कराड लाचलुचपत प्रकरणात एकाला अटक;दोन दिवस पोलीस कोठडी
कराड लाचलुचपत प्रकरणात एकाला अटक;दोन दिवस पोलीस कोठडी
नगरपरिषदेचे कार्यमुक्त मुख्याधिकारी फरार
कराड, दि. 27 (प्रतिनिधी) - कराड शहरात बांधकाम परवान्यासाठी १० लाखांच्या लाचेची मागणी करून पाच लाखांची लाच प्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या चौघांपकी दोघांना अटक केल्यानंतर काल एकाच ताब्यात घेऊन आज येथील न्यायालयात त्यास हजर केले असता दोन दिवसाची न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे. लाच प्रकरणातील हा खाजगी समाज असन अजिंक्य देव असे त्याचे नाव आहे.
दरम्यान या लाच प्रकरणात चौघा विरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर तत्कालीन कार्यमुक्त मुख्याधिकारी अद्यापही फरार असून ते स्वतःच्या बचावासाठी जामीना साठी प्रयत्न करत असल्याची चर्चा आहे. याच दरम्यान या प्रकरणातील खाजगी इसमाला लाच लुचपत विभागाने ताब्यात घेतले असून त्याला आज येथील न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
यालाच प्रकरणात सातारा लाच रुचपत विभागाने यापूर्वी नगर परिषदेमधील बांधकाम विभागातील तौफिक शेख तसेच नगररचना कार्यालयातील स्वानंद शिरगुप्पे यांना ताब्यात घेऊन अटक केली आहे त्यानंतर त्यांनी या दोघांच्या घरांची झडती घेतली आहे मात्र या दोघांच्याकडे काही आढळून आलेले नाही. याच दरम्यान या प्रकरणातील खाजगी सम इसमाला ताब्यात घेण्यात लाच रुचपत विभागाला यश आले असून त्यांनी बुधवारी त्यास ताब्यात घेत आज येथील न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यास दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
कराड नगर परिषदेचे कार्यमुक्त मुख्याधिकारी अद्याप फरारीच
नगरपरिषदेच्या या लाचलुचपत प्रकरणात तत्कालीन कार्यमुक्त मुख्याधिकारी शंकर खंदारे यांचाही सहभाग असल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला असून ते अजूनही फरारीच आहेत त्यांच्या शोधार्थ लाचलुचपत विभागाचे पथक विविध ठिकाणी रवाना झाले आहे. या प्रकरणात त्यांच्याही घराची झडती घेण्यात येईल असे अधिकाऱ्यांनी सांगितले.


Comments
Post a Comment