सह्याद्री निवडणुकीत काँग्रेस पक्षाचा संबंध नाही; माझ्या नावाचा खोटा प्रचार - पृथ्वीराज चव्हाण


सह्याद्री निवडणुकीत काँग्रेस पक्षाचा संबंध नाही; माझ्या नावाचा खोटा प्रचार - पृथ्वीराज चव्हाण

कराड, दि. 31 (प्रतिनिधी) - सह्याद्री सहकारी साखर कारखान्याची निवडणूक ही कोणत्या राजकीय पक्षाची नाही. ही सहकाराची निवडणूक आहे, याचे सभासद आहेत. या निवडणुकीशी काँग्रेस पक्षाचा काही संबंध नाही. त्यामुळे मी कुठेही सह्याद्री निवडणुकीच्या अनुषंगाने काहीही बोललेलो नाही माझ्या नावाचा खोटा प्रचार सुरू असून काहीजण माझ्या नावाचा वापर करून संभ्रम व दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत असल्याचे वक्तव्य माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले. 

सह्याद्री कारखान्याच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गत आठवड्यात काँग्रेसच्या काही पदाधिकाऱ्यांनी मेळावा घेऊन सह्याद्री कारखान्याच्या निवडणुकीत पी डी पाटील पॅनलला पाठिंबा असल्याचे जाहीर केले होते या पार्श्वभूमीवर विचारलेल्या प्रश्नावर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण पत्रकारांशी बोलत होते.

सह्याद्री कारखान्याच्या निवडणुकीच्या अनुषंगाने माझ्या नावाचा वापर करून किंवा पक्षाच्या वतीने कोणी काहीही बोलेल असे होणार नाही. मी कोणालाही माझं वकीलपत्र दिलेलं नाही. माझ्या नावाचा खोटा व दिशाभूल करणारा प्रकार सुरू असल्याचे सांगून पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, कारखान्या बबतचा निर्णय सभासदांनी घ्यायचा आहे त्यामुळे कोणीही माझ्या वतीने काहीही सांगेल हे अत्यंत चुकीचा आहे. असा कोणी संभ्रम व दिशाभूल करण्याचा प्रयत्न करू नये. मी कारखान्याचा सभासद नाही त्यामुळे मी माझी भूमिका ठरवेन. त्यामुळे माझ्या नावाचा गैरप्रचार खोटा प्रचार करू नये

स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या प्रयत्नाने व पुढाकाराने सह्याद्री साखर कारखाना उभारला आहे. सह्याद्री कारखाना हा कराड तालुक्याचे अस्मित आहे. त्यामुळे या निवडणुकीत कोणता पक्ष अथवा कोणी काहीही केलं तर तरी सुज्ञ सभासद योग्य निर्णय घेण्यास समर्थ आहेत व ते घेतील असे सांगून पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, सह्याद्रीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर अनेक जण मला वारंवार भेटून गेले परंतु मी कोणालाही कसलाही शब्द दिलेला नाही. त्यामुळे माझ्या नावाचा खोटा व अपप्रचार सुरू सुरू असून सभासदारांमध्ये संभ्रमवस्था पसरवण्याचं चुकीचं काम असल्याचे ते म्हणाले. 

राजू सनदी, कराड टुडे न्यूज 

Comments

Karad Today News

कराड शहरातील दोन गुन्हेगाराकडून चोरीच्या 9 मोटरसायकली जप्त

स्व. यशवंतराव चव्हाण कृषि प्रदर्शनाच्या मंडप उभारणीस प्रारंभ

वारुंजी जिल्हा परिषद गटावर काँग्रेसचा झेंडा फडकवा – पृथ्वीराज चव्हाण

मलकापूर नगरपरिषद निवडणुकीत भाजपाचे नगराध्यक्ष पदासह 18 नगरसेवक विजयी

सुपने जिल्हा परिषद गट काँग्रेसने ताकदीने लढावा –कार्यकर्त्यांचा पृथ्वीराज चव्हाण यांच्यासमोर आग्रह

कराडमध्ये रविवारी रंगणार ‘कृष्णा मॅरेथॉन’चा थरार

मल्हारपेठ - पंढरपूर रस्त्याच्या कामविरोधात बाधित शेतकरी आक्रमक