एमडी ड्रग्ज प्रकरणात शहरातील दोन बड्या व्यावसायिकाच्या मुलांना अटक

 


एमडी ड्रग्ज प्रकरणात शहरातील दोन बड्या व्यावसायिकाच्या मुलांना अटक

ड्रग्ज विक्रीची पाळेमुळे उखडण्यात कराड पोलिसांना यश

कराड, दि. 23 (वार्ताहर ) कराड शहर व परिसरात एमडी ड्रग्ज विक्री करणाऱ्यांची पाळेमुळे उखडण्यात कराड पोलिसांना यश आले असून फरार असणाऱ्या बड्या व्यावसायिकांची दोन मुले गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या जाळ्यात अडकली आहेत. गौरव संदीप राव रा. गजानन हाउसिंग सोसायटी, कराड व सुजल उमेश चंदवानी (वय 19) रा. लाहोटीनगर मलकापूर या दोघाांना ताब्यात घेत अटक करण्यात आली आहे. 

गत महिन्यात कराड शहर व परिसरात कारवाई करून 37 ग्रॅम ड्रग्जसह दोन परदेशी नागरिकांसह 14 जणांना अटक करण्यात आली होती. पोलिसांनी याा प्रकरणी तपास सखोल केला असता या प्रकरणात आणखी काही जणांचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले होते. त्याचबरोबर या प्रकरणातील शहर व परिसरातील बड्या व्यावसायिकांच्या मुलांचा यात समावेश असल्याची चर्चा सुरू झाली होती. अखेर या प्रकरणात फरारी असणाऱ्या दोन संंशयत आरोपीस कराड शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अधिकारी व कर्मचारी यांनी सापळा रचत दोघाांना ताब्यात घेऊन अटक केली आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, कराड शहर व परिसरामध्येही पोलिसांनी ओगलेवाडी येथे छापा टाकून एमडी ड्रग्ज विक्री करणाऱ्यांना अटक केली होती. त्याचे धागेदोरे सुरूवातीला मुंबई त्यानंतर परदेशापर्यंत पोहचले होते. या प्रकरणी पोलिस तपास सुरू होता. याप्रकरणी पोलिसांनी 2 परदेशी नागरिकांसह 14 जणांना अटक केली होती तर काही संशयतांच्या मागावर पोलीस होते. याच दरम्यान या ड्रग्स रॅकेटमध्ये काही बड्या हस्तींचा सहभाग असल्याची ही माहिती पोलिसांना मिळाली होती. त्या अनुषंगाने गेल्या महिनाभर पोलीस राज्यातील विविध ठिकाणी संशयित आरोपींचा शोध घेत होते. या दरम्यान शहरातील बडे हस्तींच्या ऊचापती मुलांना याची कुणकुण लागल्यानंतर ते जिल्ह्यातून परागंधा झाले होते.

पोलिसांना ड्रग्ज प्रकरणात आपला सहभाग असल्याचा संशय आल्याने गौरव राव व सुजय चंदवानी हे पशार झाले होते. याची कुणकुण पोलिसांना लागताच त्यांना पकडण्यासाठी पोलिसांनी अनेक ठिकाणी सापळे रचले होते. मात्र ते पोलिसांना वारंवार गुंगारा देत होते. पोलिसांना मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांचे एक पथक मुंबई, पुणे येथे रवाना झाले होते. पुणे येथे गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक भापकर व त्यांच्या टीमने परदेशात पळून जाणाऱ्या सुजय चंदवानी यास विमानतळावरच ताब्यात घेतले. तत्पूर्वी सौरभ राव यास ही स्थानिक घरातून ताब्यात घेतले होते.

सदरची कामगिरी उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकुर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजु ताशिलदार यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखा अधिकारी सहा. पोलीस निरीक्षक अशोक भापकर, पोलीस उपनिरीक्षक सतिश आंदेलवार, संदीप कुंभार, सज्जन जगताप, अनिल स्वामी, धिरज कोरडे, अमोल देशमुख, आनंदा जाधव, दिग्वीजय सांडगे, मोहसिन मोमीन, संग्राम पाटील, सोनाली पिसाळ यांनी केलेली आहे.

राजू सनदी, कराड 

कराड टुडे न्यूज नेटवर्क


Comments

Karad Today News

कराड शहरातील दोन गुन्हेगाराकडून चोरीच्या 9 मोटरसायकली जप्त

स्व. यशवंतराव चव्हाण कृषि प्रदर्शनाच्या मंडप उभारणीस प्रारंभ

वारुंजी जिल्हा परिषद गटावर काँग्रेसचा झेंडा फडकवा – पृथ्वीराज चव्हाण

मलकापूर नगरपरिषद निवडणुकीत भाजपाचे नगराध्यक्ष पदासह 18 नगरसेवक विजयी

सुपने जिल्हा परिषद गट काँग्रेसने ताकदीने लढावा –कार्यकर्त्यांचा पृथ्वीराज चव्हाण यांच्यासमोर आग्रह

कराडमध्ये रविवारी रंगणार ‘कृष्णा मॅरेथॉन’चा थरार

मल्हारपेठ - पंढरपूर रस्त्याच्या कामविरोधात बाधित शेतकरी आक्रमक