चला उद्या करूया स्वच्छतेसाठी श्रमदान, शहरातील 'या' 14 वार्डात आयोजन; नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे; कराड नगरपरिषद...
माझी माती माझा देश या अभियानांतर्गत आज कराड नगर परिषदेच्या वतीने अमृत कलश यात्रा काढण्यात आली यावेळी आरोग्य अभियंता आरडी भालदार आरोग्य निरीक्षक मिलिंद शिंदे सर्व विभागाचे मुकादम आरोग्य कर्मचारी मोठ्या संख्येने यामध्ये सहभागी झाले होते.
चला उद्या करूया स्वच्छतेसाठी श्रमदान, शहरातील 'या' 14 वार्डात आयोजन; नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे; कराड नगरपरिषद...
राजू सनदी कराड दि.30- इंडियन स्वच्छ लीग.2.0, स्वच्छतेचा पंधरावडा आणि स्वच्छता ही सेवा’ अभियान अंतर्गत महात्मा गांधी यांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर देशातील सर्व नागरिक एकत्रितपणे त्यांना 'स्वच्छांजली' अर्पण करण्यासाठी 1 ऑक्टोबर रोजी म्हणजेच रविवारी सकाळी 10 वाजता नागरिकांच्या नेतृत्वाने स्वच्छतेबाबत एक मोठा कार्यक्रम आयोजित केले आहे. तरी 1 ऑक्टोबर सकाळी 10 वाजता शहरातील नागरिकांनी आपल्या वॉर्डमध्ये स्वच्छतेसाठी 1 तास श्रमदान करावे असे आवाहन कराड नगरपरिषद तर्फे शहरातील नागरिकांना करण्यात आले आहे.
खालील ठिकाणी अभियान राबवण्यात येणार आहे.
1. वॉर्ड 1 - महादेव मंदिर वाखान
2. वॉर्ड 2 - छत्रपती शिवाजी उद्यान परिसर
3. वॉर्ड 3 - संतसखू मंदिर
4. वॉर्ड 4 - स्मशानभूमी
5. वॉर्ड 5 - सोमवार पेठ पाण्याची टाकी
6. वॉर्ड 6 - प्रीतिसंगम घाट
7. वॉर्ड 7 - रविवार पेठ पाण्याची टाकी
8. वॉर्ड 8 - महात्मा फुले चौक
9. वॉर्ड 9 - कोयनेश्वर मंदिर
10. वॉर्ड 10 - कोर्ट परिसर
11. वॉर्ड 11 - छत्रपती संभाजी भाजी मार्केट
12. वॉर्ड 12 - आदरणीय पी. डी. पाटील साहेब उद्यान
13. वॉर्ड 13 - बर्गे वस्ती
14. वॉर्ड 14 - ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव चौक कार्वे नाका


Comments
Post a Comment