मुख्याधिकारी प्रशांत व्हटकर यांनी नगरपरिषदेचा पदभार स्वीकारला
नूतन मुख्याधिकारी प्रशांत व्हटकर यांचे स्वागत करताना नगरपरिषद कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी व कर्मचारी....मुख्याधिकारी प्रशांत व्हटकर यांनी नगरपरिषदेचा पदभार स्वीकारला
कराड, दि. 24 (प्रतिनिधी) येथील नगरपरिषदेचा मुख्याधिकारी पदाचा पदभार नूतन मुख्याधिकारी प्रशांत व्हटकर यांनी आज स्वीकारला. नगरपरिषदेचे विविध विभागाचे अधिकारी तसेच कर्मचारी संघटनेच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी व्हटकर यांनी अधिकारी, विभाग प्रमुख यांचा परिचय करून घेतला. यावेळी नगर अभियंता आर डी गायकवाड, अभियंता सूरज चव्हाण, लेखापाल मयूर शर्मा, आरोग्य निरीक्षक मुकेश अहिवळे, अग्निशामन दल प्रमुख श्रीकांत देवघरे उपस्थित होते.
जालना जिल्ह्यातील मंठा नगरपंचायतमध्ये मुख्याधिकारी म्हणून 2016 ला प्रशांत व्हटकर यांनी सुरुवात केली. त्यानंतर नांदेड जिल्ह्यातील बिलोली नगरपरिषद, व कराडला येण्यापूर्वी ते बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा नगर परिषदेचे मुख्याधिकारी म्हणून कार्यरत होते.
मूळचे सोलापूरचे असलेले प्रशांत व्हटकर यांचे शिक्षण पुणे येथे झाले. नोकरीनिमित्त वडील पुणे येथे असल्याने ते पुणे येथे स्थायिक झाले. पदवीनंतर कम्प्युटर इंजिनीयर झालेले व्हटकर हे 2016 रोजी प्रशासकीय सेवेत मंठा नगरपंचायतमध्ये मुख्याधिकारी म्हणून रुजू झाले. विदर्भ मराठवाड्यानंतर पहिल्यांदाच पश्चिम महाराष्ट्रात मुख्याधिकारी म्हणून प्रशांत व्हटकर यांची बदली झाली आहे. तरुण व शिस्तप्रिय असलेले व्हटकर हे कराडसह सातारा जिल्हा पूर्णपणे जाणून आहेत. कराडचा चांगलाच परिचय असल्याचे सांगून त्यांनी या कराडने दोन मुख्यमंत्री राज्याला दिले असल्याचेही सांगून चांगल्या कामाला आपले नेहमीच प्राधान्य राहील असेही ते म्हणाले.
Comments
Post a Comment