उंडाळकर विद्यालयात शाडूच्या मातीपासून गणेश मूर्ती तयार करण्याच्या कार्यशाळेत विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद...
उंडाळकर विद्यालयात शाडूच्या मातीपासून गणेश मूर्ती तयार करण्याच्या कार्यशाळेत विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद...
उंडाळे दि.9-येथील स्वातंत्र्यवीर दादासाहेब उंडाळकर माध्यमिक विद्यालयातील राष्ट्रीय हरित सेना व एस आर दळवी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने प्रदूषण मुक्त गणेशोत्सव साजरा व्हावा यासाठी शाडूच्या मातीपासून गणेश मूर्ती तयार करण्याची कार्यशाळा उत्साहात संपन्न झाली. या कार्यशाळेत विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत 175 गणेश मूर्ती तयार केल्या
येथील स्वातंत्र्यवीर दादासाहेब उंडाळकर विद्यालयात समाज उपयोगी,, पर्यावरण पूरक विविध उपक्रम राबवले जातात त्याचाच एक भाग म्हणून विद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी गणेश मूर्ती बनवण्याची कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेचे उद्घाटन प्राचार्य बी आर पाटील, एस आर दळवी फाउंडेशन चे सल्लागार मोहनराव पाटील, पर्यवेक्षक जे एस माळी, यांच्या हस्ते करण्यात आले.या वेळी धनंजय पवार, शंकर आंबवडे अनिल सुतार आदी उपस्थिती होती.
गणेशमूर्ती कशा बनवाव्यात हे शिकवण्यासाठी दामोदर दीक्षित, विद्यालयातील कलाशिक्षक अनिल सुतार, सिद्धार्थ कुंभार, धनंजय पवार यांनी शाडूच्या मातीपासून गणेश मूर्ती कशी बनवावी ही विद्यार्थ्यांना दाखवत स्वतः गणेश मूर्ती तयार करत. विद्यार्थ्यांनाही प्रोत्साहन दिले.
विद्यार्थ्यानी 175 गणेश मूर्ती तयार केल्या. या गणेश मूर्तीतून प्रथम तीन क्रमांक काढण्यात आले, अनुक्रमे अमृता कुंभार, अनुष्का शेवाळे, शिवम कुंभार, सृष्टी चवरे, राधिका लाड यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय व उत्तेजनार्थ दोन असे क्रमांक पटकावले. यशस्वी विद्यार्थ्यांना शिल्ड व शालेय साहित्य देऊन एस आर दळवी फाउंडेशनचे सल्लागार मोहनराव पाटील, प्राचार्य बी आर पाटील, पर्यवेक्षक जे एस माळी ग्रामपंचायत सदस्य बापूराव पाटील, दामोदर दीक्षित, अनिल सुतार यांच्या हस्ते उपस्थित विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विद्यालयातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले धनंजय पवार यांनी प्रास्ताविक केले तर शंकर आंबवडे यांनी आभार मानले.


Comments
Post a Comment