ब्रिटिशकालीन कोयना पुलावरून उडी मारून वृद्धाने केली आत्महत्या


ब्रिटिशकालीन कोयना पुलावरून उडी मारून वृद्धाने केली आत्महत्या

कराड, दि.17 (प्रतिनिधी) - कराडच्या ब्रिटिशकालीन जुन्या कोयना पुलावरून एका वृद्ध इसमाने नदीपात्रात उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. नजीर पठाण (वय 68 वर्ष) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. या घटनेमुळे कोयना पुलावर बराच वेळ वाहतूक ठप्प झाली होती. रात्री उशिरापर्यंत या घटनेची तक्रार शहर पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाली नव्हती.

घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार वारुंजी परिसरातील एक वृद्ध व्यक्ती मोपेड वरून वारुंजी बाजूकडे जात होती. संबंधित व्यक्तीने गाडी पुलावरच लावून नदीपात्रात उडी घेतली असल्याचे काहीजण सांगत होते. गाडी व नदीपात्रात कोण दिसते का हे पाहण्यासाठी पुलावर मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याने वाहतूक खोळंबली होती. 

दरम्यान या घटनेची माहिती मिळताच पोलीस यंत्रणेने सूचना दिल्यानंतर कराड अग्निशामक दलाने नदीपात्रात उतरून शोध घेत वृद्धाचा मृतदेह नदीपात्रा बाहेर काढला आहे. सदर व्यक्तीचे नजीर पठाण (वय 68 वर्ष) रा. सह्याद्री हॉस्पिटलच्या समोर असे नाव असून त्याने 6.30 दरम्यान जुन्या पुलावरून कोयना नदीपात्रात उडी मारून आत्महत्या केली. याबाबत अग्निशमन दलाला 7.30 वाजता प्रचारण करण्यात आले. अग्निशमन दलाच्या जवानांच्या व बोटीच्या सहाय्याने 8.30 वाजता सदर व्यक्तीचा मृतदेह बाहेर काढून पोलिसांकडे सोपवण्यात आला. 

कराड नगर परिषद अग्निशामन अधिकारी श्रीकांत देवघरे यांच्या मार्गदर्शनाखाली लीडिंग फायरमन- विनोद काटरे, वाहन चालक- संजय अडसूळ, फायरमन -विक्रम जाधव, सुजित साळुंखे, अमित थोरवडे, भरत पंचारीया,योगेश पवार,नगणेश शेजवळ, सुभाष लोखंडे, राहुल भिसे यांनी या कामगिरीत सहभाग घेतला.

या घटनेची माहिती मिळताच वाहतूक नियंत्रण शाखेचे कर्मचारी तात्काळ कोयना पुलावर दाखल होत वाहतूक सुरळीत केली. 

Comments

Karad Today News

कराड शहरातील दोन गुन्हेगाराकडून चोरीच्या 9 मोटरसायकली जप्त

स्व. यशवंतराव चव्हाण कृषि प्रदर्शनाच्या मंडप उभारणीस प्रारंभ

वारुंजी जिल्हा परिषद गटावर काँग्रेसचा झेंडा फडकवा – पृथ्वीराज चव्हाण

मलकापूर नगरपरिषद निवडणुकीत भाजपाचे नगराध्यक्ष पदासह 18 नगरसेवक विजयी

सुपने जिल्हा परिषद गट काँग्रेसने ताकदीने लढावा –कार्यकर्त्यांचा पृथ्वीराज चव्हाण यांच्यासमोर आग्रह

कराडमध्ये रविवारी रंगणार ‘कृष्णा मॅरेथॉन’चा थरार

मल्हारपेठ - पंढरपूर रस्त्याच्या कामविरोधात बाधित शेतकरी आक्रमक