कराडचे मुख्याधिकारी शंकर खंदारे यांना अतिरिक्त आयुक्त पदावर पदोन्नती...
कराड दि.13 (प्रतिनिधी) कराड नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी शंकर खंदारे यांना अतिरिक्त आयुक्त पदावर पदोन्नती मिळाली आहे. पदोन्नती नंतर अमरावती विभागातील अकोला महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त पदावर पदस्थापना देण्यात आल्याचे आदेश शासनाच्या वतीने काढण्यात आले आहेत.
दरम्यान माझ्या पदोन्नती बाबत ऑर्डर आली असून त्याप्रमाणे पदस्थापनेचा आदेश जरी झाला असला तरी त्यात अंशता बदल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पदोन्नती नंतर पदस्थापने बाबत अधिक सांगू शकत नसल्याची प्रतिक्रिया खंदारे यांनी यावेळी 'कराड टुडे' न्यूजशी बोलताना व्यक्त केली.
गत महिन्यात वसई विरार महानगरपालिकेचे उपायुक्त शंकर खंदारे यांची नेमणूक कराड नगर परिषदेच्या मुख्याधिकारी पदावर करण्यात आली आहे. 10 जूनला कराड नगर परिषदेच्या मुख्याधिकारी पदावर खंदारे रुजू झाले आहेत. काल शासनाने मुख्याधिकारी, आयुक्त, अतिरिक्त आयुक्त पदावर तात्पुरत्या पदोन्नती देऊन त्यांना त्या त्या विभागातील पदस्थापना देण्यात येत असल्याचे आदेश काल काढण्यात आले आहेत.

Comments
Post a Comment