अतुलबाबा नक्कीच कराडवर भाजपचा झेंडा फडकवतील;मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
अतुलबाबा नक्कीच कराडवर भाजपचा झेंडा फडकवतील; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कराड, दि. 30 : - आ. अतुलबाबा भोसले हे विकासाचे व्हिजन असलेले युवा नेते आहेत. त्यामुळे मी त्यांच्याकडे भविष्यातील मोठे नेतृत्व म्हणून पाहतो. त्यांची क्षमता पाहता त्यांना मोठमोठ्या नेत्यांकडून घेरण्याचे षडयंत्र आखले जात आहे. मात्र आम्ही आधुनिक अभिमन्यू आहोत. हे चक्रव्यूह यशस्वीपणे भेदू, मी त्यांच्या पाठीशी आहे. अतुलबाबा नक्कीच कराडवर भाजपचा झेंडा फडकवतील, असा दृढ विश्वास राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. येथील शिवतीर्थ दत्त चौकात भारतीय जनता पार्टीच्या कराड व मलकापूर नगरपालिका नगराध्यक्ष व नगरसेवक उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेचे बोलत होते. यावेळी राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील, आमदार अतुल बाबा भोसले, आमदार मनोज घोरपडे, कृष्णा कारखान्याचे चेअरमन सुरेश भोसले, माजी आमदार आनंदराव पाटील, नीता केळकर, भरत पाटील, मकरंद देशपांडे, विक्रम पावसकर, रामकृष्ण वेताळ, सुहास जगताप, कराड नगराध्यक्ष पदाचे उमेदवार विनायक पावसकर व मलकापूरचे तेजस सोनवणे, शारदा जाधव, म...