कराड नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांना NDRF कडून आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण...
कराड नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांना NDRF कडून आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण...
कराड दि.31-सातारा जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांच्या सूचनेवरून कराड नगर परिषदेचे मुख्याधिकारी शंकर खंदारे यांच्या मार्गदर्शनाखाली नगरपालिका अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी एनडीआरएफच्या वतीने आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण देण्यात आले. NDRF चे निरीक्षक राहुल रघुवंशी, मेजर निलेश जाधव, ज्वाला दास, निलेश जाधव, प्रवीण निकम, शरद पवार, संदीप कदम यानी प्रात्यक्षिकासह माहिती दिली.
नैसर्गिक आपत्ती ओढवली तर त्या ठिकाणी मदत पोचवण्याची जबाबदारी केंद्र सरकारची असल्याने National Disaster Management Authority (NDMA) या यंत्रणेच्या आदेशाने एनडीआरएफ कार्यरत असते. आपत्ती उद्भवलेल्या ठिकाणी पोहचून तेथील लोकांना सुखरूप बाहेर काढणे, त्यांना सुरक्षित ठिकाणी पोचवणे, परिस्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी प्रयत्न करणे ह्या सर्व जबाबदाऱ्या एनडीआरएफ पथक पार पाडते. सध्या हे इंडिया रेप चे पथक पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर कराड येथे काही दिवसापूर्वी दाखल झाले आहे.
NDRF यंत्रणा मुख्यत्वे नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन आणि निवारणासाठी कार्य करते. कोणत्याही नैसर्गिक आपत्तीच्या वेळी राष्ट्रीय आपत्ती निवारण दल परिस्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी कार्य करते. भूकंप, महापूर, त्सुनामी, चक्रीवादळ आणि इतर नैसर्गिक आपत्ती वेळी NDRF दलास पाचारण करण्यात येते. नैसर्गिक अथवा मानवनिर्मित आपत्ती उदभवली तर त्यावेळेस तातडीने जीव वाचण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज असते. भूकंप, महापूर, वादळ अशा आपत्तीच्या वेळी काय करावे ते एनडीआरएफ पथकांनी कराड नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांना प्रात्यक्षिकासह माहिती दिली.
यावेळी उप मुख्याधिकारी विशाखा पवार, आरोग्य अभियंता आर.डी.भालदार, जलनिस्सारण अभियंता ए.आर.पवार, बांधकाम अभियंता धायगुडे, आग्निशमन विभागाचे विनोद काटरे व नगरपरिषदेचे सर्व विभागातील कर्मचारी उपस्थित होते.




Comments
Post a Comment