अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणी एकास वीस वर्षे कारावास
अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणी एकास वीस वर्षे कारावास
कराड, दि. 27 (प्रतिनिधी) - अल्पवयीन बालिकेस खेळण्याचा बहाणा करून जबरदस्तीने घरामध्ये ओढत नेवुन तिचेशी शारिरीक संबंध केलेप्रकरणी आरोपीस दोषी धरून भा. द. वि. सं. कलम. ३७६, ३७६ (२) (एन),३७६ (एबी) पोक्सो ४, ६, अन्वये २० वर्षे कठोर कारावास व एकुण रक्कम रू. ५०,०००/- रूपयांची दंडाची शिक्षा येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती के. एस. होरे यांनी सुनावली आहे. बापु उर्फ नितीन रमेश पाटोळे (वय ३०) रा. बेघरवस्ती वारूंजी ता. कराड असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे.
याबाबत हकीकत अशी की, 15 नोव्हेंबर २०२३ रोजी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास तसेच त्यांनतर दोन महिन्याने असे दोन वेळा यातील फिर्यादी यांचे घराशेजारी राहणारा बापु उर्फ नितीन रमेश पाटोळे वय. ३० वर्षे रा. बेघरवस्ती वारूंजी ता. कराड याने फिर्यादी यांची अल्पवयीन मुलगी (वय १०) ही अल्पवयीन असल्याचे माहीत असताना देखील ती घराबाहेर अंगणात खेळत असताना तिचा हात धरून त्याचे घरी ओढत नेवुन खेळण्याचा बहाणा करून तिचेवर जबरदस्तीने शारिरीक संबंध केले. त्यावेळी आरोपीने अल्पवयीन मुलीस आपले खेळणे बाहेर कोणाला सांगायचे नाही, तु बाहेर कोणाला सांगितले तर तुला मी मारून टाकेण अशी धमकी दिली होती. त्यामुळे तिने घाबरून सदरची घटना कोणाला सांगितली नव्हती. त्यानंतर २३ फेब्रुवारी २०२४ रोजी दुपारी 2 वाजता फिर्यादींची मुलगी हि घराबाहेर खेळत असताना सदर आरोपी बापु उर्फ नितीन पाटोळे याने पिडीत मुलीस घरी बोलावले परंतू ती घाबरून भिती पोटी पळून घरी गेली. त्यानंतर तिने आईला घडलेला प्रकार सांगितल्या नंतर फिर्यादी यांनी आरोपी बापु उर्फ नितीन रमेश पाटोळे वय. ३० वर्षे रा. बेघरवस्ती वारूंजी ता. कराड याचे विरुध्द कराड शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला.
सदरच्या खटल्यात जिल्हा सरकारी वकील आर. सी. शहा यांनी सरकार पक्षातर्फे एकूण ६ साक्षीदार तपासले व खटल्यातील कामकाज पाहुन शिक्षेवर जोरदार युक्तीवाद केला. यातील तपासी अंमलदार सहा. महिला पोलीस निरिक्षक सौ. एस. व्ही. पाटील कराड शहर पो. ठाणे यांनी सदर घटनेचा सखोल तपास करून,आरोपीस अटक केली व मे. न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. तसेच पिडीत मुलीची, पिडीत मुलीचे आईची, वैद्यकीय अधिकारी यांच्या साक्षी महत्वाचे धरून यांचे साक्षीवरून मे. कोर्टात गुन्हा शाबीत झाल्याने आरोपीस कराड येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती के. एस. होरे यांनी दोषी धरून आरोपीला बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंध कायदा कलम. ४ अन्वये २० वर्षे कठोर कारावास व र.रू. २५,०००/- द्रव्यदंडाची, दंड न भरल्यास सहा महिने कठोर कारावास, बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंध कायदा कलम ६ अन्वये २० वर्षे कठोर कारावास व र.रू. २५,०००/- द्रव्यदंडाची, दंड न भरल्यास सहा महिने कठोर कारावास, भा. द. वि. सं. कलम. ३७६ अन्वये २० वर्षे कठोर कारावास, भा. द. वि. सं. कलम. ३७६ (२) (एन) अन्वये २० वर्षे कठोर कारावास ५) भा. द. वि. सं. कलम. ३७६ (एबी) अन्वये २० वर्षे कठोर कारावास, अशी शिक्षा सुनावली.
खटला दरम्यान सरकार पक्षातर्फे खटला चालविताना खटला चालविते वेळी सहा. जिल्हा सरकारी वकील आर. सी. शहा यांना त्याचे ज्युनिअर अॅड. रिचा शहा, अॅड. ऐश्वर्या यादव, अॅड. कोमल लाड यांनी सहकार्य केले. तसेच कोर्ट पैरवी प्रॉसुकेशन स्कॉड चे कराड कोर्टातील कोर्ट ड्युटीचे एस. बी. भोसले, पो. कॉ. ब. नं. २४६ ने कराड शहर पो. स्टेशन यांनी सहकार्य केले.


Comments
Post a Comment