वाठार येथील पंपावरील चोरीचा गुन्हा उघड; पंपावरील कामगारच गुन्ह्यात सहभागी
कराड तालुका गुन्हे प्रकटीकरण शाखेची दमदार कारवाई
वाठार येथिल पेट्रोल पंपावर झालेल्या सशस्त्र जबरी चोरीचा गुन्हा उघड
पेट्रोल पंपावरील कामगारच सहभागी असल्याचे झाले निष्पन्न्
कराड, दि. 16 - कराड तालुका गुन्हे प्रकटीकरण शाखेने दमदार कामगिरी करत वाठार येथील पेट्रोल पंपावर झालेल्या सशस्त्र चोरीचा गुन्हा उघड केला असून पेट्रोल पंपावरील कामगारच या गुन्ह्यात सहभागी असल्याचे निष्पन्न झाले आहे. या गुन्ह्यात एका अल्पवयीन मुलासह चौघांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून मोबाईल मोटरसायकल व चोरीतील रक्कम जप्त करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाठार ता. कराड येथिल श्री गणेश पेट्रोल पंपावर दि. 10/03/2025 रोजी रात्री 12.00 वा. चे सुमारास दोन अनोळखी इसम मोटार सायकल वरुन येवुन पेट्रोल भरण्याचा बहाणा करुन पेट्रोल पंपा वरील कामगारावर कोयत्याने हल्ला करुन त्याचे खांदयाला अडकवलेली पैशाची बॅग जबरदस्ती हिसकावुन घेवून तेथुन त्याचे मोटार सायकल वरून पळून गेले आहेत अशी तक्रार दिलेने नमुद गुन्हा दाखल करणेत आला होता, सदर प्रकाराचे गांर्भिय लक्षात घेवुन मा. पोलीस अधिक्षक श्री. समीर शेख साो., यांनी गुन्हा उघडकीस आणण्यासाठी सुचना दिल्या होत्या व अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती डॉ. वैशाली कडुकर साो., सातारा तसेच मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. अमोल ठाकुर सोो.. कराड यांनो घटनास्थळास भेट देवून गुन्हा उघडकीस आणण्याबाबत सुचना व मार्गदर्शन केले होते.
दिनांक 11/03/2025 रोजी दाखल गुन्हयाच्या अनुशंगाने मा. वरिष्ठांच्या सुचना नुसार पोलीस निरीक्षक श्री महेंद्र जगताप सो प्रभारी कराड तालुका पोलीस ठाणे यांनी कराड तालुका पोलीस ठाणे च्या 2 व स्थानिक गुन्हे शाखा यांचे कडील । अशा 3 टिम तात्काळ आरोपी शोध कामी रवाना केल्या होत्या. पहील्या टप्यात पेट्रोल पंपा वरील प्राप्त सी.सी.टी.व्ही फुटेज मध्ये दिसणाऱ्या संशयीत आरोपीची ओळख पटवण्यात स्था.गु.शा.सांगली येथील अंमलदारांचे मदतीने कराड तालुका पोलीस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण पथकास यश आले त्यानंतर तांत्रिक माहीतीचे आधारे आरोपीचा शोध घेणेस सुरुवात केली असता आरोपी हे वेळोवेळी आपले लोकेशन बदलत असल्याचे लक्षात आलेने कराड तालुका पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण शाखेचे प्रमुख सपोनि बिराजदार व त्यांचे टिम ने सातारा, सांगली, कोल्हापुर, रत्नागीरी व पुन्हा सांगली असे चार जिल्हयात सलग पाठलाग करुन रोहीत ऊर्फ दादया सुदाम कदम.रा-सांगली यास ताब्यात घेतले त्याचेकडे विचारपुस करीत असता तो उडवाउडवीची उत्तरे देत होता. त्याचेकडे कसुन तपास करता त्याने गुन्हा केल्याचे कबुल केले. त्यावेळी त्याने मोटार सायकलवर येवुन कोयत्याने हल्ला करुन पैशाची बॅग हिसकावुन घेऊन जाणारा मीच असल्याचे कबुल केले. त्याने त्याचेबरोबर मोटार सायकल चालविणारा हा आगाशिवनगर, मलकापुर, कराड येथील मुलगा असल्याचे सांगितले. त्यास ताब्यात घेतले असता तो अल्पवयीन मुलगा असल्याचे समजले सदर प्रकरणाचा मुख्य सुत्रधार आटके ता-कराड येथील राहणारा किशोर चव्हाण असल्याचे त्याने सांगितलेने त्यास ताब्यात घेतले. त्याचेकडे विचारपुस करता त्याने त्यांचे गावातीलच पेट्रोल पंपावर काम करणारा इसम परशुराम दुपटे याचेशी संगनमत करुन सदरचा गुन्हा केल्याचे सांगितले. अशा प्रकारे पेट्रोलपंपावरील ज्या कामगारावर हल्ला होऊन रोख रक्कम लुटली गेली होती तो कामगार देखील या गुन्हयात सहभागी असल्याचे दिसुन आल्याने त्यास देखील या गुन्हयात अटक करण्यात आलो आहे.
अशा प्रकारे विधीसंघर्ष बालकासह रेकार्ड वरील 2 गुन्हेगार व । पेट्रोल पंपावरील कामगार असे एकुन 4 संशयीत आरोपीना सदर गुन्हयाचे कामी ताब्यात घेतले व त्यांचे कडे कसुन चोकशी केली असता त्यांनी सदरचा गुन्हा हा पेट्रोल पंपावरील कामगार याच्याशी संगनमत करुन पैशाच्या हव्यासापोटी केल्याची कबुली दिल्याने त्यांचेकडुन चोरीस गेलेली रोख रक्कम तसेच गुन्हयात वापरलेले चार मोबाईल व एक मोटारसायकल असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदर गुन्हयाचा तपास सपोनि श्री. सखाराम बिराजदार हे करीत आहेत.
वरील कामगिरी मा. पोलीस अधिक्षक श्री. समीर शेख साो. तसेच मा. अपर पोलीस अधीक्षक श्रीमती डॉ. वैशाली कडुकर मॅडम, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. अमोल ठाकुर साो.. कराड विभाग व पोलीस निरीक्षक श्री. महेंद्र जगताप साो.. यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. सखाराम बिराजदार, सहाय्यक पोलीस उप निरीक्षक नितीन येळवे, पोलीस हवालदार सचिन निकम, उत्तम कोळी, पोलीस नाईक विनोद माने, किरण बामणे, पोलीस कॉन्स्टेबल रवींद्र देशमुख, प्रफुल्ल गाडे, मोहित गुरव, यांनी केली आहे.

Comments
Post a Comment