीत भाजपाचे नगराध्यक्ष पदासह 18 नगरसेवक विजयी

सुपने जिल्हा परिषद गट काँग्रेसने ताकदीने लढावा –कार्यकर्त्यांचा पृथ्वीराज चव्हाण यांच्यासमोर आग्रह

कराडमध्ये रविवारी रंगणार ‘कृष्णा मॅरेथॉन’चा थरार

मल्हारपेठ - पंढरपूर रस्त्याच्या कामविरोधात बाधित शेतकरी आक्रमक