कराडात मध्यरात्री सशस्त्र दरोडा; 46 लाखांचा ऐवज लंपास...


कराडच्या शिंदे मळ्यात सशस्त्र दरोडा; 46 लाखांचा ऐवज लंपास...

कराड दि.10 (प्रतिनिधी): येथील बारा डबरी परिसरातील शिंदे मळा येथे डॉ. एम पी शिंदे यांच्या घरी मध्यरात्री सात ते आठ दरोडेखोरानी चाकूचा धाक दाखवत सशस्त्र दरोडा टाकला.यात सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम असा 46 लाखांचा ऐवज लंपास केल्याची घटना घडली आहे. घरात स्वतः डॉक्टर त्यांचा डॉक्टर मुलगा, पत्नी, सून, मुलगी असे सहा जण घरी होते. यामधील तीन जणांना शारीरिक व्यंगत्व आहे. याचाच फायदा घेऊन दरोडेखोराने चाकू तलवारीचा धाक दाखवत दागिण्यासह रोख रक्कम लुटली आहे.

डॉ. शिंदे कुटुंबियांनी वैद्यकीय खर्चासाठी पै पाहुण्यांसह नातेवाईकांकडून नुकतीच पैशांची जुळणी केली होती. या पैशांसह बँकेच्या लॉकर मधून काही दागिने नातेवाईकाच्या लग्न समारंभात वापरण्याच्या अनुषंगाने त्यांनी घरात आणून ठेवले होते.

दरम्यान या सशस्त्र दरोड्याची नोंद रात्री उशिरा कराड शहर पोलीस स्टेशनमध्ये झाली असून डॉ. पूजा शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार 27 लाख रुपयांच्या रोख रकमेसह 19 लाखाहून हून अधिक रकमेचे 48 तोळे दागिने असा 46 लाखांची चोरी झाल्याची फिर्यादीत म्हटले आहे.

घटनास्थळावरून मिळालेल्या माहिती नुसार बारा डबरी परिसरात डॉ. एम पी शिंदे यांचा मोठा दवाखाना आहे. महाराष्ट्रातील अनेक रुग्ण या ठिकाणी उपचारासाठी येत असतात. गेल्या अनेक वर्षापासून हा दवाखाना शिंदे मळा परिसरात आहे. काल मध्यरात्री साडेतीन वाजण्याच्या सुमारास सुमारे सात ते आठ दरोडेखोरांनी घरात प्रवेश करून घरातील लोकांना चाकूचा धाक दाखवत घरातील 19 लाख रुपयांचे 48 तोळे सोन्या चांदीचे दागिने व 27 लाख रुपयांची रोख रक्कम असा 46 लाखांचा ऐवज लंपास केली असल्याची माहिती आहे. या घटनेने बारा डबरी, शिंदे मळा परिसरात खळबळ उडाली आहे. अनेकांनी शिंदे यांच्या घराकडे धाव घेत गर्दी केली होती.

दरम्यान शिंदे यांच्या राहत्या घरासह रुग्णालय व परिसरात तसेच रस्त्यावर सीसीटीव्ही असल्यामुळे दरोडेखोर लवकरच हाती लागण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे

घटनास्थळी अतिरिक्त पोलीस अधीक्षक बापू बांगर, सातारा गुन्हे शाखेचे अधिकारी, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकूर,पोलीस निरीक्षक प्रदीप सूर्यवंशी, शहर गुन्हे अन्वेषणचे राजू डांगे यांच्यासह डॉग स्कॉड दाखल झाले आहे.

डॉक्टर शिंदे यांच्या घरातील दोन कपाटांची मोडतोड करून सोन्याचांदीची दागिने व रोख रक्कम लंपास केली...



Comments

Karad Today News

कराड शहरातील दोन गुन्हेगाराकडून चोरीच्या 9 मोटरसायकली जप्त

स्व. यशवंतराव चव्हाण कृषि प्रदर्शनाच्या मंडप उभारणीस प्रारंभ

वारुंजी जिल्हा परिषद गटावर काँग्रेसचा झेंडा फडकवा – पृथ्वीराज चव्हाण

मलकापूर नगरपरिषद निवडणुकीत भाजपाचे नगराध्यक्ष पदासह 18 नगरसेवक विजयी

सुपने जिल्हा परिषद गट काँग्रेसने ताकदीने लढावा –कार्यकर्त्यांचा पृथ्वीराज चव्हाण यांच्यासमोर आग्रह

कराडमध्ये रविवारी रंगणार ‘कृष्णा मॅरेथॉन’चा थरार

मल्हारपेठ - पंढरपूर रस्त्याच्या कामविरोधात बाधित शेतकरी आक्रमक