सह्याद्री कारखान्यात ईएसपी यंत्रणा चोकअप होऊन फुटल्याने किरकोळ दुर्घटना


सह्याद्री कारखान्यात विस्तारित प्रकल्पात चाचणी सुरू असताना किरकोळ दुर्घटना

कराड, दि. 20 (प्रतिनिधी) सह्याद्रि सहकारी साखर कारखान्याच्या नवीन विस्तारवाढ प्रकल्पामध्ये चाचणी दरम्यान सुरू असलेल्या कामात ई एस पी यंत्रणा चोकअप होऊन फुटल्याने किरकोळ दुर्घटना घडली असून यामध्ये तीन कामगार किरकोळ जखमी झाले असून कारखान्याचा बॉयलर व अन्य यंत्रणा सुरक्षित असल्याची माहिती कारखान्याच्या कार्यकारी संचालक आबासाहेब पाटील यांनी दिली आहे.

सह्याद्री कारखान्यातील विस्तारित प्रकल्पामध्ये दिनांक 10/03/2025 पासून नवीन थरमॅक्स मेक 150 टनी बॉयलरचे थरमॅक्स कंपनीचे इंजिनिअर यांचे मार्गदर्शनाखाली व मे. के. बॉव्हेट यांचे लोकांचे मार्फत टेस्टींग व ब्लो ऑफ चे काम चालु आहे. दिनांक 10/03/2025 पासून आज पर्यंत बॉयलर व्यवस्थित चालु आहे. काल दिनांक 19/03/2025 पर्यंत एकुण 16 ब्लो ऑफ दिलेले आहेत. 

बॉयलर मधुन निघणारी धुर मिश्रीत राख वेगळी करणेकरीता ई एस पी नावाची यंत्रणा बॉयलर व चिमणीच्या मध्ये बसविलेली असते. हि यंत्रणा चोकअप झाल्यामुळे सदर यंत्रणेची साईड प्लेट फाटलेमुळे मोठा आवाज झालेने सदर ठिकाणी अपघात झालेला आहे. याठिकाणी कोणत्याही प्रकारे आग लागलेली नाही व कोणत्याही प्रकारची जिवीत हानी झालेली नाही. फक्त सदर ठिकाणी निरीक्षण करणारी लोकं होती ते आवाज झाल्यामुळे पळत असताना त्यातील तीन लोक थोड्या फार प्रमाणात जखमी झालेले आहेत. सदर जखमी लोकांना ताबडतोब कृष्णा चॅरीटेबल टस्ट्र कराड येथे उपचारा करीता पाठविलेले असून त्यांचेवर उपचार झाले आहेत व आज रात्रीपर्यंत त्यांना डिसचार्ज मिळणार आहे. बॉयलर मध्ये मोठा स्फोट झालेला नाही. तरी सभासद शेतकरी बंधुनी विविध सोशल मिडियावर सदर घटनेबाबत प्रदर्शित हाणार्या अफवांवर विश्वास ठेवू नये, सदर यंत्रणा दुरुस्त करुन पुन्हा लवकरात लवकर चालू करण्याचा प्रयत्न करत आहोत, अशी माहिती व्यवस्थापनाच्यावतीने कारखान्याचे कार्यकारी संचालक आबासाहेब पाटील यांनी दिली.

राजू सनदी, कराड 


Comments

Karad Today News

कराड शहरातील दोन गुन्हेगाराकडून चोरीच्या 9 मोटरसायकली जप्त

स्व. यशवंतराव चव्हाण कृषि प्रदर्शनाच्या मंडप उभारणीस प्रारंभ

वारुंजी जिल्हा परिषद गटावर काँग्रेसचा झेंडा फडकवा – पृथ्वीराज चव्हाण

मलकापूर नगरपरिषद निवडणुकीत भाजपाचे नगराध्यक्ष पदासह 18 नगरसेवक विजयी

सुपने जिल्हा परिषद गट काँग्रेसने ताकदीने लढावा –कार्यकर्त्यांचा पृथ्वीराज चव्हाण यांच्यासमोर आग्रह

कराडमध्ये रविवारी रंगणार ‘कृष्णा मॅरेथॉन’चा थरार

मल्हारपेठ - पंढरपूर रस्त्याच्या कामविरोधात बाधित शेतकरी आक्रमक