कराड व पाटण तालुक्यातील १६ कामांसाठी सुमारे ५ कोटी ८१ लाखाचा निधी मंजूर...


कराड व पाटण तालुक्यातील १६ कामांसाठी सुमारे ५ कोटी ८१ लाखाचा निधी मंजूर...

कराड दि.14-खा. श्रीनिवास पाटील यांनी सुचवलेल्या सातारा लोकसभा मतदारसंघाच्या कराड व पाटण तालुक्यातील जलसंधारणाच्या कामावरील स्थगिती राज्य शासनाकडून उठवण्यात आली आहे. त्यानुसार कराड व पाटण तालुक्यातील १६ कामांसाठी सुमारे ५ कोटी ८१ लाखाचा निधी मंजूर झाला आहे. त्यामुळे अनेक दिवसापासून प्रलंबित असणा-या सदर कामांचा प्रश्न मार्गी लागल्याने स्थानिकांना दिलासा मिळाला आहे.

सातारा लोकसभा मतदारसंघातील विविध ठिकाणच्या जलसंधारणाच्या कामासाठी खा.श्रीनिवास पाटील यांच्या प्रयत्नातून यापूर्वी मोठ्या प्रमाणात निधी मंजूर झाला होता. मात्र संबंधित कामांवर स्थगिती आल्याने ही कामे प्रलंबित राहीली होती. आता राज्य शासनाने कामावरील स्थगिती उठवल्याने त्या कामांना गती प्राप्त झाली आहे. 

यामध्ये कराड तालुक्यातील वहागाव व तळबीड येथे सिमेंट कॉंक्रिट बंधारा बांधणे ह्या दोन कामासाठी ५९ लक्ष ५० हजार ३६३ रूपये निधी मंजूर झाला आहे. अंतवडी (खिंड शिवार), अंतवडी (पोळ खडी शिवार), अंतवडी (रत्नकर शिवार), अंतवडी (टेक शिवार), अंतवडी (नाईकबा मंदीर शेजारी), डिचोली बाबरमाची (विठ्ठल कोळेकर विहिर), आबईचीवाडी येथील एकूण ८ कामासाठी २ कोटी ८७ लाख ६१ हजार ५२४ रूपये, पाटण तालुक्यातील टेळेवाडी (टेक शिवार) व टेळेवाडी (दोधानी शिवार) येथील सिमेंट कॉंक्रिट बंधार्‍यासाठी ७४ लाख ३६ हजार २६०, 

मालदन (बाधे शिवार), मालदन (बाधे शिवाराच्या मागे), खळे, जांभूळवाडी (जिल्हा परिषद शाळेच्या मागे) ह्या ४ कामासाठी १ कोटी ६० लक्ष १० हजार ५४० एवढा निधी मंजूर झाला आहे. अशी माहिती मृद व जलसंधारण विभागाचे सहा. जिल्हा जलसंधारण अधिकारी यांनी खा.पाटील यांना कळवली आहे. या जलसंधारणाच्या विकासकामांमुळे कराड, पाटण तालुक्यातील शेती सिंचन क्षेत्रात वाढ होणार आहे. तसेच संबंधित भागातील शेतकऱ्यांच्या शेतीसाठी लागणार्‍या पाण्याचा प्रश्न मिटण्यास मदत मिळणार आहे.



Comments

Karad Today News

कराड शहरातील दोन गुन्हेगाराकडून चोरीच्या 9 मोटरसायकली जप्त

स्व. यशवंतराव चव्हाण कृषि प्रदर्शनाच्या मंडप उभारणीस प्रारंभ

वारुंजी जिल्हा परिषद गटावर काँग्रेसचा झेंडा फडकवा – पृथ्वीराज चव्हाण

मलकापूर नगरपरिषद निवडणुकीत भाजपाचे नगराध्यक्ष पदासह 18 नगरसेवक विजयी

सुपने जिल्हा परिषद गट काँग्रेसने ताकदीने लढावा –कार्यकर्त्यांचा पृथ्वीराज चव्हाण यांच्यासमोर आग्रह

कराडमध्ये रविवारी रंगणार ‘कृष्णा मॅरेथॉन’चा थरार

मल्हारपेठ - पंढरपूर रस्त्याच्या कामविरोधात बाधित शेतकरी आक्रमक