कराडचे डीवायएसपी अमोल ठाकूर यांचे फेसबुक अकाउंट हॅक;सोशल मीडिया वापरकर्त्यांना ठाकूर यांनी केले आवाहन..
कराडचे डिवायएसपी अमोल ठाकूर यांचे फेसबुक अकाउंट हॅक...
कराड दि. 23 (प्रतिनिधी) कराडचे डी वाय एस पी अमोल ठाकूर यांचे फेसबुक अकाउंट हॅक झाल्याने पोलीस वर्तुळात व सोशल मीडियात खळबळ उडाली आहे. याची तात्काळ दखल घेत अमोल ठाकूर यांनी सायबर विभागासह व लीगल टीमच्या व यंत्रणेच्या माध्यमातून रिपोर्ट करत चौकशी सुरू केली आहे. तसेच त्यांनी आपल्या फेसबुक अकाउंट वरून याबाबत सूचना देऊन खबरदारीचे व सुरक्षितेच्या बाबत आव्हान केले आहे.
कराड उपविभागासाठी गत महिन्यापूर्वी डीवायएसपी म्हणून रुजू झालेले अमोल ठाकूर यांच्या नावाचा व फोटोंचा वापर करून सोशल मीडियावर फेसबुक खाते सुरू केल्याचे ठाकूर यांना आढळून आले आहे. त्यामुळे त्यांनी याबाबत 'माझ्या नावावर कोणीतरी बनावट फेसबुक खाते तयार केले आहे. कृपया प्रतिसाद देऊ नका' अशा आशयाचा मेसेज देऊन सदर खात्याचा स्क्रीनशॉट त्यांनी आपल्या स्वतःच्या खात्यावर पोस्ट केल्याने सोशल मीडियात एकच चर्चा सुरू झाली असून चक्क पोलीस यंत्रणेला याचे एक आव्हान बनले आहे.
या पूर्वीही पोलीस, महसूल प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचे फेसबुक खाते हॅक झाल्याच्या घटना घडल्या आहेत. शिवाय आहे त्याच नावाने बनावट खाते तयार करण्याचे प्रकार घडत आहेत. तर काही जणांचे अकाउंट हॅक ही करण्यात आले होते. कराडचे तत्कालीन डी वाय एस पी सुरज गुरव यांचेही फेसबुक अकाउंट हॅक करण्यात आले होते. बऱ्याच वेळेला सोशल मीडियाचा चुकीच्या पद्धतीने वापर होताना आढळला आहे. मात्र यामध्ये अनेकांच्या नावे फेसबुक खाते तयार करून पैशांची ही मागणी करण्यात आली होती व अजूनही सुरू आहे. सोशल मीडियात अनेक बहाद्दर संबंधित फेसबुक खात्यावरील छायाचित्राचा व त्या नावाचा वापर करून खाते तयार करून अनेकांना गंडा घालत असल्याचे सध्या चित्र आहे.
दरम्यान या प्रकाराबाबत अमोल ठाकूर यांनी फेसबुकच्या लीगल टीम कडे रिपोर्ट केला आहे. सर्वांना आपल्या सोशल मीडियावरील खात्यांची सुरक्षा (सिक्युरिटी) जास्तीत जास्त स्ट्रॉंग ठेवावी. सोशल मीडिया वापरकर्त्यांनी वारंवार आपल्या खात्याचा पासवर्ड चेंज करावा. नियमित खाते अपडेट करत रहा. आपली लिमिटेडच माहिती सोशल मीडियावर शेअर करा असे आव्हान डीवायएसपी अमोल ठाकूर यांनी 'कराड टुडे'शी बोलताना केले आहे.


Comments
Post a Comment