कराड नगरपरिषदेच्या प्लास्टिक निर्मुलन मोहिमेत व्यापार्यावर दंडात्मक कारवाई,80 किलो प्लास्टीक जप्त...
कराड नगरपरिषदेच्या प्लास्टिक निर्मुलन मोहिमेत व्यापार्यावर दंडात्मक कारवाई, 80 किलो प्लास्टीक जप्त...
कराड दि.21 (प्रतिनिधी) स्वच्छ सर्वेक्षण 2023 व माझी वसुधंरा अभियाना अंतर्गत एकल वापराच्या (सिंगल युज) प्लास्टिकच्या वस्तुंच्या बंदीची कडक अंमलबजावणी शहरात सूरू आहे. आज बाजारपेठेत करण्यात आलेल्या तपासणी मोहिमेत एका दूकानदारांकडून 5 हजारांचा दंड वसूल करुन 80 किलो प्लास्टीक जप्त करण्यात आले.
नगरपरिषदेचे मुख्याधिकारी शंकर खंदारे यांच्या सूचनेनूसार शहरात नगरपरिषद आरोग्य विभाग व महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या वतीने आज प्लास्टिक निर्मूलन मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेत बाजारपेठेतील अनेक दूकांनाची तपासणी केली. या तपासणीत शनिवार पेठ मार्केट यार्ड गेट नंबर-१ येथिल पत्रावळी व कप विक्रेते महेंद्र साळुंखे यांच्या दूकानात बंदी असलेले प्लास्टीक सापडले. त्यामुळे पाच हजार रूपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली. तर बंदी असलेले व प्लास्टीकचा वापर असलेले 80 किलोचे साहित्य जप्त करण्यात आले. यामध्ये प्लास्टीक कप, स्ट्राॅ तसेच 50 मायक्रोन प्लास्टीक पिशव्याचा समावेश आहे.
या प्लास्टिक निर्मूलन मोहिमेत कराड नगर परिषदेचे आरोग्य अभियंता आर डी भालदार यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सातारा फिल्ड आॅफिसर ए. एस.जगदाळे तसेच आरोग्य निरीक्षक मिलिंद शिंदे, कर्मचारी मनोज गायकवाड, नारायण कांबळे, रामभाऊ भिसे सहभागी झाले होते.

Comments
Post a Comment