माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त वडगाव हवेलीत गुरुवारी भव्य ओपन बैलगाडा शर्यत.

 

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त वडगाव हवेलीत गुरुवारी भव्य ओपन बैलगाडा शर्यत.

कराड, दि. 17 (प्रतिनिधी) : माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त येत्या गुरुवारी (दि. २०) वडगाव हवेली येथील कोडोली रस्ता कृष्णा कॅनॉललगत भव्य ओपन बैलगाडा शर्यती होणार आहेत. विजेत्या प्रथम क्रमांकाच्या बैलगाडीस १ लाख १ हजाराचे बक्षीस दिले जाणार आहे. पैलवान नानासाहेब पाटील मित्रपरिवार व पैलवान नानासाहेब पाटील कुस्ती संघटना, दिपकशेठ लोखंडे तसेच बाबाशेठ बागल मित्रपरिवार, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने हे मैदान होणार आहे.

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले आहेत. गुरुवारी भव्य ओपन बैलगाडा शर्यती होणार आहेत. यावेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, अॅ ड. उदयसिंह पाटील - उंडाळकर, कराड दक्षिण काँग्रेसचे अध्यक्ष मनोहर शिंदे, पैलवान नानासाहेब पाटील, मुंबई येथील प्रसिद्ध उद्योजक व येवती गावचे सुपुत्र दिपकशेठ लोखंडे, अकाईवाडी (जिंती) चे सुपुत्र व मुंबईस्थित उद्योजक बाबाशेठ बागल, प्रा. धनाजी काटकर, जिल्हा परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते जयवंतराव उर्फ बंडानाना जगताप, माजी पंचायत समिती सदस्य नामदेव पाटील, प्रदेश युवक काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष शिवराज मोरे, युवा नेते इंद्रजित चव्हाण, गजानन आवळकर, कराड दक्षिण सेवादल काँग्रेसचे अध्यक्ष शिवाजीराव मोहिते, अॅड . नरेंद्र पाटील, कराड दक्षिण काँग्रेसचे उपाध्यक्ष नितीन थोरात यांच्यासह मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

स्पर्धकांनी नितीन पाटील (7038693555), आत्माराम पाटील (9860329114), किरण पाटील (7499720526), येसू भाऊ (9075401272), अनिल ड्रायव्हर (9552152556), महेश देसाई (7666322757), पप्पू वेल्हाळ (8329203744), सरफराज शेख (8799843014), अक्षय यादव (9637741003) यांच्याशी संपर्क साधावा. सुनील मोरे, बबलू देसाई, रणजित बनसोडे हे शर्यतीचे समालोचन करणार आहेत. प्रवेश फी एक हजार रुपये असून, पहिला गट सकाळी नऊ वाजता सोडला जाणार आहे. अशी माहिती संयोजकांनी दिली.

Comments

Karad Today News

कराड शहरातील दोन गुन्हेगाराकडून चोरीच्या 9 मोटरसायकली जप्त

स्व. यशवंतराव चव्हाण कृषि प्रदर्शनाच्या मंडप उभारणीस प्रारंभ

वारुंजी जिल्हा परिषद गटावर काँग्रेसचा झेंडा फडकवा – पृथ्वीराज चव्हाण

मलकापूर नगरपरिषद निवडणुकीत भाजपाचे नगराध्यक्ष पदासह 18 नगरसेवक विजयी

सुपने जिल्हा परिषद गट काँग्रेसने ताकदीने लढावा –कार्यकर्त्यांचा पृथ्वीराज चव्हाण यांच्यासमोर आग्रह

कराडमध्ये रविवारी रंगणार ‘कृष्णा मॅरेथॉन’चा थरार

मल्हारपेठ - पंढरपूर रस्त्याच्या कामविरोधात बाधित शेतकरी आक्रमक