माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्यास अटक, कराड पोलिसांचे पथक रवाना.
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्यास अटक, कराड पोलिसांचे पथक रवाना...
कराड दि. 30 (प्रतिनिधी) माजी मुख्यमंत्री व कराड दक्षिणचे विद्यमान आमदार पृथ्वीराज चव्हाण यांना आज ईमेलवरून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. याप्रकरणी चव्हाण यांच्याकडून कराड शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कराड पोलिसांनी तात्काळ याची दखल घेत ई-मेल करणाऱ्याचा शोध घेतला आहे. तर नांदेड पोलिसांनी त्यास तात्काळ शोधून ताब्यात घेतले असून त्याला ताब्यात घेण्यासाठी कराडहून पथक रवाना झाले आहे. आमदार चव्हाण यांच्या निवासस्थानी पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.
अमरावती येथे संभाजी भिडे यांनी एका कार्यक्रमात महात्मा गांधी यांच्या बद्दल आक्षेपार्य वक्तव्य केल्यानंतर विधानसभेत माजी मुख्यमंत्री आ.चव्हाण यांनी संभाजी भिडे यांना तात्काळ अटक करण्याची मागणी केली होती. चव्हाण यांच्या मागणी प्रमाणे आणि ही विरोधकांनी ही मागणी लावून धरली होती. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी संबंधिताचे वक्तव्य तपासून कारवाई केली जाईल असे आश्वासन दिले होते.
दरम्यान आज कराड येथे आ. पृथ्वीराज चव्हाण यांना ई-मेल करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर चव्हाण यांच्याकडून कराड शहर पोलीस स्टेशनमध्ये संबंधितावर गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी ही तात्काळ याची दखल घेत आयपी ऍड्रेस शोधून काढला आहे. त्या ई-मेल करणाऱ्यास ताब्यात घेण्यासाठी एक पथक ही रवाना करण्यात आले आहे.
धमकीचे मेल करणाऱ्या तरुणाच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. तसेच या तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अंकुश सावराटे (नांदेड) असे या धमकीचा मेल करणाऱ्याचं नाव आहे.

Comments
Post a Comment