.... अखेर कोयना धरण निम्मे भरले; पावसाचा जोर कायम...
.... अखेर कोयना धरण निम्मे भरले; पावसाचा जोर कायम...
कराड दि. 24 (प्रतिनिधी) कोयना पाणलोट क्षेत्रात पडत असलेल्या जोरदार पावसाने अखेर धरणात 50 टीएमसी पाणीसाठा झाला आहे. रविवार रात्री अकरा वाजता धरणातील पाणीसाठा 50 टीएमसी च्या पुढे गेला आहे. गतवर्षीच्या तुलनेत हा पाणीसाठा 13 टीएमसीने कमी आहे. कोयना नवजा परिसरात आज सकाळी आठ वाजेपर्यंत 350 मिलिमीटर पावसाची नोंद झाली होती.
गत वर्षी आजच्या दिवशी कोयना धरणात 62.70 टीएमसी पाणीसाठा होता. तर धरण 59.57% भरले होते. तर धरणात 11 हजार 478 क्यूसेक पाण्याची आवक होत होती. त्यावेळी धरणाच्या विद्युत ग्रहातून 2100 क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू होता.तर 2021 रोजी आजच्या दिवशी धरणात 87.46 टीएमसी पाणीसाठा होता तर धरण 83.09% भरले होते.
सध्या कोयना धरणात 51.93 टीएमसी पाणीसाठा झाला आहे. तर धरण 49.33 %भरले आहे. सध्या कोयना धरणात 59,851 क्यूसेक पाण्याची आवक होत आहे.कोयना येथे 150 मी. मी., नवजा येथे 151 मी. मी तर महाबळेश्वर येथे 185 मी. मी पावसाची नोंद झाली आहे

Comments
Post a Comment