कराड;लाचखोर नगर अभियंत्यासह साथीदारास पोलीस कोठडी...
कराड;लाचखोर नगर अभियंत्यासह साथीदारास पोलीस कोठडी...
कराड दि.11 (प्रतिनिधी) मलकापूरसह कराड नगरपरिषदेचा नगर अभियंता पदाचा चार्ज असणाऱ्या नगर अभियंत्यासह एकास 30 हजारांची लाच घेतल्या प्रकरणी लाचलुचपत विभागाने काल रंगेहाथ पकडले होते. ताब्यात घेतल्यानंतर दोघांना आज येथील न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोघांना 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, मलकापूरसह कराड नगरपरिषदेचा नगर अभियंता पदाचा चार्ज असणारा नगर अभियंता शशिकांत सुधाकर पवार (वय 37, मूळ रा. मंद्रुळ कोळे, ता. पाटण) व सुदीप दीपक इटांबे ( वय 29, रा. माऊली कॉलनी, मलकापूर) या दोघांनी नगर परिषदेचे ठेकेदारकडे 42 हजार रुपयांची मागणी केली होती. तक्रारदार यांनी कराडातील वाखाण भागातील सुनील पवार घर ते कलबुर्गी घर असे रस्त्याचे काम करुन 21 लाख 75 हजार रुपयांचे बील तयार केले होते. त्यापैकी 15 लाख रुपये जमा झाले होते. उर्वरित बिल मंजूर करण्यासाठी नगर अभियंता पवार याने 42 हजार रुपयांची लाचेची मागणी केली होती. तडजोडीअंती 30 हजार रुपये रक्कम खासगी इसम सुदीप दीपक एटाबे याच्याकडे देण्यास सांगून लाचेच्या रकमेचा स्वीकार केला होता. म्हणून आरोपी लोकसेवक शशिकांत पवार नगर अभियंता मलकापूर नगरपरिषद व खासगी इसम सुदीप एटांबे यांना 30 हजार रुपये लाचेच्या रक्कमेचा स्वीकार करताना लाचलुचपत विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले होते.
दरम्यान नगर अभियंता शशिकांत पवार व सुदीप एटाबे या दोघांना आज येथील न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी न्यायालयाने दोघांना 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. सदरची कारवाई पोलीस उपाधीक्षक श्रीमती उज्ज्वल वैद्य, पो. ना. प्रशांत नलावडे, पो. ना. निलेश चव्हाण, पो. शि. तुषार भोसले, चा. पो. ना मारुती अडागळे यांनी पोलिस अधीक्षक अमोल तांबे, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती शितल जानवे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली होती.

Comments
Post a Comment