कराडच्या शासकीय तंत्रनिकेतन मधील 260 विद्यार्थ्यांची नामांकित कंपन्यांमध्ये निवड...


कराडच्या शासकीय तंत्रनिकेतन मधील 260 विद्यार्थ्यांची नामांकित उद्योगांमध्ये निवड...

कराड दि.24- येथिल शासकीय तंत्रनिकेतन मधील २६० विद्यार्थ्यांची विविध नामांकित उद्योगांमध्ये निवड झाली आहे, यामध्ये मेकॅनिकल इंजिनिअरिंगच्या १३२, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगच्या ५२, इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंगच्या ५२,  इन्स्ट्रुमेंटेशनच्या १५ व सिव्हिल इंजिनिअरिंगच्या ७ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. अशी माहिती शासकीय तंत्रनिकेतनचे आस्थापना अधिकारी प्रा.अजित हलदुले यांनी दिली.

नामांकित उद्योगांमध्ये निवड झालेल्या विद्यार्थ्यांना दोन लाख ते चार लाखांपर्यंतचे वार्षिक आरंभिक वेतन विद्यार्थ्यांना मिळणार आहे. कमिन्स इंडिया, बजाज ऑटो लि., जॉनडियर, फोर्ब्स मार्शल, टाटा मोटर्स, फोरेशिया, विप्रो पारी, फिलिप्स, के एस बी, टाटा टेक्नॉलॉजी, गोदरेज अँड बॉयस, ब्लू स्टार या कंपन्यांमध्ये तंत्रनिकेतन मधील विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. 

शासकीय तंत्रनिकेतन कराडमध्ये असणारा शैक्षणिक दर्जा, प्लेसमेंटसाठी दिले जाणारे विशेष प्रशिक्षण आणि विद्यार्थ्यांची उत्तम गुणवत्ता असल्याने दरवर्षी नामांकित कंपन्या या तंत्रनिकेतन मधून विद्यार्थ्यांची निवड करीत असतात. मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक टेलिकम्युनिकेशन मधील सुमारे ८० टक्के विद्यार्थ्यांची कॅम्पसद्वारे निवड होणे ही अभिमानाची बाब असल्याचे प्राचार्य डॉ. राजेंद्र पाटील यांनी सांगितले.

सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे प्राचार्य डॉ. राजेंद्र पाटील, उपप्राचार्य डॉ. चंद्रकांत सीमिकेरी, विभागप्रमुख प्रा. सौ. जयश्री पाटील, डॉ. खालिद बागवान, प्रा. भावेश कऱ्हाडे, प्रा.राजेंद्र सरवदे प्रा.देवदत्त शिंगारे,प्रा. आनंद पेंढारकर,प्रा. सुजाता पाटील, डॉ. सरवदे यांनी अभिनंदन केले.

Comments

Karad Today News

कराड शहरातील दोन गुन्हेगाराकडून चोरीच्या 9 मोटरसायकली जप्त

स्व. यशवंतराव चव्हाण कृषि प्रदर्शनाच्या मंडप उभारणीस प्रारंभ

वारुंजी जिल्हा परिषद गटावर काँग्रेसचा झेंडा फडकवा – पृथ्वीराज चव्हाण

मलकापूर नगरपरिषद निवडणुकीत भाजपाचे नगराध्यक्ष पदासह 18 नगरसेवक विजयी

सुपने जिल्हा परिषद गट काँग्रेसने ताकदीने लढावा –कार्यकर्त्यांचा पृथ्वीराज चव्हाण यांच्यासमोर आग्रह

कराडमध्ये रविवारी रंगणार ‘कृष्णा मॅरेथॉन’चा थरार

मल्हारपेठ - पंढरपूर रस्त्याच्या कामविरोधात बाधित शेतकरी आक्रमक