वडगाव हवेलीतील ओपन बैलगाडा शर्यतीत श्री ज्योतिर्लिंग प्रसन्न प्रथम

वडगाव हवेलीतील ओपन बैलगाडा शर्यतीत श्री ज्योतिर्लिंग प्रसन्न प्रथम 

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त शर्यतीचे आयोजन

कराड, दि. 21 : माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त वडगाव हवेली येथे झालेल्या भव्य ओपन बैलगाडा शर्यतीत श्री ज्योतिर्लिंग प्रसन्न, साईराज किरण आप्पा (कालगाव - शाळगाव) बैलगाडीने प्रथम क्रमांक पटकावला. विजेत्या प्रथम क्रमांकाच्या बैलगाडीस १ लाख १ हजाराचे बक्षीस देवून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते गौरविण्यात आले. यावेळी कराड दक्षिण काँग्रेसचे अध्यक्ष मनोहर शिंदे, पैलवान नानासाहेब पाटील, मुंबई येथील प्रसिद्ध उद्योजक व येवती गावचे सुपुत्र दिपकशेठ लोखंडे, अकाईवाडी (जिंती)चे सुपुत्र व मुंबईस्थित उद्योजक बाबाशेठ बागल, जिल्हा परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते जयवंतराव उर्फ बंडानाना जगताप, गजानन आवळकर, माजी पंचायत समिती सदस्य नामदेव पाटील, अधिकराव चव्हाण, युवा नेते इंद्रजित चव्हाण, गजानन आवळकर, कराड दक्षिण सेवादल काँग्रेसचे अध्यक्ष शिवाजीराव मोहिते, अॅड . नरेंद्र नांगरे - पाटील, प्रदीप जाधव, कराड दक्षिण काँग्रेसचे उपाध्यक्ष नितीन थोरात, जयवंतराव जगताप, संतोष जगताप, अधिकराव जगताप, वैभव थोरात, सतीश पाटील, राजेंद्र जाधव, के. डी. मदने, पैलवान कृष्णत पवार, जयकर खुडे, पैलवान अभिजीत पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

वडगाव हवेली : येथे झालेल्या भव्य ओपन बैलगाडा शर्यतीतील विजेत्या प्रथम क्रमांकास बक्षीस वितरण करताना पृथ्वीराज चव्हाण, बाजूस मान्यवर

पैलवान नानासाहेब पाटील मित्रपरिवार व पैलवान नानासाहेब पाटील कुस्ती संघटना, दिपकशेठ लोखंडे तसेच बाबाशेठ बागल मित्रपरिवार, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने मैदान आयोजित केले होते. मैदानात २८० बैलगाड्या सहभागी झाल्या होत्या. संयोजकांनी नेटके नियोजन केले. व नियमानुसार शर्यती झाल्याने मैदान यशस्वी झाले.

प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस अॅ ड. उदयसिंह पाटील - उंडाळकर, प्रा. धनाजी काटकर, प्रदेश युवक काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यासह मान्यवर व बैलगाडी शौकिनांनी भेटी दिल्या. अंतिम फेरीनंतर निकाल जाहीर झाला. यामध्ये श्री ज्योतिर्लिंग प्रसन्न साईराज किरण आप्पा (कालगाव - शाळगाव) बैलगाडीने प्रथम क्रमांक पटकावला. तर अनुक्रमे बडेबाबा प्रसन्न शिवांश घोरपडे (सदाशिवगड), देवांश अमित पाटील (सुपने), अंबिका व सिद्धनाथ प्रसन्न राजू ड्रायव्हर (वांगी), भैरवनाथ प्रसन्न हिंदकेसरी संभाजी आबा (काले), बिरोबा प्रसन्न माऊली पैठणी (मलकापूर), भैरवनाथ प्रसन्न (भैरवनाथनगर) विजेते ठरले. तर जितू गायकवाड (पुणे पोलिस) व हर्षराज भोसले (वाघेरी) या गाड्यांनी उत्तेजनार्थ बक्षिस मिळवले.

नितीन पाटील, आत्माराम पाटील, किरण पाटील, येसू भाऊ, अनिल ड्रायव्हर, महेश देसाई, पप्पू वेल्हाळ, सरफराज शेख, अक्षय यादव, शिवेंद्रसिंह पाटील, आबू साळुंखे, धनंजय खराडे, जयकर पाटील, रुपेश पाटील यांनी संयोजन केले. सुनील मोरे, बबलू देसाई, रणजित बनसोडे यांनी समालोचन केले. व सलीम मुलाणी यांनी झेंडा पंच म्हणून काम पाहिले.




Comments

Karad Today News

कराड शहरातील दोन गुन्हेगाराकडून चोरीच्या 9 मोटरसायकली जप्त

स्व. यशवंतराव चव्हाण कृषि प्रदर्शनाच्या मंडप उभारणीस प्रारंभ

वारुंजी जिल्हा परिषद गटावर काँग्रेसचा झेंडा फडकवा – पृथ्वीराज चव्हाण

मलकापूर नगरपरिषद निवडणुकीत भाजपाचे नगराध्यक्ष पदासह 18 नगरसेवक विजयी

सुपने जिल्हा परिषद गट काँग्रेसने ताकदीने लढावा –कार्यकर्त्यांचा पृथ्वीराज चव्हाण यांच्यासमोर आग्रह

कराडमध्ये रविवारी रंगणार ‘कृष्णा मॅरेथॉन’चा थरार

मल्हारपेठ - पंढरपूर रस्त्याच्या कामविरोधात बाधित शेतकरी आक्रमक