आ. बाळासाहेब पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त कराड उत्तर मतदारसंघात विविध ठिकाणी आरोग्य तपासणी शिबिर....


आ. बाळासाहेब पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त कराड उत्तर मतदारसंघात विविध ठिकाणी आरोग्य तपासणी शिबिर....

कराड, दि.20: राज्याचे माजी सहकार व पणन मंत्री आ. बाळासाहेब पाटील यांच्या शनिवार दि. २९ जुलै रोजीच्या वाढदिवसानिमित्त कराड उत्तर मतदार संघातील नागठाणे, रहिमतपूर, पुसेसावळी, उंब्रज, मसूर व ओगलेवाडी आदी ठिकाणी सर्वरोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती आ. बाळासाहेब पाटील वाढदिवस समितीच्या वतीने देण्यात आली.

सदरचे शिबिर रविवार दि. २३ जुलै रोजी नागठाणे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या इमारतीमध्ये, सोमवार दिनांक २४ जुलै रोजी उंब्रज येथील श्रीराम मंगल कार्यालय शिवडे फाटा येथे, मंगळवार दिनांक २५ जुलै रोजी रहिमतपूर, बाजारपेठ येथील विरशैव लिंगायत मठ येथे, बुधवार दिनांक २६ जुलै रोजी वडगाव ज.स्वा येथील सांस्कृतिक भवन मध्ये, दिनांक २७ जुलै रोजी मसूर येथील सिद्धेश मंगल कार्यालय येथे व दिनांक २८ जुलै रोजी ओगलेवाडी येथील मयूर मल्टीपर्पज हॉल येथे सकाळी १०.०० ते दु.३.०० वाजेपर्यंत पार पडणार आहे.

सदर शिबिरासाठी सह्याद्री मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल कराड, सातारा व पुणे येथील तज्ञ डॉक्टर्स उपस्थित राहून आरोग्य तपासणी करणार आहेत.

सदर शिबीरामध्ये हृदयरोग - इलेक्ट्रो कार्डिओग्राम (ECG), उच्च रक्तदाब, अस्थिरोग (आर्थो आणि फिजिओथेरेपी) मधुमेह - रक्तातील साखर तपासणी, साखर वाढीमुळे होणारे आजार, नेत्ररोग, तसेच कॅन्सर संदर्भात तपासणी व मार्गदर्शन आणि स्त्री रोगावरील मार्गदर्शन व प्रथोमपचार इ. तसेच महात्मा जोतिबा फुले योजनेअंतर्गत मोफत ऑपरेशन सुविधा संदर्भात माहिती देण्यासाठी सह्याद्रि हॉस्पिटलचे तज्ञ डॉक्टर व स्टाफ उपस्थित राहणार आहेत, तरी गरजुंनी याचा लाभ घ्यावा, अशी विनंती आ. बाळासाहेब पाटील वाढदिवस समिती यांच्यावतीने करण्यात आली आहे.

Comments

Karad Today News

कराड शहरातील दोन गुन्हेगाराकडून चोरीच्या 9 मोटरसायकली जप्त

स्व. यशवंतराव चव्हाण कृषि प्रदर्शनाच्या मंडप उभारणीस प्रारंभ

वारुंजी जिल्हा परिषद गटावर काँग्रेसचा झेंडा फडकवा – पृथ्वीराज चव्हाण

मलकापूर नगरपरिषद निवडणुकीत भाजपाचे नगराध्यक्ष पदासह 18 नगरसेवक विजयी

सुपने जिल्हा परिषद गट काँग्रेसने ताकदीने लढावा –कार्यकर्त्यांचा पृथ्वीराज चव्हाण यांच्यासमोर आग्रह

कराडमध्ये रविवारी रंगणार ‘कृष्णा मॅरेथॉन’चा थरार

मल्हारपेठ - पंढरपूर रस्त्याच्या कामविरोधात बाधित शेतकरी आक्रमक