सह्याद्री कारखान्याच्या निवडणुकीतून 144 उमेदवारांची माघार
सह्याद्री कारखान्याच्या निवडणुकीतून 144 उमेदवारांची माघार; निवडणूक तिरंगी होण्याची शक्यता
पी डी पाटील पॅनलचे उमेदवार जाहीर
कराड, दि, 21 (प्रतिनिधी) - सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत आज अर्ज माघारी घेण्याचे शेवटच्या दिवशी 144 उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतलेने निवडणुकीच्या रिंगणात आता 70 उमेदवार उरले आहेत. अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी संजीवकुमार सुद्रिक यांनी दिली. यामध्ये सत्ताधारी पी डी पाटील पॅनलने 21 अधिकृत उमेदवारांची आपली यादी जाहीर केल्याने विरोधी गटातील 49 उमेदवारांचे एक पॅनल असणार की दोन पॅनेल हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
दरम्यान पी डी पाटील पॅनलने आपले 21 उमेदवारांची यादी जाहीर केल्यानंतर विरोधी गटाकडून त्यांच्या पॅनलचे उमेदवार जाहीर होणे अपेक्षित होते मात्र रात्री उशिरापर्यंत कराडच्या शेती उत्पन्न बाजार समितीमध्ये दिग्गज नेत्यांमध्ये खलबते सुरू होती. रात्री उशिरापर्यंत ही चर्चा सुरू असल्याने नेमकी कोणती भूमिका विरोधी गटातील नेत्यांनी घेतली हे समजू शकले नाही. मात्र चेअरमन पदाच्या तिढ्याने ही लढत तिरंगी होणार असल्याचे बोलले जात आहे.
शुक्रवार दिनांक 21 रोजी उमेदवारी अर्ज माघार घेण्याच्या शेवटच्या दिवशी पी डी पाटील पॅनलने 21 उमेदवारांचे अधिकृत यादी जाहीर केली असून उत्पादक सभासद गटातून शामराव पांडुरंग पाटील, अण्णासो रामराव पाटील, तळबीड गटातून संभाजी शंकर साळवे, सुरेश नानासो माने, उंब्रज गटातून विजय दादासो निकम, संजय बापूस गोरे, जयंत धनाजी जाधव, कोपर्डे हवेली गटातून सुनील ज्ञानदेव जगदाळे, नेताजी रामचंद्र चव्हाण, राजेंद्र भगवान पाटील, मसूर गटातून संतोष शिदोजीराव घार्गे, अरविंद निवृत्ती जाधव, राजेंद्र रामराव चव्हाण, वाठार किरोली गटातून कांतीलाल बाजीराव भोसले, रमेश जयसिंग माने, राहुल शिवाजी निकम, अनुसूचित जाती/जमाती गटातून दीपक मानसिंग लादे, महिला राखीव मधून सिंधुताई बाजीराव पवार, लक्ष्मी संभाजीराव गायकवाड, इतर मागास प्रवर्ग मधून संजय दत्तात्रय कुंभार तर भटक्या विमुक्त जाती/जमाती व विशेष मागास प्रवर्ग मधून दिनकर शंकर शिरतोडे या उमेदवारांचा समावेश आहे. दरम्यान या निवडणुकीत पी डी पाटील पॅनलने विद्यमान 6 संचालकांना पुन्हा संधी दिली असून 15 नवीन चेहऱ्यांचा समावेश केला आहे.
सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत माघारी नंतर शिल्लक राहिलेल्या उमेदवारांच्या यादीमध्ये व्यक्ती ऊस उत्पादक सभासद गटात संजय किसन चव्हाण, राजेंद्र बाळासाहेब पाटील, संदीप यशवंत पाटील,
तळबीड गटात राजेंद्र दत्तात्रय जाधव, बाळासो नामदेव माने, भास्कर अण्णाजी पवार, बाबुराव जगन्नाथ पवार.
उंब्रज गटात अजित नाथाजीराव जाधव, संपतराव गणपतराव जाधव, सुरेश बाजीराव पाटील, सिद्धार्थ शिवाजीराव भोसले, संजय बापूसो गोरे, जयसिंग महादेव चव्हाण, युवराज संपतराव खांबे.
कोपर्डे हवेली गटात राजन शंकर पाटील, भिकू विठोबा पिसाळ, भरत विठ्ठल चव्हाण, दिनकर शंकर पिसाळ, सुभाष ज्ञानदेव चव्हाण, आबासो आनंदराव चव्हाण, सुरेंद्र पांडुरंग पवार, श्रीकांत माधवराव जाधव, निवासा आत्माराम थोरात.
मसूर गटात उदय मानसिंग जगदाळे, श्रीमंत किसन कदम, अशोकराव भिकोबा साळुंखे, उमाजी बळीराम चव्हाण, वसंतराव शंकर जगदाळे, प्रमोद भगवान गायकवाड, सुहास यादवराव कदम, विश्वासराव शिवाजीराव माने.
वाठार किरोली गटात राजेंद्रकुमार संपतराव मोरे, शंकर पांडुरंग गायकवाड, सुखदेव बापूसो माने, मुरलीधर रंगराव गायकवाड, संजय दत्तात्रय मुळे, शंकर दत्तात्रय भोसले, लक्ष्मण ज्योतीराम जाधव.
अनुसूचित जाती अनुसूचित जमाती राखीव गटात शामराव पांडुरंग थोरात, प्रकाश आबा वाघमारे.
महिला राखीव गटात उषा सुभाष पाटील, सुवर्णा अधिकराव पवार, नंदा तानाजी यादव, सिंधुताई दादासो जाधव.
इतर मागास प्रवर्ग राखीव गटात विठ्ठल तुकाराम देशमुख, दिलीप हनुमंत कुंभार, अधिकराव पांडुरंग माळी.
विमुक्त जाती भटक्या जमाती किंवा विशेष मागास प्रवर्ग गटात शंकर लक्ष्मण पवार, विठ्ठल भिकू सरगर, बाळासो किसन पवार अशा 49 उमेदवारांचे अर्ज सध्या तरी निवडणूक रिंगणात आहेत.
मुरलीधर रंगराव गायकवाड या उमेदवाराने व्यक्ती ऊस उत्पादक सभासद गट क्रमांक ४ कोपर्डे हवेली या गटातून निवडणूक लढविणाऱ्या थोरात निवास आत्माराम यांच्या उमेदवारीवर हरकत घेतले बाबत माननीय मुंबई उच्च न्यायालय येथे रिट याचीका क्रमांक WP St १००८६/ २०२५ दाखल केली असून त्यामध्ये सर्व उमेदवारांना प्रतिवादी करण्यात आले असून सदर याचिकेवर दिनांक २५ मार्च २०२५ रोजी मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी ठेवलेली आहे. सदर सुनावणी बाबतची नोटीस संबंधितांना पाठवली असून माननीय न्यायालयाने प्रतिवादी तीन निवडणूक निर्णय अधिकारी यांना या सर्व उमेदवारांना सदर नोटीस बजावणी बाबत निर्देश दिले आहेत. त्यास अनुसरून निवडणूक निर्णय अधिकारी यांनी सदर याचिकेत प्रतिवादी करण्यात आलेल्या सर्व उमेदवारांनी सदर सुनावणी बाबत नोंद घ्यावी. तसेच याचिकेची प्रत निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात उपलब्ध असून सबंधित प्रतिवादी यांनी सुनावणीस उपस्थित राहून म्हणणे दाखल करणे बाबत उचीत कार्यवाही करावी असे कळविले आहे.
राजू सनदी, कराड
Karad Today News

Comments
Post a Comment