कोयना पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस; धरणात 31 टीएमसी पाणी साठा...
कोयना पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस; धरणात 31 टीएमसी पाणी साठा...
कराड दि. 19 (प्रतिनिधी) कोयना पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढला आहे. मुसळधार पावसाने धरणातील पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली आहे. सध्या धरणात 31.10 टीएमसी पाणीसाठा झाला असून 44 हजार 305 क्यूसेक्स पाण्याची आवक धरणात होत आहे. सकाळी 8 वाजेपर्यंत कोयना येथे 158 तर नवजा परिसरात 307 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. तर महाबळेश्वरला 231 मिली मीटर पाऊस नोंदला गेला आहे.
सध्या कोयना धरण 29.54% भरले आहे. गतवर्षी धरणात 58.97 टीएमसी पाणीसाठा झाला होता तर धरण 56.02 टक्के भरले होते.
दरम्यान जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली असून पुढील चार दिवस मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केले आहे. आज सकाळ पासून पावसाने कराड शहर व परिसरात सुरुवात केली आहे.


Comments
Post a Comment