Posts

Showing posts from March, 2025

कराड शहर डीबी कडून चैन स्नॅचिंगचे 7 गुन्हे उघड, 8 लाखांचा मुद्देमाल जप्त.

Image
कराड : चैन स्नॅचिंग प्रकरणी अटक केलेल्या आरोपी समवेत पोलीस अधिकारी व कर्मचारी कराड शहर डीबी कडून चैन स्नॅचिंगचे 7 गुन्हे उघड, 8 लाखांचा मुद्देमाल जप्त. कराड, दि. 31 (प्रतिनिधी) - कराड शहरा व परिसरात घडलेल्या चैन स्नॅचिंग प्रकरणी कराड शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेने मोठी कारवाई करत सात गुन्हे उघडकीस आणत सुमारे आठ लाखाचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी संभाजी गोविंद जाधव रा. चंद्रसेननगर सांगली रोड विटा ता. खानापुर यास अटक करण्यात आली आहे.  कराड शहर पोलिसांनी दिलेल्या मिळालेल्या माहितीनुसार पोलीस उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकुर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजु ताशिलदार यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक अशोक भापकर व गुन्हे प्रकटीकरण शाखा पथकाने कराड शहर पोलीस ठाणे हद्दीत सैदापुर, मलकापुर व कराड शहरात चैन स्नॅचिंगचा हैदोस घालणा-या आरोपीस अटक केले आहे. गेले काही महीन्यापासुन कराड शहर पोलीस ठाणे हद्दीतील सैदापूर, मलकापुर व कराड शहरामध्ये चेन स्नॅचिंगचे गुन्हे घडलेले होते. सदरबाबत कराड शहर पोलीस ठाणेस गुन्हे नोंद करणेत आलेले आहेत. सदर गुन्हयांचे तपास कराड शहर पोलीस ठाणे गुन्हे प्रक...

सह्याद्री निवडणुकीत काँग्रेस पक्षाचा संबंध नाही; माझ्या नावाचा खोटा प्रचार - पृथ्वीराज चव्हाण

Image
सह्याद्री निवडणुकीत काँग्रेस पक्षाचा संबंध नाही; माझ्या नावाचा खोटा प्रचार - पृथ्वीराज चव्हाण कराड, दि. 31 (प्रतिनिधी) - सह्याद्री सहकारी साखर कारखान्याची निवडणूक ही कोणत्या राजकीय पक्षाची नाही. ही सहकाराची निवडणूक आहे, याचे सभासद आहेत. या निवडणुकीशी काँग्रेस पक्षाचा काही संबंध नाही. त्यामुळे मी कुठेही सह्याद्री निवडणुकीच्या अनुषंगाने काहीही बोललेलो नाही माझ्या नावाचा खोटा प्रचार सुरू असून काहीजण माझ्या नावाचा वापर करून संभ्रम व दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत असल्याचे वक्तव्य माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले.  सह्याद्री कारखान्याच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गत आठवड्यात काँग्रेसच्या काही पदाधिकाऱ्यांनी मेळावा घेऊन सह्याद्री कारखान्याच्या निवडणुकीत पी डी पाटील पॅनलला पाठिंबा असल्याचे जाहीर केले होते या पार्श्वभूमीवर विचारलेल्या प्रश्नावर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण पत्रकारांशी बोलत होते. सह्याद्री कारखान्याच्या निवडणुकीच्या अनुषंगाने माझ्या नावाचा वापर करून किंवा पक्षाच्या वतीने कोणी काहीही बोलेल असे होणार नाही. मी कोणालाही माझं वकीलपत्र दिलेलं नाही. माझ्या नावाचा ...

कराडात सोमवारी ईदगाह मैदानावर होणार सामुदायिक नमाज पठण

Image
  कराड संग्रहित छायाचित्र कराडात सोमवारी ईदगाह मैदानावर होणार सामुदायिक नमाज पठण  कराड, दि. 30 (प्रतिनिधी) देशभरातील महत्त्वाच्या ठिकाणी चंद्र दर्शन झाल्याने उद्या सोमवारी 31 मार्च रोजी देशभरात रमजान ईद (ईद-उल-फित्र) साजरी केली जाणार आहे. कराड शहर व परिसरात रमजान ईद विविध उपक्रमाने साजरी होणार असून शहरातील ऐतिहासिक ईदगाह मैदानावर सकाळी नऊ वाजता सामूहिक नमाज पठण (प्रार्थना) होणार आहे. अशी माहिती शाही ईदगाह कब्रस्तान ट्रस्टचे ट्रस्टी व सामाजिक कार्यकर्ते साबीरमिया मुल्ला यांनी दिली. रमजान ईद निमित्त आज रविवारी शहरातील बाजारपेठेत ईदच्या खरेदीसाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. सायंकाळी देशातील विविध महत्त्वाच्या शहरांमध्ये चंद्र दर्शन झाल्यानंतर मुस्लिम बांधवांच्या मध्ये आनंद उत्सव साजरा करण्यात आला. या पार्श्वभूमीवर सोमवारी सर्वत्र ईद साजरी केला जाणार असल्याचे जाहीर करण्यात आले. त्यानुसार कराड शहरातील ऐतिहासिक मनोरे मज्जिद येथून सकाळी आठ वाजता जुलूस (मिरवणूक) निघणार आहे. त्यानंतर ऐतिहासिक ईदगाह मैदानावर नऊ वाजता सामूहिक नमाज पठण (प्रार्थना) होणार आहे. कराड शहरातील इतरही मस्जिद...

विरोधकांनी केवळ स्वार्थासाठी सह्याद्रीची निवडणूक लावली - डॉ. विश्वजीत कदम

Image
कडेगाव :हिंगणगाव बुद्रुक येथे आयोजित प्रचार सभेत बोलताना डॉ. विश्वजीत कदम यावेळी व्यासपीठावर बाळासाहेब पाटील, अरुण लाड व अन्य मान्यवर.  विरोधकांनी केवळ स्वार्थासाठी सह्याद्रीची निवडणूक लावली - डॉ. विश्वजीत कदम    हिंगणगाव बुद्रुक मध्ये प्रचार सभेस उस्फुर्त प्रतिसाद     कडेगाव, दि. 30 (वार्ताहर) - विरोधकांनी सह्याद्री सहकारी साखर कारखान्याची निवडणूक ही केवळ राजकीय स्वार्थसाठी लावल्याची टिका माजी मंत्री आमदार डॉ. विश्वजीत कदम यांनी केली. ते हिंगणगाव बुद्रुक (ता. कडेगाव ) येथे आयोजित सह्याद्री कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या प्रचार सभेत बोलत होते. यावेळी पॅनेल प्रमुख माजी मंत्री बाळासाहेब पाटील, आमदार अरुण लाड उपस्थित होते. यावेळी बोलताना डॉ. कदम म्हणाले की, स्व. पी. डी. पाटील यांच्यानंतर माजी मंत्री बाळासाहेब पाटील यांनी सह्याद्री साखर कारखाना अतिशय चांगल्या पद्धतीने चालविला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या कारखान्याने सभासदांना चांगला दर दिला आहे. वेळोवेळी कारखान्याच्या माध्यमातून सभासदांचे हित जोपासण्याचा प्रयत्न केला आहे. अशा चांगल्या चालणाऱ्या का...

कराड तालुका गुन्हे प्रकटीकरण शाखेची दमदार कारवाई....

Image
कराड तालुका गुन्हे प्रकटीकरण शाखेची दमदार कारवाई.... विंग येथिल कापड दुकानातील चोरीचा गुन्हा केला दोन दिवसात उघड;72 हजाराचा मुद्देमाल जप्त कराड, दि. 29 (प्रतिनिधी) - विंग ता. कराड येथे 22 मार्च रोजी मध्यरात्री  MH50 मेन्स वेअर या कापड दुकानाच्या शटरचे अज्ञात चोरट्याने कुलूप तोडुन आतील ग्लासचे डिजीटल लॉक उचकटून चोरी केल्याची घटना घडली होती. या बाबत तक्रार दिलेने नमुद गुन्हा दाखल करणेत आला होता.  दिनांक 23 मार्च 2025 रोजी दाखल गुन्हयाच्या अनुशंगाने वरिष्ठांच्या सुचना नुसार कराड तालुका पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेतील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार हे तात्काळ आरोपी शोध कामी रवाना झाले होते, पहील्या टप्यात विंग स्टॉप, कोळे, कोळेवाडी, व चचेगांव वरील प्राप्त सी.सी.टी.व्ही फुटेज सलग 2 दिवस पाहुन त्याच्या साहयाने व खास बातमीदाराच्या महिती प्रमाणे संशयीत इसम यांची पडताळणी केली. व सलग दोन दिवस पाठलाग करुन अल्ताफ मगदुम मुल्ला, रा-चचेगांव यास ताब्यात घेतले. त्याचेकडे विचारपुस करीत असता तो उडवाउडवीची उत्तरे देत होता. त्याचेकडे कसुन तपास करता त्याने गु...

आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव

Image
  आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव कराड, ता. २८ : कराड दक्षिणचे लोकप्रिय आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी कोयना वसाहत येथील कृष्णा स्कुलच्या प्रांगणात आयोजित अभिष्टचिंतन सोहळ्यास विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून आ. डॉ. भोसले यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला.  प्रारंभी आ. डॉ. अतुलबाबा भोसले यांनी कृष्णा हॉस्पिटल कॅम्पसमधील सहकारमहर्षी स्व. जयवंतराव भोसले यांच्या पुतळ्यास अभिवादन केले. त्यानंतर ते कृष्णा स्कुलच्या प्रांगणात आयोजित अभिष्टचिंतन सोहळ्यास उपस्थित राहिले. याठिकाणी केक कापून वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी कृष्णा कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले, सौ. उत्तरा भोसले, सौ. गौरवी भोसले, श्री. विनायक भोसले, ज्येष्ठ नेते मदनराव मोहिते, सुदन मोहिते आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी माजी आमदार आनंदराव पाटील, भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष विक्रम पावसकर,राष्ट्रवादी काँग्रेसचे राजाभाऊ उंडाळकर, कामगार आयुक्त नितीन पाटणकर, माजी जि. प. सदस्य रमेश पाटील, कृष्णा कारखान्याचे उपाध्यक्ष जगदीश जगताप, ...

कराड लाचलुचपत प्रकरणात एकाला अटक;दोन दिवस पोलीस कोठडी

Image
कराड लाचलुचपत प्रकरणात एकाला अटक;दोन दिवस पोलीस कोठडी  नगरपरिषदेचे कार्यमुक्त मुख्याधिकारी फरार कराड, दि. 27 (प्रतिनिधी)  - कराड शहरात बांधकाम परवान्यासाठी १० लाखांच्या लाचेची मागणी करून पाच लाखांची लाच प्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या चौघांपकी दोघांना अटक केल्यानंतर काल एकाच ताब्यात घेऊन आज येथील न्यायालयात त्यास हजर केले असता दोन दिवसाची न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे. लाच प्रकरणातील हा खाजगी समाज असन अजिंक्य देव असे त्याचे नाव आहे. दरम्यान या लाच प्रकरणात चौघा विरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर तत्कालीन कार्यमुक्त मुख्याधिकारी अद्यापही फरार असून ते स्वतःच्या बचावासाठी जामीना साठी प्रयत्न करत असल्याची चर्चा आहे. याच दरम्यान या प्रकरणातील खाजगी इसमाला लाच लुचपत विभागाने ताब्यात घेतले असून त्याला आज येथील न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. यालाच प्रकरणात सातारा लाच रुचपत विभागाने यापूर्वी नगर परिषदेमधील बांधकाम विभागातील तौफिक शेख तसेच नगररचना कार्यालयातील स्वानंद शिरगुप्पे यांना ताब्यात घेऊन अटक केली आहे त्यानंतर त्यांनी या दोघांच्या घरांची झडत...

अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणी एकास वीस वर्षे कारावास

Image
अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणी एकास वीस वर्षे कारावास  कराड, दि. 27 (प्रतिनिधी) - अल्पवयीन बालिकेस खेळण्याचा बहाणा करून जबरदस्तीने घरामध्ये ओढत नेवुन तिचेशी शारिरीक संबंध केलेप्रकरणी आरोपीस दोषी धरून भा. द. वि. सं. कलम. ३७६, ३७६ (२) (एन),३७६ (एबी) पोक्सो ४, ६, अन्वये २० वर्षे कठोर कारावास व एकुण रक्कम रू. ५०,०००/- रूपयांची दंडाची शिक्षा येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती के. एस. होरे यांनी सुनावली आहे. बापु उर्फ नितीन रमेश पाटोळे (वय ३०) रा. बेघरवस्ती वारूंजी ता. कराड असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत हकीकत अशी की, 15 नोव्हेंबर २०२३ रोजी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास तसेच त्यांनतर दोन महिन्याने असे दोन वेळा यातील फिर्यादी यांचे घराशेजारी राहणारा बापु उर्फ नितीन रमेश पाटोळे वय. ३० वर्षे रा. बेघरवस्ती वारूंजी ता. कराड याने फिर्यादी यांची अल्पवयीन मुलगी (वय १०) ही अल्पवयीन असल्याचे माहीत असताना देखील ती घराबाहेर अंगणात खेळत असताना तिचा हात धरून त्याचे घरी ओढत नेवुन खेळण्याचा बहाणा करून तिचेवर जबरदस्तीने शारिरीक संबंध केले. त्यावेळी आरोपीने अल्पवयीन मुलीस आपले ...

आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन

Image
आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन कराड, दि. 26 : कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे कार्यतत्पर आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांचा वाढदिवस शुक्रवार दि. २८ मार्च रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त २८ मार्च ते ६ एप्रिलपर्यंत कराड शहर व ग्रामीण भागात भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. आ.डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त शुक्रवारी (ता. २८) कोयना वसाहत (ता. कराड) येथील कृष्णा इंग्लिश मिडियम स्कूलच्या प्रांगणावर शुभेच्छा सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. यादिवशी दुपारी ४.३० वाजता आ.डॉ. भोसले यांचे मुंबईहून कराड विमानतळावर आगमन होईल. त्यानंतर कृष्णा हॉस्पिटलमधील सहकारमहर्षी स्व. जयवंतराव भोसले (आप्पासाहेब) यांच्या पुतळ्यास अभिवादन करून, ते सायंकाळी ६ वाजलेपासून कृष्णा स्कूलच्या प्रांगणात शुभेच्छा स्वीकारण्यासाठी उपस्थित राहतील. यावेळी नागरिकांनी हार, तुरे, बुके न आणता शालेपयोगी साहित्य शुभेच्छा स्वरूपात आणावे, असे आवाहन वाढदिवस संयोजन समितीच्यावतीने करण्यात आले आहे. दरम्यान, शुक्रवारी (ता. २८) कराड येथील रिमांड होम आणि क...

कराडचे कार्यमुक्त मुख्याधिकारी यांच्यासह चौघे लाचलूचपतच्या जाळ्यात; कराडात खळबळ

Image
कराडचे कार्यमुक्त मुख्याधिकारी यांच्यासह चौघे लाचलूचपतच्या जाळ्यात; कराडात खळबळ दोघांना अटक, न्यायालयात हजर, दोन दिवस कोठडी कराड, दि. 24 (प्रतिनिधी) - कराड शहरातील एक बांधकाम परवाना देण्यासाठी दहा लाख रुपयांची लाच मागून त्यामधील पाच लाख रुपये स्वीकारताना कराड नगर परिषदेचे कार्यमुक्त मुख्याधिकारी यांच्यासह नगर रचना विभागातील सहाय्यक नगररचना अधिकारी, बांधकाम विभागातील लिपिक व एका खाजगी व्यक्तीला लाचलूचपत विभागाने सलग पाच दिवस सापळा रचून कारवाई केल्याने कराड शहरात खळबळ माजली आहे. याबाबत कराड शहर पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला असून आतापर्यंत दोघांना अटक केली असून अन्य दोघे फरार आहेत. दरम्यान या लाचखोरी प्रकरणी कराड शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आतापर्यंत नगरपरिषदेच्या नगररचना कार्यालयातील सहाय्यक नगररचनाकार स्वानंद शिरगुप्पे व बांधकाम विभागातील कनिष्ठ लिपिक तौफिक शेख या दोघांना अटक करून आज येथील न्यायालयात हजर केले असता त्यांना दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. सातारा लाच लुचपत विभागाने लाच प्रकरणात  १. शंकर खंदारे, तत्कालीन मुख्याध...

उपजिल्हा रूग्णालयातील वैद्यकीय अधिकार्‍यांना जागेवरच केले पदमुक्त

Image
  कराड उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी यांच्याशी चर्चा करताना माजी उपनगराध्यक्ष राजेंद्रसह यादव उपजिल्हा रूग्णालयातील वैद्यकीय अधिकार्‍यांना जागेवरच केले पदमुक्त उपचारातील दिरंगाईबद्दल राजेंद्रसिंह यादव यांनी घेतला आक्रमक पवित्रा, रूग्णालयाची केली पाहणी   कराड, दि. 24 - स्व. वेणूताई चव्हाण रूग्णालयामध्ये रूग्णांची हेळसांड होत असल्याच्या तक्रारी करण्यात आल्या होत्या. त्यानुसार माजी उपनगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव यांनी उपजिल्हा रूग्णालयात जावून याबाबत तात्काळ जाब विचारला व अधिकार्‍यांची झाडाझडती घेतली. त्यावर संबधित वैद्यकीय अधिकार्‍यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे रूग्णांच्या जीवाशी खेळणार्‍या अधिकार्‍यांवर जोपर्यंत कार्यवाही होत नाही तोपर्यंत येथून हलणार नाही. असा आक्रमक पवित्रा राजेंद्रसिंह यादव यांनी घेतला. घटनेचे गांभीर्य ओळखून संबंधित वैद्यकीय अधिकार्‍यांना तात्काळ पदमुक्त करण्याची कारवाई करण्यात आली. यावेळी माजी नगरसेविका स्मिता हुलवान, गजेंद्र कांबळे, प्रितम यादव, निशांत ढेकळे, विनोद भोसले, मनोज माळी आदी उपस्थित होते. दरम्यान, स्व. वेणूताई चव्हाण रूग्णालयामधील...

मुख्याधिकारी प्रशांत व्हटकर यांनी नगरपरिषदेचा पदभार स्वीकारला

Image
  नूतन  मुख्याधिकारी प्रशांत व्हटकर यांचे स्वागत करताना नगरपरिषद कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी व कर्मचारी.... मुख्याधिकारी प्रशांत व्हटकर यांनी नगरपरिषदेचा पदभार स्वीकारला  कराड, दि. 24 (प्रतिनिधी) येथील नगरपरिषदेचा मुख्याधिकारी पदाचा पदभार नूतन मुख्याधिकारी प्रशांत व्हटकर यांनी आज स्वीकारला. नगरपरिषदेचे विविध विभागाचे अधिकारी तसेच कर्मचारी संघटनेच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी व्हटकर यांनी अधिकारी, विभाग प्रमुख यांचा परिचय करून घेतला. यावेळी नगर अभियंता आर डी गायकवाड, अभियंता सूरज चव्हाण, लेखापाल मयूर शर्मा, आरोग्य निरीक्षक मुकेश अहिवळे, अग्निशामन दल प्रमुख श्रीकांत देवघरे उपस्थित होते. जालना जिल्ह्यातील मंठा नगरपंचायतमध्ये मुख्याधिकारी म्हणून 2016 ला प्रशांत व्हटकर यांनी सुरुवात केली. त्यानंतर नांदेड जिल्ह्यातील बिलोली नगरपरिषद, व कराडला येण्यापूर्वी ते बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा नगर परिषदेचे मुख्याधिकारी म्हणून कार्यरत होते.  मूळचे सोलापूरचे असलेले प्रशांत व्हटकर यांचे शिक्षण पुणे येथे झाले. नोकरीनिमित्त वडील पुणे येथे असल्याने ते पुणे येथे स्थाय...

एमडी ड्रग्ज प्रकरणात शहरातील दोन बड्या व्यावसायिकाच्या मुलांना अटक

Image
  एमडी ड्रग्ज प्रकरणात शहरातील दोन बड्या व्यावसायिकाच्या मुलांना अटक ड्रग्ज विक्रीची पाळेमुळे उखडण्यात कराड पोलिसांना यश कराड, दि. 23 (वार्ताहर ) कराड शहर व परिसरात एमडी ड्रग्ज विक्री करणाऱ्यांची पाळेमुळे उखडण्यात कराड पोलिसांना यश आले असून फरार असणाऱ्या बड्या व्यावसायिकांची दोन मुले गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या जाळ्यात अडकली आहेत. गौरव संदीप राव रा. गजानन हाउसिंग सोसायटी, कराड व सुजल उमेश चंदवानी (वय 19) रा. लाहोटीनगर मलकापूर या दोघाांना ताब्यात घेत अटक करण्यात आली आहे.  गत महिन्यात कराड शहर व परिसरात कारवाई करून 37 ग्रॅम ड्रग्जसह दोन परदेशी नागरिकांसह 14 जणांना अटक करण्यात आली होती. पोलिसांनी याा प्रकरणी तपास सखोल केला असता या प्रकरणात आणखी काही जणांचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले होते. त्याचबरोबर या प्रकरणातील शहर व परिसरातील बड्या व्यावसायिकांच्या मुलांचा यात समावेश असल्याची चर्चा सुरू झाली होती. अखेर या प्रकरणात फरारी असणाऱ्या दोन संंशयत आरोपीस कराड शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अधिकारी व कर्मचारी यांनी सापळा रचत दोघाांना ताब्यात घेऊन अटक केली आहे. याबाबत पोलिसांकडून मिळालेल...

कृष्णा कारखान्यास उच्च तांत्रिक कार्यक्षमतेसाठी राष्ट्रीय पुरस्कार जाहीर

Image
  कृष्णा कारखान्यास उच्च तांत्रिक कार्यक्षमतेसाठी राष्ट्रीय पुरस्कार जाहीर राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना संघाच्यावतीने होणार प्रदान कराड, दि. 22 (प्रतिनिधी) - रेठरे बुद्रुक (ता. कराड) येथील यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्यास उच्च तांत्रिक कार्यक्षमतेसाठी प्रथम क्रमांकाचा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर करण्यात आला. देशातील साखर क्षेत्रातील अग्रगण्य असणाऱ्या राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना संघाच्यावतीने हा पुरस्कार दिला जाणार आहे. लवकरच नवी दिल्ली येथे होणाऱ्या पुरस्कार सोहळ्यात हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.     देशातील सर्व सहकारी साखर कारखाने व नऊ राज्यांतील साखर संघ सदस्य असलेल्या नवी दिल्लीस्थित राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ या शिखर संस्थेमार्फत दरवर्षी देशातील सहकारी साखर कारखान्यांचे मूल्यांकन करण्यात येते. त्याआधारे ऊस उत्पादकता, तांत्रिक गुणवत्ता, वित्तीय व्यवस्थापन, अधिकतम ऊस गाळप, सर्वोत्तम साखर उतारा, सर्वात जास्त साखर निर्यात अशा विविध क्षेत्रांत देदीप्यमान कामगिरी करणाऱ्या सहकारी साखर कारखान्यांचे काटेकोर मूल्यमापन करून त्याआधारे केंद्रीय...

वडगाव हवेलीतील ओपन बैलगाडा शर्यतीत श्री ज्योतिर्लिंग प्रसन्न प्रथम

Image
वडगाव हवेलीतील ओपन बैलगाडा शर्यतीत श्री ज्योतिर्लिंग प्रसन्न प्रथम  माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त शर्यतीचे आयोजन कराड, दि. 21 : माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त वडगाव हवेली येथे झालेल्या भव्य ओपन बैलगाडा शर्यतीत श्री ज्योतिर्लिंग प्रसन्न, साईराज किरण आप्पा (कालगाव - शाळगाव) बैलगाडीने प्रथम क्रमांक पटकावला. विजेत्या प्रथम क्रमांकाच्या बैलगाडीस १ लाख १ हजाराचे बक्षीस देवून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते गौरविण्यात आले. यावेळी कराड दक्षिण काँग्रेसचे अध्यक्ष मनोहर शिंदे, पैलवान नानासाहेब पाटील, मुंबई येथील प्रसिद्ध उद्योजक व येवती गावचे सुपुत्र दिपकशेठ लोखंडे, अकाईवाडी (जिंती)चे सुपुत्र व मुंबईस्थित उद्योजक बाबाशेठ बागल, जिल्हा परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते जयवंतराव उर्फ बंडानाना जगताप, गजानन आवळकर, माजी पंचायत समिती सदस्य नामदेव पाटील, अधिकराव चव्हाण, युवा नेते इंद्रजित चव्हाण, गजानन आवळकर, कराड दक्षिण सेवादल काँग्रेसचे अध्यक्ष शिवाजीराव मोहिते, अॅड . नरेंद्र नांगरे - पाटील, प्रदीप जाधव, कराड दक्षिण काँग्रेसचे उपाध्...

सह्याद्री कारखान्याच्या निवडणुकीतून 144 उमेदवारांची माघार

Image
  सह्याद्री कारखान्याच्या निवडणुकीतून 144 उमेदवारांची माघार; निवडणूक तिरंगी होण्याची शक्यता  पी डी पाटील पॅनलचे उमेदवार जाहीर कराड, दि, 21 (प्रतिनिधी) - सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत आज अर्ज माघारी घेण्याचे शेवटच्या दिवशी 144 उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतलेने निवडणुकीच्या रिंगणात आता 70 उमेदवार उरले आहेत. अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी संजीवकुमार सुद्रिक यांनी दिली. यामध्ये सत्ताधारी पी डी पाटील पॅनलने 21 अधिकृत उमेदवारांची आपली यादी जाहीर केल्याने विरोधी गटातील 49 उमेदवारांचे एक पॅनल असणार की दोन पॅनेल हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.  दरम्यान पी डी पाटील पॅनलने आपले 21 उमेदवारांची यादी जाहीर केल्यानंतर विरोधी गटाकडून त्यांच्या पॅनलचे उमेदवार जाहीर होणे अपेक्षित होते मात्र रात्री उशिरापर्यंत कराडच्या शेती उत्पन्न बाजार समितीमध्ये दिग्गज नेत्यांमध्ये खलबते सुरू होती. रात्री उशिरापर्यंत ही चर्चा सुरू असल्याने नेमकी कोणती भूमिका विरोधी गटातील नेत्यांनी घेतली हे समजू शकले नाही. मात्र चेअरमन पदाच्या तिढ्याने ही लढत तिरंगी होणार असल्याचे ...

कराड नगरपरिषदेच्या मुख्याधिकारीपदी प्रशांत व्हटकर

Image
 कराड नगरपरिषदेच्या मुख्याधिकारीपदी प्रशांत व्हटकर  कराड, दि. 20 (प्रतिनिधी) बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी प्रशांत व्हटकर यांची पदोन्नतीने कराड नगर परिषदेच्या मुख्याधिकारी पदी निवड करण्यात आली असून कराडचे मुख्याधिकारी शंकर खंदारे यांना आज गुरुवार दिनांक 20 मार्च रोजी कार्यमुक्त करण्यात येत असल्याचे आदेश आज राज्यपालांच्या आदेशाने काढण्यात आले आहेत. शनिवार दि. 22 मार्च रोजी प्रशांत व्हटकर हे कराड नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी पदाचा पदभार स्वीकारणार आहेत. 10 जून 2023 रोजी कराड नगरपालिका नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी पदी शंकर खंदारे यांची निवड झाली होती. त्यानंतर 13 जुलै रोजी 2023 रोजी खंदारे यांना अतिरिक्त आयुक्त पदावर पदोन्नती देण्यात आली होती. पदोन्नती नंतर खंदारे यांना अमरावती विभागातील अकोला महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त पदावर पदस्थापना देण्यात आल्याचे आदेश शासनाच्या वतीने काढण्यात आले होते. मात्र खंदारे यांनी या ठिकाणचा पदभार स्वीकारला नव्हता ते कराडला मुख्याधिकारी म्हणून कायम राहिले होते.  दरम्यान कराड नगर परिषदेचे मुख्याधिकारी शंकर खंदारे यांना...

पोलीस उपनिरीक्षक उत्तम बर्गे यांचे पोलीस दलातील काम आदर्शवत - पोलीस अधीक्षक समीर शेख...

Image
पोलीस उपनिरीक्षक उत्तम बर्गे यांचे पोलीस दलातील काम आदर्शवत - पोलीस अधीक्षक समीर शेख कराड, दि. 20 (प्रतिनिधी) : प्रामाणिकपणा, विश्वास याला प्राधान्य देत कामाची गतीमानता, निर्णयक्षमता आणि आपल्या कामाला आनंद मानण्याची वृत्ती जोपासताना कराड गुन्हे शाखा विभागातील पोलिस उपनिरीक्षक उत्तम पांडुरंग बर्गे यांनी पोलिस दलात निष्कलंक काम करून आदर्श निर्माण केला असे प्रतिपादन सातारा जिल्हा पोलिस अधीक्षक समीर शेख यांनी केले. कराड येथील गुन्हे शाखा विभागातील पोलिस उप निरीक्षक उत्तम बर्गे यांच्या पोलीस दलातील सेवानिवृत्ती निमित्त जिल्हा पोलिस दलाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या सत्कार समारंभात ते बोलत होते. यावेळी अतिरिक्त पोलीस अधिक्षक वैशाली कडूकर, गृह विभागाचे पोलिस उप अधीक्षक अतुल सबनीस, आ. डॉ अतुल भोसले यांचे स्विय सहाय्यक फत्तेसिंह सरनोबत, श्री बर्गे यांच्या सुविद्या पत्नी सौ. अनिता उत्तम बर्गे, डॉ. लक्ष्मणराव कदम यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी जिल्हा पोलिस अधीक्षक समीर शेख यांच्या हस्ते उत्तम बर्गे यांचा स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र, भेटवस्तू देऊन सपत्नीक सत्कार करण्यात आला. उत्तम बर्गे हे साता...

सह्याद्री कारखान्यात ईएसपी यंत्रणा चोकअप होऊन फुटल्याने किरकोळ दुर्घटना

Image
सह्याद्री कारखान्यात विस्तारित प्रकल्पात चाचणी सुरू असताना किरकोळ दुर्घटना कराड, दि. 20 (प्रतिनिधी) सह्याद्रि सहकारी साखर कारखान्याच्या नवीन विस्तारवाढ प्रकल्पामध्ये चाचणी दरम्यान सुरू असलेल्या कामात ई एस पी यंत्रणा चोकअप होऊन फुटल्याने किरकोळ दुर्घटना घडली असून यामध्ये तीन कामगार किरकोळ जखमी झाले असून कारखान्याचा बॉयलर व अन्य यंत्रणा सुरक्षित असल्याची माहिती कारखान्याच्या कार्यकारी संचालक आबासाहेब पाटील यांनी दिली आहे. सह्याद्री कारखान्यातील विस्तारित प्रकल्पामध्ये दिनांक 10/03/2025 पासून नवीन थरमॅक्स मेक 150 टनी बॉयलरचे थरमॅक्स कंपनीचे इंजिनिअर यांचे मार्गदर्शनाखाली व मे. के. बॉव्हेट यांचे लोकांचे मार्फत टेस्टींग व ब्लो ऑफ चे काम चालु आहे. दिनांक 10/03/2025 पासून आज पर्यंत बॉयलर व्यवस्थित चालु आहे. काल दिनांक 19/03/2025 पर्यंत एकुण 16 ब्लो ऑफ दिलेले आहेत.  बॉयलर मधुन निघणारी धुर मिश्रीत राख वेगळी करणेकरीता ई एस पी नावाची यंत्रणा बॉयलर व चिमणीच्या मध्ये बसविलेली असते. हि यंत्रणा चोकअप झाल्यामुळे सदर यंत्रणेची साईड प्लेट फाटलेमुळे मोठा आवाज झालेने सदर ठिकाणी अपघात झालेला आहे. याठिक...

ब्रिटिशकालीन कोयना पुलावरून उडी मारून वृद्धाने केली आत्महत्या

Image
ब्रिटिशकालीन कोयना पुलावरून उडी मारून वृद्धाने केली आत्महत्या कराड, दि.17 (प्रतिनिधी) - कराडच्या ब्रिटिशकालीन जुन्या कोयना पुलावरून एका वृद्ध इसमाने नदीपात्रात उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. नजीर पठाण (वय 68 वर्ष) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. या घटनेमुळे कोयना पुलावर बराच वेळ वाहतूक ठप्प झाली होती. रात्री उशिरापर्यंत या घटनेची तक्रार शहर पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाली नव्हती. घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार वारुंजी परिसरातील एक वृद्ध व्यक्ती मोपेड वरून वारुंजी बाजूकडे जात होती. संबंधित व्यक्तीने गाडी पुलावरच लावून नदीपात्रात उडी घेतली असल्याचे काहीजण सांगत होते. गाडी व नदीपात्रात कोण दिसते का हे पाहण्यासाठी पुलावर मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याने वाहतूक खोळंबली होती.  दरम्यान या घटनेची माहिती मिळताच पोलीस यंत्रणेने सूचना दिल्यानंतर कराड अग्निशामक दलाने नदीपात्रात उतरून शोध घेत वृद्धाचा मृतदेह नदीपात्रा बाहेर काढला आहे. सदर व्यक्तीचे नजीर पठाण (वय 68 वर्ष) रा. सह्याद्री हॉस्पिटलच्या समोर असे नाव असून त्याने 6.30 दरम्यान जुन्या पुलावरून कोयना नदीपात्रात उडी म...

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त वडगाव हवेलीत गुरुवारी भव्य ओपन बैलगाडा शर्यत.

Image
  माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त वडगाव हवेलीत गुरुवारी भव्य ओपन बैलगाडा शर्यत. कराड, दि. 17 (प्रतिनिधी) : माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त येत्या गुरुवारी (दि. २०) वडगाव हवेली येथील कोडोली रस्ता कृष्णा कॅनॉललगत भव्य ओपन बैलगाडा शर्यती होणार आहेत. विजेत्या प्रथम क्रमांकाच्या बैलगाडीस १ लाख १ हजाराचे बक्षीस दिले जाणार आहे. पैलवान नानासाहेब पाटील मित्रपरिवार व पैलवान नानासाहेब पाटील कुस्ती संघटना, दिपकशेठ लोखंडे तसेच बाबाशेठ बागल मित्रपरिवार, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने हे मैदान होणार आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले आहेत. गुरुवारी भव्य ओपन बैलगाडा शर्यती होणार आहेत. यावेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, अॅ ड. उदयसिंह पाटील - उंडाळकर, कराड दक्षिण काँग्रेसचे अध्यक्ष मनोहर शिंदे, पैलवान नानासाहेब पाटील, मुंबई येथील प्रसिद्ध उद्योजक व येवती गावचे सुपुत्र दिपकशेठ लोखंडे, अकाईवाडी (जिंती) चे सुपुत्र व मुंबईस्थित उद्योजक बाबाशेठ बागल, प्रा. धनाजी काटकर, जिल्हा परिष...

ग्राहक पंचायतीच्या कराड शहर अध्यक्षपदी नितीन शहा यांची निवड

Image
कराड शहर अध्यक्ष पदी  निवड झालेबद्दल नितीन शहा यांचा सत्कार  करताना सातारा जिल्हा अध्यक्षा सुनीताराजे घाटगे सोबत कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष बी जे पाटील ग्राहक पंचायत महाराष्ट्रच्या कराड शहर कमिटीची निवड.  शहर अध्यक्षपदी नितीन शहा. कराड, दि. 17 (प्रतिनिधी) - ग्राहक पंचायत महाराष्ट्र राज्याची कराड शहर कार्यकारणी जाहीर झाली आहे. या कार्यकारणीची घोषणा ग्राहक पंचायत महाराष्ट्रच्या कोषाध्यक्षा व सातारा जिल्ह्याच्या अध्यक्षा सुनितराजे घाटगे यांनी बाबुभाई पदमसी सभागृह, विठ्ठल चौक, कराड येथे झालेल्या कार्यकारणी सभेत केली. या कार्यक्रमात ग्राहक पंचायत कोल्हापूर जिल्ह्याचे अध्यक्ष बी जे पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी कराड शहराचे नवनिर्वाचित अध्यक्ष नितीन शहा आणि अन्य ग्राहक पंचायत सदस्य उपस्थित होते, यामुळे कार्यकारणीच्या कार्यप्रणालीसाठी एक सकारात्मक वातावरण तयार झाले आहे. या कार्यकारणीच्या स्थापनेमुळे कराड तालुक्यातील स्थानिक ग्राहकांच्या हक्कांचे संरक्षण आणि त्यांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी एक मजबूत मंच तयार झाला आहे. ग्राहक पंचायतच्या माध्यमातून कार्पोरेट हॉस्पिटल,...

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा होणार

Image
 माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा होणार कराड, दि. 16 : माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (बाबा) यांचा 78 वा वाढदिवस आज 17 मार्च रोजी विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा होत आहे. वाढदिवसानिमित्त माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (बाबा) हे वाढदिवसानिमित्त पाटण कॉलनी येथील त्यांच्या निवासस्थानी सकाळी ११ वाजले पासून शुभेच्छा स्वीकारणार असल्याची माहिती कराड दक्षिण काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मनोहर शिंदे यांनी दिली आहे. मा. पृथ्वीराज बाबांच्या वाढदिवसानिमित्त सर्व काँग्रेस कार्यकर्त्यांनी शुभेच्छा देण्यासाठी पुष्पगुच्छ हार तुरे न आणता शैक्षणिक उपयोगी साहित्य आणावे असेही आवाहन करण्यात आले आहे.

वाठार येथील पंपावरील चोरीचा गुन्हा उघड; पंपावरील कामगारच गुन्ह्यात सहभागी

Image
कराड तालुका गुन्हे प्रकटीकरण शाखेची दमदार कारवाई  वाठार येथिल पेट्रोल पंपावर झालेल्या सशस्त्र जबरी चोरीचा गुन्हा उघड  पेट्रोल पंपावरील कामगारच सहभागी असल्याचे झाले निष्पन्न् कराड, दि. 16 - कराड तालुका गुन्हे प्रकटीकरण शाखेने दमदार कामगिरी करत वाठार येथील पेट्रोल पंपावर झालेल्या सशस्त्र चोरीचा गुन्हा उघड केला असून पेट्रोल पंपावरील कामगारच या गुन्ह्यात सहभागी असल्याचे निष्पन्न झाले आहे. या गुन्ह्यात एका अल्पवयीन मुलासह चौघांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून मोबाईल मोटरसायकल व चोरीतील रक्कम जप्त करण्यात आली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,  वाठार ता. कराड येथिल श्री गणेश पेट्रोल पंपावर दि. 10/03/2025 रोजी रात्री 12.00 वा. चे सुमारास दोन अनोळखी इसम मोटार सायकल वरुन येवुन पेट्रोल भरण्याचा बहाणा करुन पेट्रोल पंपा वरील कामगारावर कोयत्याने हल्ला करुन त्याचे खांदयाला अडकवलेली पैशाची बॅग जबरदस्ती हिसकावुन घेवून तेथुन त्याचे मोटार सायकल वरून पळून गेले आहेत अशी तक्रार दिलेने नमुद गुन्हा दाखल करणेत आला होता, सदर प्रकाराचे गांर्भिय लक्षात घेवुन मा. पोलीस अधिक्षक ...

कार्वे येथील आरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद : चौदाशेहून अधिक नागरिकांची मोफत तपासणी

Image
कार्वे येथील आरोग्य शिबिरास माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी भेट देऊन नागरिकांशी संवाद साधला. कार्वे येथील आरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद : चौदाशेहून अधिक नागरिकांची मोफत तपासणी कराड, दि.16 : कोणताही आजार अंगावर काढू नये वैद्यकीय तंत्रज्ञान प्रगत झाले असल्याने कोणत्याही आजारावार तात्काळ उपचार होण्यासाठी तपासणी आवश्यक आहे. त्यामुळे स्वतः च्या आरोग्याची काळजी स्वतः प्राथमिकतेने घेतली पाहिजे यासाठी जास्तीत जास्त नागरिकांनी आरोग्य शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी कार्वे येथे केले. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त कार्वे येथे आयोजित आरोग्य शिबिरात जवळपास चौदाशेहुन अधिक नागरिकांनी सहभाग नोंदविला. यावेळी कराड दक्षिण काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मनोहर शिंदे, माजी पं स सदस्य नामदेवराव पाटील, इंद्रजित चव्हाण, कार्वेचे माजी सरपंच वैभव थोरात, शब्बीर मुजावर, काँग्रेसचे डॉक्टर सेलचे जिल्हाध्यक्ष डॉ.विलास थोरात, रंगराव थोरात, विष्णू हुलवान, विठ्ठल हुलवान, माणिकतात्या थोरात, प्रल्हाद हुलवान, सुजित थोरात, भगवान सुतार, अशोकराव थोरात, साह...

कोल्हापूर नाक्यावर सेगमेंट बसवण्यापूर्वीच कोसळला; दोन कर्मचारी किरकोळ जखमी.

Image
कोल्हापूर नाक्यावर सेगमेंट बसवण्यापूर्वीच कोसळला; दोन कर्मचारी किरकोळ जखमी. 17 महिन्यात 1 हजार 87 सेगमेंट बसवण्यात आले कराड दि. 15 (प्रतिनिधी) - कोल्हापूर नाक्यावर हॉटेल संगम समोर तीव्र वळणावर असलेल्या शेवटच्या सहा पिलर वर सध्या सेगमेंट बसवण्याचे काम चालू असताना आज सेगमेंट उचलण्यापूर्वीच तो कोसळल्याने दुर्घटना घडली. यात नरेंद्र सिंग (वय 28) व दिनेश सिंग (वय 29) हे दोघे जखमी झाले आहेत. अशी माहिती या पुलाचे इन्चार्ज सौरभ घोष यांनी दिली. आज शनिवारी सायंकाळी कोल्हापूर नाक्यावर पिलर क्रमांक 85 ते 86 दरम्यान सेगमेंट बसवण्याचे काम सुरू होते. त्यासाठी भव्य ट्रेलर वरून पहिला सेगमेंट साडेपाच वाजता कोल्हापूर नाक्यावर दाखल झाला. त्यानंतर सहा कर्मचारी संबंधित सेगमेंट गर्डर लॉन्चिंग मशीनच्या माध्यमातून पिलर वर सेगमेंट बसवण्यासाठीचे कामकाज सुरू केले. यासाठी अन्य दोन क्रेनची मदत ही घेण्यात आली होती.  साडेसहा वाजता सेगमेंटचे लॉन्चिंगचे काम बऱ्यापैकी झाले होते. याचवेळी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्या गाड्यांचा ताफा कोल्हापूर नाक्यावरून ढेबेवाडी फाट्याकडे रवाना झाला. त्या...

‘कृष्णा’मध्ये पाठीच्या कण्यामधील विकृतीसाठी विशेष शस्त्रक्रिया अभियान

Image
 ‘कृष्णा’मध्ये पाठीच्या कण्यामधील विकृतीसाठी विशेष शस्त्रक्रिया अभियान १८ ते २१ मार्च दरम्यान आयोजन; अमेरिकेतील तज्ज्ञ डॉक्टर करणार शस्त्रक्रिया कराड, दि. १५ : कृष्णा विश्व विद्यापीठ आणि अमेरिकेतील स्टँडिंग स्ट्रेट मिशन संस्थेच्यावतीने कृष्णा हॉस्पिटलमध्ये पाठीच्या कण्यामध्ये विकृती असलेल्या रुग्णांसाठी विशेष शस्त्रक्रिया अभियान राबविले जाणार आहे. १८ ते २१ मार्च दरम्यान चालणाऱ्या या अभियानात पाठीच्या कण्यामधील विकृती असणाऱ्या ५ ते २० वर्ष वयोगटातील आर्थिक दुर्बल कुटुंबातील रुग्णांवर अमेरिकेतील मणक्यांचे तज्ज्ञ डॉक्टर शस्त्रक्रिया करणार आहेत. मणक्याचे हाड हे मानवी शरीराचे महत्त्वाचे अंग आहे. ते शरीराला आधार आणि संरक्षण पुरवतेच, तसेच छाती आणि पोटातील अवयवांनाही सुरक्षित ठेवते. शिवाय ते मणक्यांच्या हाडांच्या आत स्पाइनल कॉर्डला सामावून घेते; जे मेंदू आणि संपूर्ण शरीर यांच्यातील मुख्य जोडणी आहे. जेव्हा मणक्याला विकृती येते, तेव्हा शरीराची ठेवण आणि संतुलन बिघडते. तसेच हृदय व फुफ्फुसांसारखे महत्त्वाचे अवयव दाबले जातात. भारतामध्ये जगातील सर्वाधिक स्पाइनल विकृतीच्या केसेस नोंदल्या गेल्या आह...