ग्राहक पंचायतीच्या कराड शहर अध्यक्षपदी नितीन शहा यांची निवड
ग्राहक पंचायत महाराष्ट्रच्या कराड शहर कमिटीची निवड.
शहर अध्यक्षपदी नितीन शहा.
कराड, दि. 17 (प्रतिनिधी) - ग्राहक पंचायत महाराष्ट्र राज्याची कराड शहर कार्यकारणी जाहीर झाली आहे. या कार्यकारणीची घोषणा ग्राहक पंचायत महाराष्ट्रच्या कोषाध्यक्षा व सातारा जिल्ह्याच्या अध्यक्षा सुनितराजे घाटगे यांनी बाबुभाई पदमसी सभागृह, विठ्ठल चौक, कराड येथे झालेल्या कार्यकारणी सभेत केली.
या कार्यक्रमात ग्राहक पंचायत कोल्हापूर जिल्ह्याचे अध्यक्ष बी जे पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी कराड शहराचे नवनिर्वाचित अध्यक्ष नितीन शहा आणि अन्य ग्राहक पंचायत सदस्य उपस्थित होते, यामुळे कार्यकारणीच्या कार्यप्रणालीसाठी एक सकारात्मक वातावरण तयार झाले आहे.
या कार्यकारणीच्या स्थापनेमुळे कराड तालुक्यातील स्थानिक ग्राहकांच्या हक्कांचे संरक्षण आणि त्यांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी एक मजबूत मंच तयार झाला आहे. ग्राहक पंचायतच्या माध्यमातून कार्पोरेट हॉस्पिटल, इंडस्ट्रीयल सुरक्षा, सोनार कारागिरी मूल्य, खाजगी सावकरी, साखर कारखाने वजन काटा इ. बाबत संबंधित विभाग यांचेसोबत चर्चासत्र आयोजित करणेबाबत तसेच १५ मार्च जागतिक ग्राहक दिन साजरा करणेबाबत निर्णय झाला. तसेच ग्राहकांच्या हितासाठी विविध उपक्रम राबवले जातील आणि त्यांच्या समस्यांवर लक्ष केंद्रित केले जाईल, अशी ग्वाही कराड शहर अध्यक्ष नितीन शहा यांनी यावेळी दिली.
कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन करून करण्यात आली, त्यानंतर नेताजी सुभाषचंद्र बोस, स्वामी विवेकानंद आणि ग्राहक पंचायतचे संस्थापक बिंदू माधव जोशी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. नवनिर्वाचित कार्यकारणी सदस्य खालींल प्रमाणे निवड केल्याची सातारा जिल्हा अध्यक्षा सुनितराजे घाटगे यांनी जाहीर केले. नितीन शहा- अध्यक्ष, कैलास थोरवडे-उपाध्यक्ष, हिरालाल खंडेलवाल-सचिव, डॉ धनंजय खैर-सहसचिव, एड. श्रीकांत दिवटे-संघटक, निलेश भोपते सहसंघटक, संतोष पालकर-कोषाध्यक्ष, दत्ताजी खुडे-देशमुख- सहकोषाध्यक्ष, कांचन कालेकर, पल्लवी गायकवाड महिला संघटिका, दिपाली चक्के, शालिनी शहा, डॉ. शिल्पा व्हावळ, मनोहर भंडारी, अशोक भंडारी, सुहास चक्के, अभिजित शिंदे, चंद्रकांत शहा यांची सदस्य तर महेंद्र शहा व जीवराज पटेल यांची सल्लागार म्हणून निवड करणेत आली.
कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष बी जे पाटील आणि सुनितराजे घाटगे यांनी नवनिर्वाचित सदस्यांना मार्गदर्शन करून कामकाजाचे स्वरूप व इतर माहिती दिली.
या कार्यकारणीच्या माध्यमातून ग्राहकांच्या हक्कांचे संरक्षण आणि त्यांच्या समस्यांचे समाधान करण्यासाठी एक सशक्त मंच तयार होईल, अशी अपेक्षा दोन्ही जिल्हाध्यक्ष यांनी व्यक्त केली.

Comments
Post a Comment