कराड शहर डीबी कडून चैन स्नॅचिंगचे 7 गुन्हे उघड, 8 लाखांचा मुद्देमाल जप्त.
कराड शहर डीबी कडून चैन स्नॅचिंगचे 7 गुन्हे उघड, 8 लाखांचा मुद्देमाल जप्त.
कराड, दि. 31 (प्रतिनिधी) - कराड शहरा व परिसरात घडलेल्या चैन स्नॅचिंग प्रकरणी कराड शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेने मोठी कारवाई करत सात गुन्हे उघडकीस आणत सुमारे आठ लाखाचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी संभाजी गोविंद जाधव रा. चंद्रसेननगर सांगली रोड विटा ता. खानापुर यास अटक करण्यात आली आहे.
कराड शहर पोलिसांनी दिलेल्या मिळालेल्या माहितीनुसार पोलीस उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकुर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजु ताशिलदार यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक अशोक भापकर व गुन्हे प्रकटीकरण शाखा पथकाने कराड शहर पोलीस ठाणे हद्दीत सैदापुर, मलकापुर व कराड शहरात चैन स्नॅचिंगचा हैदोस घालणा-या आरोपीस अटक केले आहे.
गेले काही महीन्यापासुन कराड शहर पोलीस ठाणे हद्दीतील सैदापूर, मलकापुर व कराड शहरामध्ये चेन स्नॅचिंगचे गुन्हे घडलेले होते. सदरबाबत कराड शहर पोलीस ठाणेस गुन्हे नोंद करणेत आलेले आहेत. सदर गुन्हयांचे तपास कराड शहर पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अधिकारी सपोनि अशोक भापकर व त्यांचे पथक कसोशीने करीत होते. सदर गुन्हयाचे तपासदरम्यान सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण व गोपनीय बातमीदार यांच्या आधारे तपास सुरु असतानाच सदर गुन्हयांमधील आरोपी संभाजी गोविंद जाधव रा. चंद्रसेननगर सांगली रोड विटा ता. खानापुर जि.सांगली यास उंब्रज पोलीस ठाणे यांनी ताब्यात घेवुन अटक केलेली आहे. त्याचेकडे अधिक तपास केला असता त्याने सदरचे गुन्हे केल्याची कबुली दिली असुन त्यास अटक करणेत आलेली आहे.
सदर गुन्हयात चोरीस गेलेला माल सोन्याचे दागिने जप्त करणेत आलेले आहेत. या आरोपी कडुन एकुण 7,89,000 /- रु. किंमतीचे सुमारे 81 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने जप्त करणेत आलेले आहे. अटक आरोपीकडुन कराड शहर पोलीस ठाणेकडील 6 तसेच कराड तालुका पोलीस ठाणेकडील 1 गुन्हा असे एकुण 7 चैन स्नॅचिंगचे गुन्हे उघड करणेत आलेले आहेत.
सदरची कामगिरी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखा अधिकारी सहा. पोलीस निरीक्षक अशोक भापकर, पोलीस उपनिरीक्षक सतिश आंदेलवार, डीसले, पो.ना सज्जन जगताप, अनिल स्वामी, कुलदीप कोळी, संदीप कुंभार, संतोष पाडळे, पो.शि. आनंदा जाधव, अमोल देशमुख, धिरज कोरडे, प्रशांत वाघमारे, मोहसिन मोमीन, दिग्वीजय सांडगे, संग्राम पाटील, सोनाली पिसाळ यांनी केलेली आहे.

Comments
Post a Comment