कोयना पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम; हवामान खात्याचा इशारा...
कोयना पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम; हवामान खात्याचा इशारा...
कराड दि. 18 (प्रतिनिधी) कोयना पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम असून गेल्या चार दिवसात धरणातील पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली आहे. सध्या धरणात 28.32 टीएमसी पाणीसाठा झाला असून 24 हजार 982 क्यूसेक्स पाण्याची आवक धरणात होत आहे. सायंकाळी पाच वाजेपर्यंत कोयना व नवजा परिसरात 111 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे तर महाबळेश्वरला 82 मिली मीटर पाऊस नोंदला गेला आहे.
दरम्यान जिल्ह्यातील काही तालुक्यात पावसाने हजेरी लावण्यास सुरुवात केली असून पुढील चार दिवस मुसळधार पावसाचा हवामान खात्याने अंदाज व्यक्त केले आहे. सायंकाळी उशिरा पावसाने कराड शहर व परिसरात सुरुवात केली आहे.
जिल्ह्यात 19 ते 21 जुलै या कालावधीत मुसळधार व अतिमुसळधार पर्जन्यमानाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली असून संबंधित खात्याकडून जिल्ह्यातील नागरिकांसाठी इशारा देण्यात आला आहे.
पाऊस पडताना विजा चमकत असल्यास झाडाखाली आश्रय घेऊ नका, व मोबाईलचा वापर करू नका. पाण्यात असाल तर त्वरित पाण्याबाहेर पडा. दरड प्रवण क्षेत्रात राहणाऱ्या नागरिकांनी सतर्कता बाळगावी. व सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित व्हावे. मुसळधार पावसात आवश्यकता नसल्यास घराबाहेर पडू नका. नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क रहावे. जुन्या मोडकळीस आलेल्या घरात/इमारतीत आश्रय घेऊ नका. नदी- नाल्याच्या पुलावरून पाणी वाहत असल्यास पूल ओलांडू नका, या कालावधीमध्ये नागरिकांनी शक्यतो पर्यटन स्थळी जाण्याचे टाळावे, अफवांवर विश्वास ठेवू नका व अफवा पसरवू नका असे जिल्हा नियंत्रण कक्ष जिल्हाधिकारी कार्यालय सातारा

Comments
Post a Comment