Posts

Showing posts from July, 2023

कराड नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांना NDRF कडून आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण...

Image
  कराड नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांना NDRF कडून आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण... कराड दि.31-सातारा जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांच्या सूचनेवरून कराड नगर परिषदेचे मुख्याधिकारी शंकर खंदारे यांच्या मार्गदर्शनाखाली नगरपालिका अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी एनडीआरएफच्या वतीने आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण देण्यात आले. NDRF चे निरीक्षक राहुल रघुवंशी, मेजर निलेश जाधव, ज्वाला दास, निलेश जाधव, प्रवीण निकम, शरद पवार, संदीप कदम यानी प्रात्यक्षिकासह माहिती दिली. नैसर्गिक आपत्ती ओढवली तर त्या ठिकाणी मदत पोचवण्याची जबाबदारी केंद्र सरकारची असल्याने National Disaster Management Authority (NDMA) या यंत्रणेच्या आदेशाने एनडीआरएफ कार्यरत असते. आपत्ती उद्भवलेल्या ठिकाणी पोहचून तेथील लोकांना सुखरूप बाहेर काढणे, त्यांना सुरक्षित ठिकाणी पोचवणे, परिस्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी प्रयत्न करणे ह्या सर्व जबाबदाऱ्या एनडीआरएफ पथक पार पाडते. सध्या हे इंडिया रेप चे पथक पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर कराड येथे काही दिवसापूर्वी दाखल झाले आहे. NDRF यंत्रणा मुख्यत्वे नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन आणि निवारणासाठी कार्य करते. कोणत्याह...

आ. पृथ्वीराज चव्हाण ई-मेल धमकी प्रकरण; तालुका काँग्रेसच्या वतीने पोलीस प्रशासनाला निवेदन...

Image
आ. पृथ्वीराज चव्हाण ई-मेल धमकी प्रकरण; तालुका काँग्रेसच्या वतीने पोलीस प्रशासनाला निवेदन... कराड दि. 31 (प्रतिनिधी) माजी मुख्यमंत्री आ.पृथ्वीराज चव्हाण (बाबा) यांना ई-मेलद्वारे दिलेल्या धमकीच्या अनुषंगाने कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी आज कराड तालुका काँग्रेसच्या वतीने निवेदनाद्वारे कराड पोलीस प्रशासनास केली आहे. उपविभागीय पोलिस अधिकारी अमोल ठाकूर व वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप सूर्यवंशी यांना आज हे निवेदन देण्यात आले आहे. या निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा कराड दक्षिणचे लोकप्रिय आमदार मा. पृथ्वीराज चव्हाण (बाबा) यांना अज्ञात इसमाकडून ई-मेलद्वारे धमकी देण्यात आली असून याबाबत आपले स्तरावरुन पोलिस यंत्रणेस योग्य त्या संरक्षणात्मक उपाययोजना करणे आवश्यक आहे. भारताचे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या बद्दल संभाजी भिडे यांनी काढलेले आक्षेपार्ह विधानाबाबत  आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी पावसाळी अधिवेशनामध्ये भिडे यांचे विधानाबाबत चौकशी करुन योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे. याबाबत सभागृहामध्ये मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री, महाराष्ट...

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्यास अटक, कराड पोलिसांचे पथक रवाना.

Image
  माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्यास अटक, कराड पोलिसांचे पथक रवाना... कराड दि. 30 (प्रतिनिधी) माजी मुख्यमंत्री व कराड दक्षिणचे विद्यमान आमदार पृथ्वीराज चव्हाण यांना आज ईमेलवरून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. याप्रकरणी चव्हाण यांच्याकडून कराड शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कराड पोलिसांनी तात्काळ याची दखल घेत ई-मेल करणाऱ्याचा शोध घेतला आहे. तर नांदेड पोलिसांनी त्यास तात्काळ शोधून ताब्यात घेतले असून त्याला ताब्यात घेण्यासाठी कराडहून पथक रवाना झाले आहे. आमदार चव्हाण यांच्या निवासस्थानी पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. अमरावती येथे संभाजी भिडे यांनी एका कार्यक्रमात महात्मा गांधी यांच्या बद्दल आक्षेपार्य वक्तव्य केल्यानंतर विधानसभेत माजी मुख्यमंत्री आ.चव्हाण यांनी संभाजी भिडे यांना तात्काळ अटक करण्याची मागणी केली होती. चव्हाण यांच्या मागणी प्रमाणे आणि ही विरोधकांनी ही मागणी लावून धरली होती. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी संबंधिताचे वक्तव्य तपासून कारवाई केली जाईल असे आश्वासन दिले होते. दरम्यान आज कराड येथे आ. पृथ्वीराज चव्हाण यांना...

कृष्णा घाटावर हफ्तेखोरां कडून पुन्हा एकदा गाड्यांचे नुकसान...

Image
कृष्णा घाटावर हफ्तेखोरां कडून पुन्हा एकदा गाड्यांचे नुकसान... कराड दि. 30 (प्रतिनिधी) कृष्णा घाटावर पुन्हा एकदा एका भेळ व्यावसायिकाच्या गाड्याचे हप्ते खोरानी नुकसान केले असून संबंधितांनी त्याचा भेळ गाडा ढकलून देऊन नुकसान केल्याची घटना घडली आहे. यामुळे घाटावरील व्यावसायिकाच्या भीतीचे वातावरण पसरले आहे. दोनच दिवसांपूर्वी एका व्यावसायिकाने हप्ता न दिल्याच्या कारणावरून संबंधित हप्ते खोराने धमकी देऊन गाड्यांचे नुकसान केले होते. त्यावेळी पोलिसांनी संबंधितावर प्रतिबंधात्मक कारवाई केली होती. मात्र त्याच्या विरोधात कसलीही तक्रार दाखल न झाल्याने पुन्हा हा प्रकार घडल्याचे दिसून येत आहे. दरम्यान कृष्णा घाटावर अनेक हातगाडी व्यवसायिक गेल्या अनेक वर्षापासून व्यवसाय करीत आहेत. परंतु घाटावर काहीजण या व्यवसायिकांचा गैरफायदा घेत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. अनेक जण फुकट खाऊन जाताना दमबाजी करत महिन्याला हप्ता देण्याची धमकी देत असतात अशी विक्रेत्यांची तक्रार आहे. या तक्रारीकडे पोलिसांनी गांभीर्याने पाहणे गरजेचे आहे. प्रीती संगम बागेत पोलीस चौकी आहे तिथूनही या ठिकाणी दिवस-रात्र लक्ष ठेवणे गरजेचे आहे. का...

माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या पाठपुराव्यामुळे कराड बसस्थानकाच्या सुविधांचा प्रश्न पुन्हा एकदा मार्गी...

Image
माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या पाठपुराव्यामुळे कराड बसस्थानकाच्या सुविधांचा प्रश्न पुन्हा एकदा मार्गी... कराड: दि.28- सातारा विभागातील कराड येथे पृथ्वीराज चव्हाण यांच्या मुख्यमंत्री काळात नव्याने बांधण्यात आलेल्या बसस्थानकामधील स्टील बेंचेसची मोडतोड झालेने सद्या प्रवाशांना बसण्याकरिता गैरसोय होत आहे हि बाब माजी मुख्यमंत्री तथा कराड दक्षिणचे विद्यमान आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी शासनाच्या निदर्शनास  आणून देण्यासाठी व कराड बसस्थानक साठी निधी मिळण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा केला तसेच लक्षवेधीच्या माध्यमातून विधानसभेत सूचना देखील मांडली. यावर उत्तर देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उत्तर दिले कि, स्टीलचे बेंचेस वेल्डिंग करून पुन्हा तुटण्याची शक्यता असल्याने त्याऐवजी त्याठिकाणी आरसीसी बेंचेस तयार केले जातील व हे काम तातडीने केले जाईल. तसेच बसस्थानकाच्या तळघरामधील पार्किंगमध्ये पाणी साठते सदरचे पाणी साठणार नाही याची दक्षता घेण्याचेसुद्धा आदेश दिले जातील.  पृथ्वीराज चव्हाण यांच्या मुख्यमंत्री काळात विशेष निधीची तरतूद करून जवळपास रु. ११ कोटी इतका खर्च करून कराडकरांच्या...

शिक्षण विभागातील भ्रष्टाचारी शिक्षणाधिकार्‍याची ई डी अंतर्गत कारवाई करा; आ. चव्हाण.... ...

Image
भ्रष्टाचारी शिक्षणाधिकार्‍याची ई डी अंतर्गत कारवाई करा... माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांची विधानसभेत मागणी... कराड दि. 27-राज्यातील शिक्षण विभागातील अधिकार्‍यांकडून गैरव्यवहार होत असल्याबाबत विधानसभेत प्रश्नोत्तरच्या वेळी माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी शिक्षण विभागातील गंभीर भ्रष्टाचाराच्या घटना उपस्थित करीत सभागृहाचे लक्ष वेधले अशा भ्रष्टाचारी अधिकार्‍यांवर कारवाई केली जावी यासाठी आपल्या कायद्यात योग्य बदल केले जावेत तसेच भ्रष्टाचारी अधिकार्‍यांची ई डी अंतर्गत कारवाई केली जावी अशी मागणी केली. आ. चव्हाण यांच्या मागणीचा विचार करून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नक्कीच कायद्यात योग्य ते बदल केले जातील तसेच उपस्थित केलेल्या नाशिकच्या भ्रष्ट शिक्षणाधिकार्‍यापासूनच ई डी अंतर्गत कारवाई करण्यासाठी शिफारस केली जाईल. असे आश्वासन दिले.  नाशिक महापालिका शिक्षण अधिकारी सुनीता धनगर यांना ५० हजाराची तर लिपिकाला ५ हजारांची लाच घेताना लाचलुचपत विभागाने रंगेहाथ पकडले होते या घटनेची माहिती देताना शिक्षण विभागात अशा प्रकारचे विविध ठिकाणी होत असलेला भ्रष्टाचार अत्यंत गंभीर स...

अतिवृष्टीचा संभाव्य धोका; कराडात एनडीआरएफचे पथक दाखल...

Image
 कराडात एनडीआरएफचे पथक दाखल... कराड दि. 26 भारतीय हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार सातारा जिल्ह्यातील पश्चिमेकडील तालुके (पाटण महाबळेश्वर वाई जावली व सातारा) या ठिकाणी अतिवृष्टी सुरू आहे . संभाव्य धोक्याची शक्यता लक्षात घेता राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण मार्फत एनडीआरएफचे एक पथक पूर्वस्थितीत (Pre positioning) सातारा जिल्ह्यात आज कराड या ठिकाणी दाखल झाले आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली. या पथकाचे प्रमुख एन डी आर एफ बटालियन पुणेचे इन्स्पेक्टर राहुल कुमार रघुवंश हे आहेत. सदरच्या पथकात अधिकारी व जवान  यांचा समावेश असून एकूण 25 जणांचे पथक तैनात असणार आहे. पथकाकडे  आवश्यक ते सर्व साहित्य व  यंत्रसामग्री  उपलब्ध आहे. हे पथक जिल्हा प्रशासनाची समन्वयाने आपत्ती व्यवस्थापनामध्ये काम करणार आहे. सदरचे पथक कराड येथे दाखल होतात तहसीलदार विजय पवार यांनी त्यांचे स्वागत केले.

कराड उत्तरमधील प्रत्येक जिल्हा परिषद गटात काँग्रेसची ताकद वाढविण्यावर भर - श्रीरंग चव्हाण...

Image
कराड उत्तरमधील प्रत्येक जिल्हा परिषद गटात काँग्रेसची ताकद वाढविण्यावर भर - श्रीरंग चव्हाण...  काँग्रेसची मोठी ताकद असूनही आघाडी धर्म पाळण्यात काँग्रेस कार्यकर्त्यांचेच नुकसान झाल्याची कार्यकर्त्यांची खंत  कराड दि.25-कराड उत्तर विभाग हा कायमच काँग्रेस विचारांच्या पाठीशी राहिला आहे. काँग्रेसची विचारधारा जपणाऱ्या या मतदारसंघात प्रत्येक जिल्हा परिषद गटात काँग्रेसचे संघटन वाढवून ताकद वाढविण्यावर भर देणार असल्याचे मत सातारा जिल्ह्याचे प्रभारी श्रीरंग चव्हाण यांनी यावेळी केले.  सातारा जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने प्रत्येक विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे संघटन वाढावे तसेच प्रत्यक्ष भेटीतून संवाद वाढविण्यावर भर द्यावा या माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या सूचनेनुसार जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष डॉ. सुरेश जाधव, जिल्ह्याचे प्रभारी श्रीरंगनाना चव्हाण, महिला काँग्रेसच्या अध्यक्षा अल्पनाताई यादव, जिल्हा सरचिटणीस नरेश देसाई, कराड उत्तर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष निवास थोरात तसेच सर्जेराव पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत कराड उत्तर ब्लॉकचा दौरा करण्यात आला. यावेळी कोपर्...

कराडच्या शासकीय तंत्रनिकेतन मधील 260 विद्यार्थ्यांची नामांकित कंपन्यांमध्ये निवड...

Image
कराडच्या शासकीय तंत्रनिकेतन मधील 260 विद्यार्थ्यांची नामांकित उद्योगांमध्ये निवड... कराड दि.24- येथिल शासकीय तंत्रनिकेतन मधील २६० विद्यार्थ्यांची विविध नामांकित उद्योगांमध्ये निवड झाली आहे, यामध्ये मेकॅनिकल इंजिनिअरिंगच्या १३२, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगच्या ५२, इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंगच्या ५२,  इन्स्ट्रुमेंटेशनच्या १५ व सिव्हिल इंजिनिअरिंगच्या ७ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. अशी माहिती शासकीय तंत्रनिकेतनचे आस्थापना अधिकारी प्रा.अजित हलदुले यांनी दिली. नामांकित उद्योगांमध्ये निवड झालेल्या विद्यार्थ्यांना दोन लाख ते चार लाखांपर्यंतचे वार्षिक आरंभिक वेतन विद्यार्थ्यांना मिळणार आहे. कमिन्स इंडिया, बजाज ऑटो लि., जॉनडियर, फोर्ब्स मार्शल, टाटा मोटर्स, फोरेशिया, विप्रो पारी, फिलिप्स, के एस बी, टाटा टेक्नॉलॉजी, गोदरेज अँड बॉयस, ब्लू स्टार या कंपन्यांमध्ये तंत्रनिकेतन मधील विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.  शासकीय तंत्रनिकेतन कराडमध्ये असणारा शैक्षणिक दर्जा, प्लेसमेंटसाठी दिले जाणारे विशेष प्रशिक्षण आणि विद्यार्थ्यांची उत्तम गुणवत्ता असल्याने दरवर्षी नामांकित कंपन्या या तंत्रनिकेतन मधून विद्...

पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कमी;कोयना धरणातून पाणी सोडले;नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा...

Image
पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कमी;कोयना धरणातून पाणी सोडले; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा... कराड दि.24 (प्रतिनिधी) कोयना पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कालच्या तुलनेत आज दिवसभरात काहिसा कमी आहे.मात्र धरणातील आवक वाढल्याने आज कोयना धरण पायथा विद्युत गृहातून दुपारी 4 वाजता 1050  क्युसेक विसर्ग कोयना नदीमध्ये सोडण्यात आला आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान 28 जुलै पर्यंत सातारा जिल्हात ऑरेंज अलर्ट दिला आहे. कोयना पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर काहिसा कमी झाला आहे. धरणात 59 हजार 977 क्यूसेक आवक सूरू आहे. धरणात चोवीस तासात 3.50 टीएमसी पाणीसाठा वाढला आहे. सध्या कोयना धरणात 53.69 टीएमसी पाणीसाठा असून धरण 52.01 % टक्के भरले आहे. आजच्या दिवशी गतवर्षी धरणात 62.70 टीएमसी पाणी साठा होता. सायंकाळी पाच वाजेपर्यंत कोयना 40 मी. मी. नवजा 50 मी.मी. तर महाबळेश्वर येथे 54 मी.मी. पावसाची नोंद झाली होती. जिल्ह्यातील धरण क्षेत्रातील पाऊस व पाणीसाठा... सातारा  जिल्ह्यातील धरणांमध्ये एकूण 72.19 अब्ज घन फूट पाणी साठा असून धरणांमधील पाणीसाठा एकूण क्षमतेच्या 48.49 ...

.... अखेर कोयना धरण निम्मे भरले; पावसाचा जोर कायम...

Image
 .... अखेर कोयना धरण निम्मे भरले; पावसाचा जोर कायम... कराड दि. 24 (प्रतिनिधी) कोयना पाणलोट क्षेत्रात पडत असलेल्या जोरदार पावसाने अखेर धरणात 50 टीएमसी पाणीसाठा झाला आहे. रविवार रात्री अकरा वाजता धरणातील पाणीसाठा 50 टीएमसी च्या पुढे गेला आहे. गतवर्षीच्या तुलनेत हा पाणीसाठा 13 टीएमसीने कमी आहे. कोयना नवजा परिसरात आज सकाळी आठ वाजेपर्यंत 350 मिलिमीटर पावसाची नोंद झाली होती. गत वर्षी आजच्या दिवशी कोयना धरणात 62.70 टीएमसी पाणीसाठा होता. तर धरण 59.57% भरले होते. तर धरणात 11 हजार 478 क्यूसेक पाण्याची आवक होत होती. त्यावेळी धरणाच्या विद्युत ग्रहातून 2100 क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू होता.तर 2021 रोजी आजच्या दिवशी धरणात 87.46 टीएमसी पाणीसाठा होता तर धरण 83.09% भरले होते. सध्या कोयना धरणात 51.93 टीएमसी पाणीसाठा झाला आहे. तर धरण 49.33 %भरले आहे. सध्या कोयना धरणात 59,851 क्यूसेक पाण्याची आवक होत आहे.कोयना येथे 150 मी. मी., नवजा येथे 151 मी. मी तर  महाबळेश्वर येथे 185 मी. मी पावसाची नोंद झाली आहे

आ. बाळासाहेब पाटील यांच्या प्रयत्नाने कराड उत्तर मतदारसंघात 26 कोटी रुपयांचा निधी मंजूर...

Image
  आ. बाळासाहेब पाटील यांच्या प्रयत्नाने कराड उत्तर मतदारसंघात 26 कोटी रुपयांचा निधी मंजूर... कराड दि. 23 (प्रतिनिधी) माजी सहकार, पणन मंत्री तथा पालकमंत्री आ. आमदार बाळासाहेब पाटील यांचे विशेष प्रयत्नाने अर्थसंकल्प जुलै, २०२३ मधून रक्कम रुपये 26 कोटी चे रस्ते व पूल मंजूर झाले आहेत. कराड उत्तर मतदार संघातील दळणवळणाच्या दृष्टीने अत्यंत खराब झालेल्या ग्रामीण मार्ग राज्य मार्ग इत्यादी साठी या हा निधी मंजूर झाला असल्याची माहिती आ. बाळासाहेब पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. १).खंडाळा-कोरेगांव-कराड-सांगली-शिरोळ रस्ता रा.मा. १४२ कि.मी. ९१/७०० ते ९४/०० (भाग-मसूर ते शहापूर फाटा) रस्त्याचे चौपदरीकरणासह सुधारणा करणे २ कोटी २० लाख. २).सासपडे-निसराळे-तारगांव-वाठार-आवी नागझरी रस्ता प्रजिमा ३५ कि.मी. २२/५०० ते २५/०० (भाग-वाठार ते इंगळे वस्ती) चे रूंदीकरण व सुधारणा करणे ता. कोरेगांव ३ कोटी ३).खंडाळा-कोरेगांव- रहिमतपूर-कराड-सांगली-शिरोळ रस्ता रा.मा. १४२ कि.मी. ७१/०० ते ७३/५०० (भाग-बोरगांव ते किरोली) रस्त्याचे रूंदीकरण व सुधारणा करणे ता कोरेगांव ३ कोटी. ४).प्रजिमा-५७ ते शिरगाव-पेरले-खराडे-हेळगांव-...

कराडचे डीवायएसपी अमोल ठाकूर यांचे फेसबुक अकाउंट हॅक;सोशल मीडिया वापरकर्त्यांना ठाकूर यांनी केले आवाहन..

Image
कराडचे डिवायएसपी अमोल ठाकूर यांचे फेसबुक अकाउंट हॅक... कराड दि. 23 (प्रतिनिधी) कराडचे डी वाय एस पी अमोल ठाकूर यांचे फेसबुक अकाउंट हॅक झाल्याने पोलीस वर्तुळात व सोशल मीडियात खळबळ उडाली आहे. याची तात्काळ दखल घेत अमोल ठाकूर यांनी सायबर विभागासह व लीगल टीमच्या व यंत्रणेच्या माध्यमातून रिपोर्ट करत चौकशी सुरू केली आहे. तसेच त्यांनी आपल्या फेसबुक अकाउंट वरून याबाबत सूचना देऊन खबरदारीचे व सुरक्षितेच्या बाबत आव्हान केले आहे. कराड उपविभागासाठी गत महिन्यापूर्वी डीवायएसपी म्हणून रुजू झालेले अमोल ठाकूर यांच्या नावाचा व फोटोंचा वापर करून सोशल मीडियावर फेसबुक खाते सुरू केल्याचे ठाकूर यांना आढळून आले आहे. त्यामुळे त्यांनी याबाबत 'माझ्या नावावर कोणीतरी बनावट फेसबुक खाते तयार केले आहे.  कृपया प्रतिसाद देऊ नका' अशा आशयाचा मेसेज देऊन सदर खात्याचा स्क्रीनशॉट त्यांनी आपल्या स्वतःच्या खात्यावर पोस्ट केल्याने सोशल मीडियात एकच चर्चा सुरू झाली असून चक्क पोलीस यंत्रणेला याचे एक आव्हान बनले आहे. या पूर्वीही पोलीस, महसूल प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचे फेसबुक खाते हॅक झाल्याच्या घटना घडल्या आहेत. शिवाय आहे...

ना. देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त कराड दक्षिणमध्ये 25 हजार वह्यांचे वाटप...

Image
  ना. देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त कराड दक्षिणमध्ये 25 हजार वह्यांचे वाटप... भाजपा नेते डॉ. अतुल भोसले यांचा पुढाकार; आरोग्य शिबीरांचेही आयोजन.... कराड, ता. २२ : महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघात सेवा कार्य दिन म्हणून साजरा करण्यात आला. यानिमित्त भारतीय जनता पार्टीचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ. अतुल भोसले यांच्या पुढाकाराने भाजपा कराड दक्षिणच्यावतीने शालेय विद्यार्थ्यांना सुमारे २५,००० वह्यांचे वाटप करण्यात आले.  इर्शाळवाडी येथे घडलेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांनी वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच कार्यकर्त्यांनी हा दिवस सेवा कार्य दिन म्हणून साजरा करुन लोकोपयोगी उपक्रम राबवावेत, असे आवाहन भाजपाच्यावतीने करण्यात आले होते. त्यानुसार भाजपा कराड दक्षिणच्यावतीने शालेय विद्यार्थ्यांसाठी वह्यावाटप उपक्रम राबविण्यात आला. कराड नगरपरिदेच्या शाळा क्रमांक ३ मध्ये भाजपा पदाधिकाऱ्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना वह्यांचे वितरण करण्यात आले. यावेळी कराड नग...

कराड नगरपरिषदेच्या प्लास्टिक निर्मुलन मोहिमेत व्यापार्‍यावर दंडात्मक कारवाई,80 किलो प्लास्टीक जप्त...

Image
  कराड नगरपरिषदेच्या प्लास्टिक निर्मुलन मोहिमेत व्यापार्‍यावर दंडात्मक कारवाई, 80 किलो प्लास्टीक जप्त... कराड दि.21 (प्रतिनिधी) स्वच्छ सर्वेक्षण 2023 व माझी वसुधंरा अभियाना अंतर्गत एकल वापराच्या (सिंगल युज) प्लास्टिकच्या वस्तुंच्या बंदीची कडक अंमलबजावणी शहरात सूरू आहे. आज बाजारपेठेत करण्यात आलेल्या तपासणी मोहिमेत एका दूकानदारांकडून 5 हजारांचा दंड वसूल करुन 80 किलो प्लास्टीक जप्त करण्यात आले. नगरपरिषदेचे मुख्याधिकारी शंकर खंदारे यांच्या सूचनेनूसार शहरात नगरपरिषद आरोग्य विभाग व महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या वतीने आज प्लास्टिक निर्मूलन मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेत बाजारपेठेतील अनेक दूकांनाची तपासणी केली. या तपासणीत शनिवार पेठ मार्केट यार्ड गेट नंबर-१ येथिल पत्रावळी व कप विक्रेते महेंद्र साळुंखे यांच्या दूकानात बंदी असलेले प्लास्टीक सापडले. त्यामुळे पाच हजार रूपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली. तर बंदी असलेले व प्लास्टीकचा वापर असलेले 80 किलोचे साहित्य जप्त करण्यात आले. यामध्ये प्लास्टीक कप, स्ट्राॅ तसेच 50 मायक्रोन प्लास्टीक पिशव्याचा समावेश आहे. या प्लास्टिक निर्मूलन मोहि...

कराड विमानतळ विस्ताराच्या मुद्द्यावर विधानसभेत आज झालीचर्चा....

Image
कराड विमानतळाच्या विस्ताराबाबत येत्या तीन महिन्यात उच्च स्तरीय मिटिंग घेतली जाणार... माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या विधानसभेतील प्रश्नावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे उत्तर... कराड दि.21- महाराष्ट्रातील तालुका ठिकाणचं पहिलं विमानतळ कराड येथे स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांनी सुरू केलं होतं कारण कराड हे पश्चिम महाराष्ट्रातील मध्यवर्ती ठिकाण आहे. कराड विमानतळ विस्तारीकरणासाठी तेथील ग्रामस्थांचा विरोध नसून त्याबाबत योग्य तो निधी त्यांना हवा आहे यासाठी राज्य शासनाकडून त्वरित तोडगा काढण्याची अपेक्षा आहे या माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रश्नावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येत्या तीन महिन्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली एक उच्च स्तरीय मिटिंग घेण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.  कराड हे पश्चिम महाराष्ट्रातील मध्यवर्ती ठिकाण आहे, या ठिकाणी महाराष्ट्रातील पहिले तालुका पातळीवरील विमानतळ स्व. यशवंतराव चव्हाण यांनी उभारले होते. माझ्या मुख्यमंत्री काळात कराड विमानतळ विस्तारीकरणाचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतर निधीअभावी प्रलंबित ...

कराडच्या कोर्टात एकाला फाशीची शिक्षा; दीड वर्षांपूर्वी मुलीवर बलात्कार करून तिचा केला होता खून...

Image
  कराडच्या कोर्टात एकाला फाशीची शिक्षा; दीड वर्षांपूर्वी मुलीवर बलात्कार करून तिचा केला होता खून... कराड दि.21 (प्रतिनिधी) आठ वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून तिचा गळा दाबून खून केल्याप्रकरणी रुवले (ता. पाटण) येथील संतोष थोरात (वय 41 ) याला फाशीची शिक्षा कराडच्या न्यायालयात सुनावली आहे. येथील जिल्हा व सत्र न्यायालयाच्या विशेष न्यायाधीश के. एस. होरे यांनी ही शिक्षा सुनावली. कराडच्या न्यायालयाच्या इतिहासातील ही पहिली शिक्षा असल्याचे मत अनेक विधी तज्ञांनी व्यक्त केले आहे. सरकारी पक्षाच्या वतीने ॲड. राजेंद्र शहा यांनी काम पाहिले. याप्रकरणी सरकार पक्षाचे वकील ऍड. राजेंद्र सी. शहा यांनी केलेला युक्तिवाद आणि ढेबेवाडी पोलिसांनी पुराव्यासह सादर केलेले दोषारोपपत्र ग्राहय़ मानून न्यायालयाने हा निकाल दिला. दरम्यान, पश्चिम महाराष्ट्रात गेल्या अनेक वर्षात पहिल्यांदाच फाशीची शिक्षा लागल्याने बाललैंगिक अत्याचार कायदा आणि लोकांचा न्यायालयावरील विश्वास अधिक दृढ झाला असल्याचे मत सरकारी वकील राजेंद्र सी. शहा यांनी व्यक्त केले आहे. संबंधित मुलीवर 29 डिसेंबर 2021 रोजी रुवले येथे बलात्कार  केल्याची घटन...

आता सांगलीत हृदय विकार आणि फुप्फुसांच्या अतिगंभीर आजारांसाठी बाह्यरुग्ण विभाग सज्ज...

Image
आता सांगलीत हृदय विकार आणि फुप्फुसांच्या अतिगंभीर आजारांसाठी बाह्यरुग्ण विभाग सज्ज... पुण्यातील डीपीयू प्रायव्हेट सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल द्वारे कराडला ही ओपीडी सुरू होणार... सांगली दि. 21: हृदय विकार आणि फुप्फुसांच्या अतिगंभीर आजारांच्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी डीपीयू प्रायव्हेट सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल पिंपरी, पुणे यांनी सांगलीतील ब्रिदवेल मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल मिरज व सांगली, श्वासलाईफलाईन सेंटर, इंदिरा नगर, सांगली, वेद डायग्नोस्टिक अँड रिसर्च सेंटर, एस टी स्टैंड जवळ सांगली आणि क्रांती कार्डियाक सेंटर, सांगली या चार ठिकाणी बाह्यरुग्ण विभाग सुरु होत असल्याची माहिती डीपीयू प्रायव्हेट सुपर स्पेशलिटी हॉस्पिटलचे डायरेक्टर डॉ. संजय पठारे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.  या सुविधेमुळे तज्ज्ञांचे समुपदेशन व मार्गदर्शन मिळणे शक्य होणार असून ओपीडी द्वारे इस्लामपूर, मिरज आणि कराड या भागातील रुग्णांना याचा फायदा होणार आहे. तसेच ऑक्सिजनवर अवलंबून किंवा अतिगंभीर आजाराने त्रस्त असलेल्या रुग्णांवर काहीवेळा प्रत्यारोपण सुद्धा करावे लागतात त्याकरिता महाराष्ट्रातील रुग्णांना हैदराबाद, चेन्नई ...

आ. बाळासाहेब पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त कराड उत्तर मतदारसंघात विविध ठिकाणी आरोग्य तपासणी शिबिर....

Image
आ. बाळासाहेब पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त कराड उत्तर मतदारसंघात विविध ठिकाणी आरोग्य तपासणी शिबिर.... कराड, दि.20: राज्याचे माजी सहकार व पणन मंत्री आ. बाळासाहेब पाटील यांच्या शनिवार दि. २९ जुलै रोजीच्या वाढदिवसानिमित्त कराड उत्तर मतदार संघातील नागठाणे, रहिमतपूर, पुसेसावळी, उंब्रज, मसूर व ओगलेवाडी आदी ठिकाणी सर्वरोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती आ. बाळासाहेब पाटील वाढदिवस समितीच्या वतीने देण्यात आली. सदरचे शिबिर रविवार दि. २३ जुलै रोजी नागठाणे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या इमारतीमध्ये, सोमवार दिनांक २४ जुलै रोजी उंब्रज येथील श्रीराम मंगल कार्यालय शिवडे फाटा येथे, मंगळवार दिनांक २५ जुलै रोजी रहिमतपूर, बाजारपेठ येथील विरशैव लिंगायत मठ येथे, बुधवार दिनांक २६ जुलै रोजी वडगाव ज.स्वा येथील सांस्कृतिक भवन मध्ये, दिनांक २७ जुलै रोजी मसूर येथील सिद्धेश मंगल कार्यालय येथे व दिनांक २८ जुलै रोजी ओगलेवाडी येथील मयूर मल्टीपर्पज हॉल येथे सकाळी १०.०० ते दु.३.०० वाजेपर्यंत पार पडणार आहे. सदर शिबिरासाठी सह्याद्री मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल कराड, सातारा व पुणे येथील तज्ञ डॉक्टर...

कराड दक्षिणमधील बांधकाम कामगारांना सुरक्षा संचाचे वितरण.

Image
कराड दक्षिणमधील बांधकाम कामगारांना सुरक्षा संचाचे वितरण. .. कराड, दि.20: महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्यावतीने राज्यातील नोंदणीकृत बांधकाम कामगारांना सुरक्षा साहित्याचे वाटप केले जाते. कोयना वसाहत (ता. कराड) येथे भारतीय जनता पार्टीचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ. अतुल भोसले यांच्या हस्ते कराड दक्षिणमधील सुमारे १२८ नोंदणीकृत बांधकाम कामगारांना या सुरक्षा संच पेटीचे वितरण करण्यात आले. याप्रसंगी बोलताना डॉ. भोसले म्हणाले, की देश उभारणीत बांधकाम कामगारांचे योगदान महत्वपूर्ण आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली देशात रस्ते, प्रशासकीय कार्यालये आदींचे मोठ्या प्रमाणावर बांधकाम सुरु आहे. तसेच वाढत्या नागरीकरणामुळेदेखील शहरी व ग्रामीण भागात सातत्याने बांधकामे सुरु असल्याचे दिसून येते. महाराष्ट्रातील बांधकाम कामगारांना सुरक्षितता लाभावी, यासाठी मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस आणि ना. अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील सरकारने राज्यातील नोंदणीकृत बांधकाम कामगारांना सुरक्षा साहित्याचे वाटप सुरु केले आहे. या सुरक्षा साधनांचा कामगारांना म...

कोयना पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस; धरणात 31 टीएमसी पाणी साठा...

Image
  कोयना पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस; धरणात 31 टीएमसी पाणी साठा... कराड दि. 19 (प्रतिनिधी) कोयना पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढला आहे. मुसळधार पावसाने धरणातील पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली आहे. सध्या धरणात 31.10 टीएमसी पाणीसाठा झाला असून 44 हजार 305 क्यूसेक्स पाण्याची आवक धरणात होत आहे. सकाळी 8 वाजेपर्यंत कोयना येथे 158 तर  नवजा परिसरात 307 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. तर महाबळेश्वरला 231 मिली मीटर पाऊस नोंदला गेला आहे. सध्या कोयना धरण 29.54% भरले आहे. गतवर्षी धरणात 58.97 टीएमसी पाणीसाठा झाला होता तर धरण 56.02 टक्के भरले होते. दरम्यान जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली असून पुढील चार दिवस मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केले आहे. आज सकाळ पासून पावसाने कराड शहर व परिसरात सुरुवात केली आहे. 

सातारा लोकसभा मतदारसंघासाठी 27 कोटींच्या निधीची तरतूद;खा. श्रीनिवास पाटील...

Image
सातारा लोकसभा मतदारसंघासाठी 27 कोटींच्या निधीची तरतूद;खा. श्रीनिवास पाटील... कराड दि.18 (प्रतिनिधी) सातारा लोकसभा मतदारसंघातील विविध ठिकाणच्या रस्त्यांसह, पुल व अन्य विकासकामांसाठी केलेल्या पाठपुरव्यातून राज्याच्या पुरवणी अर्थसंकल्पात सुमारे २७ कोटींच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. सातारचे खा. श्रीनिवास पाटील यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेल्या या निधीमुळे सातारा लोकसभा मतदारसंघातील विकासकामे मार्गी लागणार आहेत. खटाव तालुक्यातील वडगाव ज.स्वामी येथे कुरणवस्ती रस्ता ग्रा.मा.२७९ वर नांदणी नदीवर मोठा पूल बांधणे कामासाठी ८ कोटी ५० लक्ष रूपये निधी मंजूर झाला आहे. कोरेगाव तालुक्यातील सासपडे निसराळे तारगाव वाठार आर्वी नागझरी रस्ता प्रजिमा ३५ किमी १६/०० ते १७/५०० ( भाग तारगाव पूल ते तारगाव रेल्वे स्टेशन) चे रुंदीकरण व सुधारणा करणे २ कोटी रूपये.  सासपडे निसराळे तारगाव वाठार आर्वी नागझरी रस्ता प्रजिमा ३५ किमी २२/०० ते २५/०० (भाग वाठार ते इंगळे वस्‍ती) मधील लांबीचे रुंदीकरण व सुधारणा करणे ३ कोटी रूपये. कराड तालुक्यातील रा.मा.१४८ रेठरे खुर्द आटके पाचवड कटपान मळा गोळेश्वर कापील गोळेश्वर कार्वे ...

कोयना पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम; हवामान खात्याचा इशारा...

Image
  कोयना पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम; हवामान खात्याचा इशारा... कराड दि. 18 (प्रतिनिधी) कोयना पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम असून गेल्या चार दिवसात धरणातील पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली आहे. सध्या धरणात 28.32 टीएमसी पाणीसाठा झाला असून 24 हजार 982 क्यूसेक्स पाण्याची आवक धरणात होत आहे. सायंकाळी पाच वाजेपर्यंत कोयना व नवजा परिसरात 111 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे तर महाबळेश्वरला 82 मिली मीटर पाऊस नोंदला गेला आहे. दरम्यान जिल्ह्यातील काही तालुक्यात पावसाने हजेरी लावण्यास सुरुवात केली असून पुढील चार दिवस मुसळधार पावसाचा हवामान खात्याने अंदाज व्यक्त केले आहे. सायंकाळी उशिरा पावसाने कराड शहर व परिसरात सुरुवात केली आहे.  जिल्ह्यात 19 ते 21 जुलै या कालावधीत मुसळधार व अतिमुसळधार पर्जन्यमानाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली असून संबंधित खात्याकडून जिल्ह्यातील नागरिकांसाठी इशारा देण्यात आला आहे. पाऊस पडताना विजा चमकत असल्यास झाडाखाली  आश्रय घेऊ नका, व मोबाईलचा वापर करू नका. पाण्यात असाल तर त्वरित पाण्याबाहेर पडा. दरड प्रवण क्षेत्रात राहणाऱ्या नागरिकांनी सतर्कता बाळगावी. व सुरक्ष...

शासकीय धान्याचा लाभ घेताय मग एक झाड घ्या व जगवा....

Image
  शासकीय धान्याचा लाभ घेणाऱ्याना पर्यावरण संवर्धनासाठी 'एक कुटूंब एक झाड' मोहिम... सातारा दि.18 : पुरवठा विभागाचा पर्यावरण संवर्धनामध्ये खारीचा वाटा असावा या उद्देशाने पुणे विभागात सन 2023 मध्ये, पुरवठा विभागामार्फत धान्याचा लाभ घेणाऱ्या प्रत्येक ग्रामीण कुटूंबासाठी  "एक कुटूंब एक झाड" मोहिम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेमध्ये तालुक्यातील शासकीय धान्याचा लाभ घेणाऱ्या पात्र कुंटूबाची संख्या विचारात घेवून यामध्ये प्रामुख्याने, शक्य असेल तिथे देशी प्रजातीच्या वृक्षांची रोपे (उदा. चिंच, जांभूळ, लिंब, उंबर, वड, पिंपळ, बांबू अथवा कोरफड, तुळस, गवती चहा इ.) स्थानिक पातळीवर विनामुल्य उपलब्ध होणार आहेत. उपलब्ध होणारी रोपे रास्त भाव दुकानदारांमार्फत प्रत्येक ग्रामीण भागातील कुटूंबास मोफत वाटप करणे, दि.15 ऑगस्ट, 2023 रोजी या रोपांची सुनिश्चित ठिकाणी लागवड करणे, तसेच देखभालीची जबाबदारी संबंधित कुटूंबावर देणे, या अनुषंगाने योग्य ते नियोजन करण्यात येणार असल्याचे वैशाली राजमाने  जिल्हा पुरवठा अधिकारी सातारा यांनी कळविले आहे. तसेच पुणे विभागातील सर्व रास्त भाव दुकाने, गोदामे तसेच पुर...

सातारा जिल्ह्यात मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनःरिक्षण कार्यक्रम...

Image
मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनःरिक्षण कार्यक्रम... सातारा, दि. 18 – राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी यांनी दि. 1 जानेवारी 2024 या अहर्ता दिनांकावर आधारित छायाचित्रांसह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनःरिक्षण कार्यक्रम जाहीर केला आहे.  या कार्यक्रमांतर्गत दि. 21 जुलै ते 21 ऑगस्ट दरम्यान मतदान केंद्रस्तरीय अधिकारी हे घरोघरी जाऊन मतदारांच्या तपशीलाची प्रत्यक्ष पडताळणी करतील. तसेच नोंदणी न केलेले पात्र मदतार, संभाव्य मतदार एका पेक्षा अधिक नोंद, मयत, स्थलांतरीत, नावांची वगळणी, नवीन नोंदणी व दुरुस्ती ही कामे होणार आहेत. तरी सर्व नागरिकांनी या मोहिमेचा लाभ घ्यावा असे आवाहन उपजिल्हाधिकारी तथा उपजिल्हा निवडणूक अधिकारी यांनी केले आहे. 

मॅग्नेट प्रकल्प अंतर्गत कराड येथे 19 रोजी कार्यशाळेचे आयोजन.......

Image
  मॅग्नेट प्रकल्प अंतर्गत कराड येथे 19 रोजी रोजी कार्यशाळा... कराड दि. 17 -शेतकरी उत्पादक कंपन्या व मूल्य साखळी गुंतवणूकदार यांना EOI जाहिरात प्रसिध्दी पासून ते लाभार्थ्यांबरोबर करावयाच्या ग्रँट एग्रीमेंट पर्यंतची कार्यप्रणाली याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यासाठी सर्व सबंधित घटकांसाठी कराड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात बुधवार दि. 19 जुलै 2023 रोजी सकाळी 11.30 वाजता कार्यशाळा आयोजित करण्यात आली असून सर्व लाभार्थी घटकांनी या कार्यशाळेस उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे आवाहन कोल्हापूर विभागाचे मॅग्नेट प्रकल्पाचे उपसंचालक डॉ. सुभाष घुले यांनी केले आहे. मॅग्नेट प्रकल्पातील मॅचिंग ग्रँट घटकांतर्गत मूल्य साखळीत अंतर्भूत असलेल्या काढणी पश्चात हाताळणी व व्यवस्थापन, मूल्यवृद्धी, प्रक्रिया, विपणन आदी सुविधांच्या उपप्रकल्पांना 60 टक्के पर्यंत अर्थसहाय्य उपलब्ध करुन देण्यात येते. मॅग्नेट प्रकल्पांतर्गत इच्छुक लाभार्थ्यांकडून प्रस्ताव मागविण्याची EOI 3 जाहिरात दि. 11 जुलै 2023 रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे. कार्यशाळेमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र असणारे लाभार्थी, लाभार्थी पात्रतेचे निकष, अनु...

कराड दक्षिणमधील रस्ता सुधारणेसाठी 30 कोटींचा निधी मंजूर..

Image
  कराड दक्षिणमधील रस्ता सुधारणेसाठी 30 कोटींचा निधी मंजूर... डॉ. अतुल भोसलेंच्या प्रयत्नांना यश; पुरवणी अर्थसंकल्पात झाली तरतूद... कराड, दि.17: कराड दक्षिणमधील विविध गावांमधील रस्त्यांसह अन्य विकासकामांसाठी राज्याच्या पुरवणी अर्थसंकल्पात तब्बल ३० कोटींच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. भारतीय जनता पार्टीचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ. अतुल भोसले यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेल्या या निधीमुळे, कराड दक्षिणमधील रस्त्यांचे जाळे आणखी मजबूत होण्यास मदत होणार आहे. कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील ११ रस्ते हे अत्यंत महत्वाचे आणि दैनंदिन वाहतुकीच्या दृष्टीने महत्वाचे असून, या रस्त्यांची दुरावस्था झाल्याने जनतेची मोठी गैरसोय होते. त्यामुळे या रस्त्यांची सुधारणा करण्यासाठी पुरवणी अर्थसंकल्पात खास बाब म्हणून निधी मंजूर करावा, अशा मागणीचे पत्र डॉ. भोसले यांनी उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांना दिले होते. या मागणीची दखल घेत वित्त विभागाने विधानमंडळास सादर केलेल्या पुरवणी अर्थसंकल्पात संबंधित विकासकामांसाठी ३० कोटींच्या निधीची तरतूद केली आहे. विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनास आजपासून मुंबई येथ...

गतवर्षीच्या तुलनेत कोयना धरणात अत्यल्प पाणीसाठा :जिल्ह्यात पावसाची प्रतीक्षा....

Image
  कोयना पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरुच; जिल्ह्यात जिल्ह्यात पावसाची प्रतीक्षा कराड दि.15-(प्रतिनिधी) कोयना पाणलोट क्षेत्रात आज सकाळी 8 वाजेपर्यंत पावसाचा जोर कमी जास्त होत असल्याने गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी कोयना धरणात निम्म पाणीसाठा कमी आहे गतवर्षी आजच्या दिवशी कोयना धरणात 48.95 टीएमसी पाणीसाठा होता तर आज याच धरणात 24.35 टीएमसी पाणीसाठा आहे.कोयना पाणलोट क्षेत्रात पडत असलेल्या पावसाने धरणात 5 हजार 347 क्युसेक्स पाण्याची आवक होत आहे.  कोयना नवजा महाबळेश्वर या परिक्षेत्रात गतवर्षी जेवढा पाऊस पडला होता त्याच्या निम्म्यापेक्षा कमी पाऊस सध्या या तीन ठिकाणी पडल्याची नोंद झाली आहे.आज कोयना येथे 11, नवजा येथे 27 तर महाबळेश्वर येथे 22 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. तर कोयना धरणात सकाळी 8 वाजेपर्यंत 24.35 टीएमसी पाणीसाठा झाला असून धरण 23.13 टक्के भरले आहे. गेल्या 24 तासात धरणात 1 टीएमसी पाणीसाठा वाढला आहे. कोयना धरण पाणीसाठा  2022 रोजी एकूण पाणीसाठा-48.95 टीएमसी, उपयुक्त पाणीसाठा-43.83 टीएमसी, आजच्या दिवशी 2021 साली धरणात 46.62 टीएमसी पाणीसाठा होता. Koyna Dam Date: 15/07/2023 T...

कराडचे मुख्याधिकारी शंकर खंदारे यांना अतिरिक्त आयुक्त पदावर पदोन्नती...

Image
  कराडचे मुख्याधिकारी शंकर खंदारे यांना  अतिरिक्त आयुक्त पदावर  पदोन्नती... कराड दि.13 (प्रतिनिधी) कराड नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी शंकर खंदारे यांना अतिरिक्त आयुक्त पदावर पदोन्नती मिळाली आहे. पदोन्नती नंतर अमरावती विभागातील अकोला महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त पदावर पदस्थापना देण्यात आल्याचे आदेश शासनाच्या वतीने काढण्यात आले आहेत. दरम्यान माझ्या पदोन्नती बाबत ऑर्डर आली असून त्याप्रमाणे पदस्थापनेचा आदेश जरी झाला असला तरी त्यात अंशता बदल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पदोन्नती नंतर पदस्थापने बाबत अधिक सांगू शकत नसल्याची प्रतिक्रिया खंदारे यांनी यावेळी 'कराड टुडे' न्यूजशी बोलताना व्यक्त केली. गत महिन्यात वसई विरार महानगरपालिकेचे उपायुक्त शंकर खंदारे यांची नेमणूक कराड नगर परिषदेच्या मुख्याधिकारी पदावर करण्यात आली आहे. 10 जूनला कराड नगर परिषदेच्या मुख्याधिकारी पदावर खंदारे रुजू झाले आहेत. काल शासनाने मुख्याधिकारी, आयुक्त, अतिरिक्त आयुक्त पदावर तात्पुरत्या पदोन्नती देऊन त्यांना त्या त्या विभागातील पदस्थापना देण्यात येत असल्याचे आदेश काल काढण्यात आले आहेत.

अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रियेबद्दल शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात मार्गदर्शन...

Image
  अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रियेबद्दल शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात मार्गदर्शन... कराड दि.13: शैक्षणिक वर्ष २०२३-२४ च्या अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रियेबद्दल विद्यार्थी आणि पालकांच्या मनामध्ये असलेल्या शंका आणि प्रश्नांचे निराकरण करण्यासाठी शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय कराड येथे मार्गदर्शनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आले असल्याची माहिती महाविद्यालया कडून देण्यात आली. सदर कार्यक्रम शनिवार दि. १५ जुलै रोजी सकाळी ११ वाजता महाविद्यालयाच्या सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. तसेच या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण महाविद्यालयाच्या YouTube चॅनेलवरून (https://www.youtube.com/@gcek) करण्यात येणार आहे.  या कार्यक्रमात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजीव ज. वाघ, शैक्षणिक अधिष्ठाता डॉ. लक्ष्मण ल. कुमारवाड, अधिष्ठाता तथा ट्रेनिंग आणि प्लेसमेंट ऑफिसर प्रा. उमा श. पाटील, प्रवेश प्रक्रिया प्रभारी डॉ. कृष्णा आळसुंदकर हे मार्गदर्शन करणार आहेत. तरी या संधीचा प्रवेश इच्छुक विद्यार्थी आणि पालकानी लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात येत आहे.

कृष्णा वनसंवर्धन प्रकल्पातून आगाशिव टेकडीचा परिसर बनणार हिरवागार...

Image
कृष्णा वनसंवर्धन प्रकल्पातून आगाशिव टेकडीचा परिसर बनणार हिरवागार... आजअखेर ३००० हून अधिक झाडांचे रोपण व संवर्धन; उपक्रमाचे ५ वे वर्ष... कराड, दि.12 : ग्लोबल वॉर्मिंगच्या वाढत्या प्रभावामुळे पर्यावरणाचे अतोनात नुकसान होत आहे. अशा परिस्थितीत पर्यावरणाचे संरक्षण व संवर्धन व्हावे, या सामाजिक जाणिवेतून कृष्णा विश्व विद्यापीठाने गेल्या ५ वर्षांपासून ‘कृष्णा वनसंवर्धन प्रकल्प’ हाती घेतला आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून आगाशिव टेकडीवर आत्तापर्यंत ३००० हून अधिक देशी झाडांचे रोपण व संवर्धन करण्यात आले आहे. यामुळे या टेकडीचा परिसर हिरवागार बनू लागला आहे.  पर्यावरणाचे संवर्धन व्हावे, या भूमिकेतून विद्यापीठाचे कुलपती डॉ. सुरेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सातत्याने अनेक उपक्रम राबविले जातात. विद्यापीठाने विविध पर्यावरण संवर्धक उपक्रम राबविण्यासाठी कृष्णा ग्रीन ब्रिगेडची स्थापना केली असून, या ग्रीन ब्रिगेडच्या माध्यमातून समाजात पर्यावरणविषयक जागृती निर्माण केली जाते. कृष्णा विश्व विद्यापीठाने सन २०१९ साली महाराष्ट्र राज्य शासनाच्या वनविभागाशी करार करत, कृष्णा वनसंवर्धन प्रकल्पाची पायाभरणी केली....

कराड;लाचखोर नगर अभियंत्यासह साथीदारास पोलीस कोठडी...

Image
  कराड;लाचखोर नगर अभियंत्यासह साथीदारास पोलीस कोठडी...  कराड दि.11 (प्रतिनिधी) मलकापूरसह कराड नगरपरिषदेचा नगर अभियंता पदाचा चार्ज असणाऱ्या नगर अभियंत्यासह एकास 30 हजारांची लाच घेतल्या प्रकरणी लाचलुचपत विभागाने काल रंगेहाथ पकडले होते. ताब्यात घेतल्यानंतर दोघांना आज येथील न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोघांना 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, मलकापूरसह कराड नगरपरिषदेचा नगर अभियंता पदाचा चार्ज असणारा नगर अभियंता शशिकांत सुधाकर पवार (वय 37, मूळ रा. मंद्रुळ कोळे, ता. पाटण) व सुदीप दीपक इटांबे ( वय 29, रा. माऊली कॉलनी, मलकापूर) या दोघांनी नगर परिषदेचे ठेकेदारकडे 42 हजार रुपयांची मागणी केली होती. तक्रारदार यांनी कराडातील वाखाण भागातील सुनील पवार घर ते कलबुर्गी घर असे रस्त्याचे काम करुन  21 लाख 75 हजार रुपयांचे बील तयार केले होते. त्यापैकी 15 लाख रुपये जमा झाले होते. उर्वरित बिल मंजूर करण्यासाठी नगर अभियंता पवार याने 42 हजार रुपयांची लाचेची मागणी केली होती. तडजोडीअंती 30 हजार रुपये रक्कम खासगी इसम सुदीप दीपक एटाबे याच्याकडे देण्यास सांगून लाचेच...

कराडात मध्यरात्री सशस्त्र दरोडा; 46 लाखांचा ऐवज लंपास...

Image
कराडच्या शिंदे मळ्यात सशस्त्र दरोडा; 46 लाखांचा ऐवज लंपास... कराड दि.10 (प्रतिनिधी): येथील बारा डबरी परिसरातील शिंदे मळा येथे डॉ. एम पी शिंदे यांच्या घरी मध्यरात्री सात ते आठ दरोडेखोरानी चाकूचा धाक दाखवत सशस्त्र दरोडा टाकला.यात सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम असा 46 लाखांचा ऐवज लंपास केल्याची घटना घडली आहे. घरात स्वतः डॉक्टर त्यांचा डॉक्टर मुलगा, पत्नी, सून, मुलगी असे सहा जण घरी होते. यामधील तीन जणांना शारीरिक व्यंगत्व आहे. याचाच फायदा घेऊन दरोडेखोराने चाकू तलवारीचा धाक दाखवत दागिण्यासह रोख रक्कम लुटली आहे. डॉ. शिंदे कुटुंबियांनी वैद्यकीय खर्चासाठी पै पाहुण्यांसह नातेवाईकांकडून नुकतीच पैशांची जुळणी केली होती. या पैशांसह बँकेच्या लॉकर मधून काही दागिने नातेवाईकाच्या लग्न समारंभात वापरण्याच्या अनुषंगाने त्यांनी घरात आणून ठेवले होते. दरम्यान या सशस्त्र दरोड्याची नोंद रात्री उशिरा कराड शहर पोलीस स्टेशनमध्ये झाली असून डॉ. पूजा शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार 27 लाख रुपयांच्या रोख रकमेसह 19 लाखाहून हून अधिक रकमेचे 48 तोळे दागिने असा 46 लाखांची चोरी झाल्याची फिर्यादीत म्हटले आहे. घटनास्थळ...