कृष्णा घाटावर हफ्तेखोरां कडून पुन्हा एकदा गाड्यांचे नुकसान...
कृष्णा घाटावर हफ्तेखोरां कडून पुन्हा एकदा गाड्यांचे नुकसान...
कराड दि. 30 (प्रतिनिधी) कृष्णा घाटावर पुन्हा एकदा एका भेळ व्यावसायिकाच्या गाड्याचे हप्ते खोरानी नुकसान केले असून संबंधितांनी त्याचा भेळ गाडा ढकलून देऊन नुकसान केल्याची घटना घडली आहे. यामुळे घाटावरील व्यावसायिकाच्या भीतीचे वातावरण पसरले आहे. दोनच दिवसांपूर्वी एका व्यावसायिकाने हप्ता न दिल्याच्या कारणावरून संबंधित हप्ते खोराने धमकी देऊन गाड्यांचे नुकसान केले होते. त्यावेळी पोलिसांनी संबंधितावर प्रतिबंधात्मक कारवाई केली होती. मात्र त्याच्या विरोधात कसलीही तक्रार दाखल न झाल्याने पुन्हा हा प्रकार घडल्याचे दिसून येत आहे.
दरम्यान कृष्णा घाटावर अनेक हातगाडी व्यवसायिक गेल्या अनेक वर्षापासून व्यवसाय करीत आहेत. परंतु घाटावर काहीजण या व्यवसायिकांचा गैरफायदा घेत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. अनेक जण फुकट खाऊन जाताना दमबाजी करत महिन्याला हप्ता देण्याची धमकी देत असतात अशी विक्रेत्यांची तक्रार आहे. या तक्रारीकडे पोलिसांनी गांभीर्याने पाहणे गरजेचे आहे. प्रीती संगम बागेत पोलीस चौकी आहे तिथूनही या ठिकाणी दिवस-रात्र लक्ष ठेवणे गरजेचे आहे.
काल रात्री कृष्णा घाटावर अंबिका भेळ गाडा संबंधित हप्ता खोराने पायऱ्यावर ढकलून देऊन नुकसान केल्याने गाड्यांचे नुकसान झाले आहे या भेळ गाडा चालकालाही हप्ता मागण्यात आला होता. आत्ता न दिल्यानेच रात्री संबंधिताने गाड्याचे नुकसान केले असावे अशी चर्चा व्यवसायिकांमध्ये सुरू होती.
कराड उपविभागाला नव्याने रुजू झालेले उपविभागीय अधिकारी अमोल ठाकूर यांनी सुरुवातीचे काही दिवस शहर व परिसरात आपल्या कामाची चुणूक दाखवली होती मात्र त्यानंतर तेही सध्या थंड पडल्याचे दिसून येत आहे. ठाकूर यांनी सध्या या सुरू असलेल्या गल्ली गुंड व फळकुट दादांचा तात्काळ बंदोबस्त करावा, प्रीती संगम पोलीस चौकीत कायमस्वरूपी अधिकारी कर्मचारी नेमणूक करावी, या परिसरातील सीसीटीव्ही कार्यान्वित करावेत व आणखी काही सीसीटीव्ही बसवण्यात यावेत अशी मागणी होत आहे.
दरम्यान दोन दिवसांपूर्वी ज्या हातगाड्याचे नुकसान केले त्या हप्ते खोराला शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेने ताब्यात घेतले होते तसेच त्याच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई केली होती मात्र संबंधित गाडा चालकाने तक्रार न दिल्याने पुढील कारवाई करता आली नाही नसल्याचे पोलीस उपविभागीय अधिकारी अमोल ठाकूर यांनी कराड टूडेशी बोलताना सांगितले.
कृष्णा घाटावरील व्यवसायिकांनी आमदार चव्हाण यांची घेतली भेट...
कृष्णा घाटावर आज घडलेल्या घटनेनंतर घाटावरील सर्व व्यावसायिकांनी आमदार पृथ्वीराज चव्हाण यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन संबंधितावर कडक कारवाई करावी अशी मागणी केली. यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप सूर्यवंशी उपस्थित होते. यावेळी उपस्थित व्यावसायिकांशी बोलताना आमदार चव्हाण म्हणाले पोलीस प्रशासनाशी याबाबत चर्चा केली असून संबंधितावर कारवाई करण्याबाबत त्यांना सूचना केल्या आहेत.


Comments
Post a Comment