पोलीस उपनिरीक्षक उत्तम बर्गे यांचे पोलीस दलातील काम आदर्शवत - पोलीस अधीक्षक समीर शेख...


पोलीस उपनिरीक्षक उत्तम बर्गे यांचे पोलीस दलातील काम आदर्शवत - पोलीस अधीक्षक समीर शेख

कराड, दि. 20 (प्रतिनिधी) : प्रामाणिकपणा, विश्वास याला प्राधान्य देत कामाची गतीमानता, निर्णयक्षमता आणि आपल्या कामाला आनंद मानण्याची वृत्ती जोपासताना कराड गुन्हे शाखा विभागातील पोलिस उपनिरीक्षक उत्तम पांडुरंग बर्गे यांनी पोलिस दलात निष्कलंक काम करून आदर्श निर्माण केला असे प्रतिपादन सातारा जिल्हा पोलिस अधीक्षक समीर शेख यांनी केले.

कराड येथील गुन्हे शाखा विभागातील पोलिस उप निरीक्षक उत्तम बर्गे यांच्या पोलीस दलातील सेवानिवृत्ती निमित्त जिल्हा पोलिस दलाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या सत्कार समारंभात ते बोलत होते. यावेळी अतिरिक्त पोलीस अधिक्षक वैशाली कडूकर, गृह विभागाचे पोलिस उप अधीक्षक अतुल सबनीस, आ. डॉ अतुल भोसले यांचे स्विय सहाय्यक फत्तेसिंह सरनोबत, श्री बर्गे यांच्या सुविद्या पत्नी सौ. अनिता उत्तम बर्गे, डॉ. लक्ष्मणराव कदम यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी जिल्हा पोलिस अधीक्षक समीर शेख यांच्या हस्ते उत्तम बर्गे यांचा स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र, भेटवस्तू देऊन सपत्नीक सत्कार करण्यात आला.

उत्तम बर्गे हे सातारा जिल्हा पोलीस दलात 1987 साली भरती झाल्या नंतर पोलीस कॉन्स्टेबल ते पोलीस उपनिरीक्षक या पदावर पोलीस मुख्यालय सातारा, पोलीस उपाधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती वैशाली कडूकर, पोलीस उपाधीक्षक गृह अतुल सबनीस, कराड उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकूर, पाटण उपविभागीय पोलीस अधिकारी विजय पाटील, जिल्हा विशेष शाखा सातारा पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील, कराड शहर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजू ताशिलदार, कराड तालुका ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप यांच्या मार्गदर्शना खाली सातारा, कराड शहर पोलीस स्टेशनसह महामार्ग पोलीस कराड, कोयनानगर पोलीस स्टेशन, जिल्हा विशेष शाखा सातारा अंतर्गत कराड तालुका पोलीस स्टेशन व ढेबेवाडी पोलीस स्टेशन या विभागांमध्ये ३७ वर्ष ७ महिने व १ दिवस सातारा जिल्हा पोलीस दलात सेवा केली आहे. 

अतिरिक्त पोलिस अधीक्षक वैशाली कडूकर म्हणाल्या, पोलीस दलातील शिस्त जोपासत पोलीस उपनिरीक्षक उत्तम बर्गे यांनी अनेक नियोजनांची जबाबदारी घेत निर्णयांची तात्काळ अंमलबजावणी केली. निवृत्तीनंतर पोलीस दलातील काम थांबू नये यासाठी त्यांनी आपल्या कामाचे इतरांना प्रशिक्षण दिले. जिल्ह्याच्या विविध ठिकाणी त्यांनी केलेली कर्तव्यपूर्ती अभिमानास्पद असल्याचे गौरवउद्गार वैशाली कडुकर यांनी काढले.

या प्रसंगी उत्तम बर्गे यांनी सत्काराला उत्तर देताना 37 वर्षे पोलीस दलात केलेल्या कामाचा आढावा घेऊन कुटुंबातील सदस्य तसेच वरिष्ठांच्या मिळालेल्या सहकार्यामुळेच निष्कलंक सेवावृत्ती जोपासली असल्याचे नमूद केले. यावेळी पोलीस उपअधीक्षक गृह अतुल सबनीस, उत्तम बर्गे यांच्या सुविद्य पत्नी सौ. अनिता बर्गे, सातारा तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष अजय कदम, निवृत्त पोलिस उपनिरीक्षक सतीश साबळे यांनी मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमास सातारा जिल्हा गृहनिर्माण संस्थांच्या फेडरेशनचे अध्यक्ष नंदकुमार काटे, डॉ.सौ. प्रगती कदम, डॉ. प्रेषित कदम, उदयसिंह भोसले, सुजित कदम, सलीम मुजावर, सुरजित हंसपाल तसेच सातारा, कराड पोलीस दलातील कर्मचारी, नागरिक उपस्थित होते.

Comments

Karad Today News

कराड शहरातील दोन गुन्हेगाराकडून चोरीच्या 9 मोटरसायकली जप्त

स्व. यशवंतराव चव्हाण कृषि प्रदर्शनाच्या मंडप उभारणीस प्रारंभ

वारुंजी जिल्हा परिषद गटावर काँग्रेसचा झेंडा फडकवा – पृथ्वीराज चव्हाण

मलकापूर नगरपरिषद निवडणुकीत भाजपाचे नगराध्यक्ष पदासह 18 नगरसेवक विजयी

सुपने जिल्हा परिषद गट काँग्रेसने ताकदीने लढावा –कार्यकर्त्यांचा पृथ्वीराज चव्हाण यांच्यासमोर आग्रह

कराडमध्ये रविवारी रंगणार ‘कृष्णा मॅरेथॉन’चा थरार

मल्हारपेठ - पंढरपूर रस्त्याच्या कामविरोधात बाधित शेतकरी आक्रमक